भक्तिवाङ्मयातील “मधुराष्टकम्” Madhurashtakam हे श्रीवल्लभाचार्यांनी रचलेले अमृतमय स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये श्रीकृष्णाच्या प्रत्येक अंगाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा “मधुरत्व” म्हणजेच सुंदरता आणि माधुर्य व्यक्त केलेले आहे.
श्रीवल्लभाचार्यांनी भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करताना सांगितले आहे की — त्यांचे ओठ, डोळे, चाल, हास्य, लीला, वस्त्र, संगीत, मित्रता, सर्व काही “मधुर” आहे.
हे स्तोत्र केवळ भक्तीचे प्रतीक नसून, ते आध्यात्मिक आनंद, प्रेम आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अनुभूती देणारे आहे.
म्हणूनच “मधुराष्टकम्” चे पठण केल्याने मनात आनंद, शांतता आणि श्रीकृष्णावरील प्रेम वृद्धिंगत होते.
भगवान विष्णूच्या अनेक अवतराचे सर्वांनाच आकर्षण करणारे श्रीकृष्णाचे चरित्र आहे. त्यांच्या चरित्राचे वर्णन अनेक साधुसंताने ऋषीमुनींनी केलेले आहे. श्रीकृष्णाच्या गोड चरित्राचे वर्णन श्रीवल्लभाचार्याने संस्कृत श्लोकामध्ये इसवी सन 1478 मध्ये रचलेले आहे. हे 8 संस्कृत श्लोकांमध्ये आहे . ‘मधुरम्’ हा शब्द अनेक वेळा लिहिला गेल्यामुळे ते गाताना अतिशय रंजकता निर्माण होते. श्रीकृष्णाचे हे मधुर चरित्र अनेक गायकाने गायलेले आहे. त्या संस्कृत श्लोकाचा मराठीत अर्थ खालील प्रमाणे करता येतो.
Table of Contents
Madhurashtakam मधुराष्टकम संस्कृत श्लोक अर्थ
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् |
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||१||
वल्लभाचार्य पहिल्या संस्कृत श्लोकांमध्ये म्हणतात, ‘हे श्रीकृष्णा तुझे ओठ अतिशय मधुर म्हणजे सुंदर आहेत. आपले मुख ही सुंदर आहे,डोळे सुंदर आहेत. हास्य गोड आहे. आपले हृदय हे सुंदर आहे आणि आपलं चालणं हे देखील सुंदर आहे. खरेतर आपण सुंदरतेचे अधिपती आहात.
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलीतं मधुरम् |
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||२||
हे श्रीकृष्ण आपले बोलणे गोड आहे. आपले चरित्र सुंदर आहे. आपण परिधान केलेले वस्त्रे हे सुंदर आहेत. आपण देहुडा उभे राहतात तेही सुंदर आहे. आपलं चालणं सुंदर त्याचबरोबर फिरणं सुंदर हे सुंदरतेचे स्वामी आपलं सर्व काही सुंदर आहे.
वेणुर्मधुरो रेणुर्मधुर: पाणिर्मधुर: पादौ मधुरौ |
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||३||
आपली बासरी गोड,डोक्यावर लावलेले पुष्प सुंदर, आपला हात सुंदर, आपले चरण सुंदर, आपलं नृत्य आपण केलेली मित्रता ही सुंदर आहे, हे सुंदरतेचे स्वामी आपलं सर्वच सुंदर आहे.
गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् |
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||४||
आपले गीत गोड, आपले खाने गोड, आपले पिणे गोड. आपले झोपणे गोड, आपले स्वरुप गोड, आपण भाळी लावलेला टिळा ही सुंदर, सुंदरतेचे अधिपती आपलं सर्व काही सुंदर आहे.
करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् |
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||५||
आपले कार्य गोड, आपले पोहणे गोड, आपण केलेली चोरी ही गोड, आपलं प्रेम गोड, आपले शब्द गोड, आपला शांत स्वभाव गोड, मधुरताचे देवता आपले सर्वच गोड आहे.
गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा |
सलीलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||६||
आपले दिसणे गोड, गळ्यातील माळ सुंदर ,यमुना सुंदर, यमुनेतील जल ही सुंदर, त्यामध्ये असलेले कमळ ही सुंदर, सुंदरतेचे देवता आपले सर्वच सुंदर आहे.
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् |
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||७||
आपल्या गोपिका सुंदर, आपल्या लीला गोड, आपण गोपिकासोबत ही सुंदर दिसता, त्या नसल्यानंतरही सुंदर दिसता, आपली दृष्टी सुंदर आपली शिष्ट सुंदर सुंदरतेचे स्वामी आपलं सर्व काही सुंदर आहे.
गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा |
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||८||
आपल्या समावेत असलेले गोपाळ सुंदर, गाई ही सुंदर, आपल्या हातातील काटी ही सुंदर, आपली सृष्टी सुंदर, सृष्टीचा केलेला विनाश सुंदर, आपण दिलेला वरही सुंदर, हे सुंदरतेचे स्वामी आपले सर्व काही सुंदर आहे.
|| इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकम् सम्पूर्णम् ||
अशा रीतीने भगवंताच्या सुंदरतेचे वर्णन श्रीवल्लभाचार्याने मधुराष्टक Madhurashtakam या संस्कृत श्लोकामध्ये केलेले आहे.