ganesh chaturthi 2025 वक्रतुण्ड महाकाय: गणेश चतुर्थीसाठी खास श्लोक आणि त्याचे महत्त्व गणेश चतुर्थीचा उत्सव जवळ आला आहे! या मंगलमय पर्वात गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे. गणपती हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हणून ओळखला जातो.
कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
या लेखात आपण ‘वक्रतुंड महाकाय’ या प्रसिद्ध श्लोकाचे महत्त्व आणि संत निवृत्तीनाथांच्या सुंदर अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत, जे या गणेशोत्सवाचा आनंद अधिक वाढवतील.
Table of Contents
गणेश चतुर्थी विशेष: वक्रतुंड महाकाय श्लोक आणि संत ज्ञानेश्वर अभंग ganesh chaturthi 2025
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सदरील संस्कृत श्लोकामध्ये भगवान गणेशाचे वर्णन केलेले आहे. या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की वक्र म्हणजे वाकडे तुंड म्हणजे सोंड होय. ज्याची वाकडी सोंड आहे.
ज्याचे पोट विशाल आहे आणि ज्याचे तेज कोट्यावधी सूर्याच्या समप्रमाणात आहे. अशा असणाऱ्या गणपती देवा आमच्या कार्यामध्ये आपण सर्वदा हजर राहावे आणि कार्यनिर्विघ्नपणे पार पाडावे अशी विनंती.
संत निवृत्तीनाथ अभंग ganesh chaturthi 2025
आकार चरण युगल| उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे | |
ज्ञानेश्वरी १/१३
या गणपतीसारखा शरीर यस्टी असलेला पुत्र आपल्याला असावा असे कोणत्याही आई-वडिलांना वाटणार नाही. तरीही प्राचीन ऋषीमुनींनी गणपतीला विशेष महत्त्व दिलेले आहे.
कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करताना प्रथम गणपतीचे पूजन होते. मंदिरामध्ये भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची असेल, एखाद्या कार्याचा कलश स्थापन करायचा असेल, इमारतीची पायाभरणी असेल, लक्ष्मीपूजन असेल, विवाह प्रसंग असेल इ. कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते.
प्रसंगी गणपतीची मूर्ती उपलब्ध नसेल तर सुपारीचा गणपती बनवून अग्रपूजा केली जाते. नाटके, चित्रपट, तमाशे इत्यादी कार्यक्रमाची सुरुवात गणेशाची आराधना करून करतात. अनेक ग्रंथाची सुरुवात गणेशाच्या स्तवनानेच होते.
संत निवृत्तीनाथ अभंग ganesh chaturthi 2025
देवा तुची गणेशु | सकलार्थ मतिप्रकाशु |
म्हणे निवृत्ती दासु | अवधारी जो जी ||
ज्ञानेश्वरी १/२
गणपती या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे करता येईल. गण म्हणजे समुदाय जसे:- देवगण, राक्षसगण, मरुतगण, मानवगण इ. पति म्हणजे मालक किंवा नेता होय. गणपतीलाच गणेश असे देखील म्हणतात. गणपती सर्व गणांचा नेता होय. नेता हा नेहमी गणपती सारखा असला पाहिजे. गणपतीचे डोके हत्तीचे आहे.
हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे. जीवनात यशाचे उंच शिखर गाठायचे असेल तर नेताही बुद्धिमान असला पाहिजे. हत्तीचे नाक म्हणजेच सोंड लांब असते. त्यामुळे दूरपर्यंतचे हुंगायला ती समर्थ असते.
त्यामुळे दूरचा गंध हत्ती सहज घेऊ शकतो. दूर शिजत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टीचा गंध प्रथम नेत्याला आला पाहिजे.
गणपतीला सुपकर्ण असेही एक विशेषणआहे. याचा अर्थ सुपासारखे कान असलेला. नेत्याचे कान गणपतीच्या कानासारखे असले पाहिजेत. सुप नेहमी सार गोष्ट आपल्याकडे ठेवते आणि असार गोष्ट टाकून देते.
नेत्याच्या कानाने नेहमी वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी ग्रहण केल्या पाहिजेत. हत्तीचे डोळे लहान असतात परंतु लहानात लहान गोष्टी ते पाहू शकतात तसे नेत्याच्या लहान गोष्टी सुद्धा पाहिल्या पाहिजे.
गणपतीचे पोट मोठे आहे. अनेक भक्ताचे अपराध साठवण्यासाठी मोठ्या पोटाची आवश्यकता असते. त्यामुळे ते मोठे आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. उंदीर हा आकाराने लहान असतो. त्यामुळे तो कोणत्याही घरी सहज जाऊ शकतो.
आपल्याला जर घराघरात पोहोचायचे असेल तर आपले वाहन हे उंदरासारखे लहानच असले पाहिजे हे नेत्याला समजले पाहिजे. उंदीर जसा कोणत्याही घरात सहज पोचतो तसे नेत्याचा कार्यकर्ता कोणत्याही घरात सहज पोहोचला पाहिजे. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला दुर्गा वाहतात. दूर्वाला व्यवहारामध्ये विशेष असे महत्व नाही.
त्याकडे एक तृण म्हणून पाहिले जाते. जेव्हा अशा सामान्य तृणाचा दोर वळला जातो, म्हणजे सामान्य गोष्टी एकत्र येतात तेव्हा मोठाले हत्ती सुद्धा त्याने बांधले जातात.
तसे ज्यांना कोणी आश्रय देत नाही अशा सामान्य कार्यकर्त्याला एकत्र करून आपण मोठे सत्ता उलथापालत करू शकतो हे नेत्यानी गणपती कडून शिकले पाहिजे.
गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश आहे. दुसऱ्या हातात परशु, तिसऱ्या हातात मोदक तर चौथा हातात आशीर्वाद देत आहे. यातील अंकुश हा वासना विकारावर संयमाची गरज आहे असे सुचवतो. तर परशु हा वेळप्रसंगी इंद्रियांना किंवा अनुयायाना शिक्षा करण्याचे सामर्थ्य दाखवतो.
मोद म्हणजे आनंद. ज्या सात्विक आहारामुळे आनंद प्राप्त होतो असा आहार मानवाने घेतला पाहिजे मोदक सुचवतो. अशा रीतीने गणपतीकडे असलेले सर्व गुण आपल्या जीवनात सर्वांनीच अंगीकारले पाहिजेत.
ते सर्व गुण आपल्या अंगी यावेत म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला. या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग त्यांनी लोक जागृती करण्यासाठी केला. आजही या गणेशोत्सवामध्ये समाज सुधारण्याचे कार्यक्रम घेतले जातात.
भारतीय संस्कृतीमध्ये विशेषता महाराष्ट्र मध्ये प्राचीन काळापासून घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा चालत आलेली आहे.
गणपती बाप्पा मोरया ‘अशा घोषणा देत गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांमध्ये गणपती आणून त्याची पूजा केली जाते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ganesh chaturthi 2025