You are currently viewing Yoga Day –  मन आणि शरीराला शांत करणारे करणारे संस्कृत योग मंत्र

Yoga Day –  मन आणि शरीराला शांत करणारे करणारे संस्कृत योग मंत्र

 योगासने का करावीत यासाठी अनेक Yoga Day sanskrit shlok संस्कृत श्लोक लिहिले गेले आहेत.मानवी जीवनामध्ये योगासनाचे फार मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा जागतिक ‘योग दिन‘ म्हणून जाहीर केला आहे.

योगासने नियमित केल्याने माणसाचे जीवन निरोगी, सुंदर आणि स्वस्थ बनते. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गीतेमध्ये योगाचे अनन्य साधारण महत्व सांगितलेले आहे. अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण त्यांना योगी होण्याचा सल्ला देतात. जो योगी होतो तो कधीही रोगी होत नाही.

असा सुंदर संदेश श्रीकृष्णाने भगवान भगवद्गीते दिला आहे. हा योग मानवी जीवनासाठी किती आवश्यक आहे. तो कसा करावयास पाहिजे ही सर्व माहिती महर्षी पतंजलीने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या ग्रंथामध्ये लिहून दिलेले आहे. अशा पतंजली ना नमस्कार करून आपण काहीसे योगाची माहिती संस्कृत श्लोकांमधून घेऊयात.

Yoga Day Sanskrit Shlok – महर्षी पतंजलीने योगाचे पहिले सूत्र आपल्या योग संहितेमध्ये सांगितले आहे.

योगश्चित्तवृत्तिनिरोध:|

या योगासनातील पहिल्या सूत्रामध्ये महर्षी पतंजलीने योगाची व्याख्या सांगितलेली आहे. योगाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी पतंजलीने योग म्हणजे चित्त वृत्तीचा विरोध करणे म्हणजेच योग होय. माणसाचे मन इंद्रियाद्वारे बाहेर पडून एखाद्या वस्तूवर तादात्म्य करते. त्याला चित्त वृत्ती असे म्हणतात. मन हे सर्व इंद्रियाचे स्वामी आहे. मनाचा स्वभाव पाण्यासारखा असतो पाणी जसे उतार असेल तिकडे धावते तसे माणसाचे मन देखील अधोगतीने धावते.

पाण्याला उर्ध्व दिशेने न्यायचे असेल तर काही शक्तीने कार्य करावे लागतात. तसं मानवी मनाला(चित्ताला )प्रगतीकडे न्यायचे तर त्याला परमात्म्याकडे लावावे लागते. हे मन इतरत्र भटकू न देता ते स्व स्वरूपाला जाणून परमात्म्याकडे नेहणे यालाच चित्तवृत्ती विरोध म्हणजेच योग असे म्हणतात. त्यामुळे सर्व संताने मनाला ईश्वराच्या चरणी लागावे अशी विनंती केलेली आपल्याला दिसून येते.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. ‘मन हा मोगरा अरपुनी ईश्वरा पुनर्रपी संसारा येणे नाही’.’ देवा माझे मन लागो तुझे चरणी’ ‘मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी’अशा अनेक अभंगातून मनाला ईश्वरचरणी लागण्याची प्रार्थना केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ‘माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी नाव  पांडुरंगी मन रंगले’संत रामदासांनी तर मनाचे श्लोक भगवंताकडे मन लावण्यासाठी लिहिलेले आहेत. हा योगाचाच भाग आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या गीतेमध्ये अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात.

Yoga Day sanskrit shlok- योगी कोणाला म्हणतात?

ज्याचे ध्येय केवळ परमात्म्यामध्ये लीन होणे हेच आहे. म्हणजे जो परमात्मा प्राप्तीसाठीच ध्यान योग करणारा आहे ,सिद्धी आणि भोगाच्या प्राप्तीसाठी नाही, त्याला’ योगी ,’म्हणतात.

Yoga Day Sanskrit Shlok

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं  त्यक्त्वा धनञ्जय|

सिद्ध्यसिध्द्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्चते||

(श्रीमद्भगवद्गीता २ /४८)

हे धनंजय तू सर्व आसकतीचा त्याग करून, सिद्धी आणि अशिद्धी मध्ये समता करून सर्व कर्मे कर, कारण समत्वाला च योग असे म्हणतात.

भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाने केलेली योगाची व्याख्या 1 – समत्वम योग उच्चते| 

समत्वाला च योग असे म्हणतात.

भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाने केलेली योगाची व्याख्या 2 – योग: कर्मसु कौशलम् |

कुशलतेने काम करणे म्हणजेच योग आहे.

भगवान श्रीकृष्ण

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कते|

तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्||  

(श्रीमद्भगवद्गीता २/५०)

  ज्याची बुद्धी समत्व झालेली आहे आणि समत्व बुद्धी करून  जो कार्य करतो तो पाप आणि पुण्य याचा त्याग करतो. कुशलतेने काम करणे म्हणजेच योग आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो. योगामध्ये आसनाला फार महत्त्व आहे. ही असणे कशी केली पाहिजेत हे आपणाला महर्षी पतंजलीने सांगितले आहे. त्याचबरोबर योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितलेले आहे. योग्यांची माऊली असलेले ज्ञानराज माऊलींनी पण सांगितलेले आहे. ही योगासने करण्यासाठी आपण ठिकाण कसे निवडावे हे श्रीकृष्णाने गीतेच्या सहाव्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे.

 शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन:|

नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ||११||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६

भूमीच्या ज्या जागेवर योग करायचे आहेत ती भूमी शुद्ध असली पाहिजे. भूमी शुद्ध दोन गोष्टींनी होते. एक स्वभाविक शुद्धा म्हणजेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी , परमात्म्याची मंदिरे, गंगा नदी काठ , तुळशीजवळ, पिंपळाजवळ, वटवृक्षाजवळ, इत्यादी दुसरे म्हणजे आपण शुद्ध केलेले स्थान जसे गाईच्या शेणाने सारवून शुद्ध करणे. अशा शुद्ध केलेल्या भूमीवरती सुरुवातीला दर्भ टाकावा, त्यावर मगाजीन म्हणजेच हरणाचे कातड्यापासून तयार केलेले आसन, त्यावर सुती वस्त्र अंथरावे. मृगाजीन म्हणजे हरणाची कातडे नाही मिळाल्यास दर्भावरती घोंगडी टाकून त्यावर सुती कपडा टाकून आसनस्थ व्हावे. हे स्थान जमिनीपासून अति उंच ही नसावे आणि अत्यंत खोल ही नसावे. अशी योगासनाची भूमी निवडावी.

तत्रैकाग्रं मन: कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिय: |

उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ||१२||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६

त्या आसनावर सिद्धासन, पद्मासन, सुखासन इत्यादी ज्या कोण्या आसनामध्ये आपल्याला सहज बसता येईल असे बसावे. इंद्रियाच्या, चित्ताच्या ,मनाच्या सर्व क्रिया शांत करून मन एकाग्र करून आसनस्त व्हावे. यामध्ये मन परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र होणे ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. नंतर अंत:करणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. भूमी कशी असावी वरील श्लोकात सांगितले आहे. आसन कसे असावे हेही सांगितले आहे. मन कसे असावे हेही वरील श्लोक सांगितले आहे. आसनावर बसताना कोणत्या स्थितीत बसावे हे पुढील संस्कृत श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून सांगितलेले आहे.

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: |

सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||१३||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६

कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागास ‘काय’ असे म्हणतात.

गळ्याच्या वरच्या भागाला ‘शिर’ म्हणजेच डोके असे म्हणतात. आणि मानेला ग्रीवा असे म्हणतात. काय, ( शरीर)  शिर (डोके ) आणि ग्रीवा  (मान )एका सरळ रेषेत म्हणजेच पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. आपली दृष्टी दाहि दिशेकडे न वळवता ती सरळ आपल्या स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर स्थिर करावी. अशा रीतीने योगासनासाठी बसावे.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत: |

न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ||१६||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६

सदरील संस्कृत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून योग्याला आहार आणि विहार या संदर्भात माहिती दिलेली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात योग हा अति खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि काहीच न खाणाऱ्यालाही साध्य होत नाही.

तसेच योग हा अति झोपण्याने ही साध्य होत नाही आणि पूर्ण जागे राहिल्याने ही साध्य होत नाही. म्हणजे आपला आहार सात्वीक आणि योग्य प्रमाणात असला पाहिजे. तसेच झोपही योग्य प्रमाणात असली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी समत्व योग उच्चते असे म्हटलेले आहे. याचा अर्थ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोय आणि न्यूनताही नको आहे.

युक्ताहारविहारस्य  युक्तचेष्टस्य कर्मसु |

युक्तहवप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा ||१७||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६

योग हा योग्य प्रमाणात सात्विक आहार घेणाऱ्याला आणि योग्य प्रमाणात झोप घेणाऱ्यालाच साध्य होतो. योग्याचे जीवनामध्ये काय फल आहे हे भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये सांगतात.

वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव 

दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् |

अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा 

योगी परं स्थान मुपैति चाद्यम् ||२८||

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८

योगी होण्याचे काय महत्त्व आहे ते भगवान श्रीकृष्ण सदरील श्लोकामध्ये सांगतात. वेद जाणल्याने जे पुण्य फळ मिळते ,यज्ञ केल्याचे जे पुण्यफळ आहे, तप केल्याचे जे पुण्य फळ आहे आणि तसेच दान केल्याचे जे पुण्य फळ आहे. या सर्वांची शास्त्राने जी जी पुण्य फळ सांगितलेली आहेत. त्या  सर्वच पुण्य फळापेक्षा योग्याचे पुण्याफळ अधिक असते आणि त्यामुळेच तो परमात्मा पदाला प्राप्त होतो. योगी होऊन परमात्मा पदापर्यंत पोहोचता येते असे योगाचे महत्त्व आहे.

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave a Reply