You are currently viewing सूर्य नमस्कार: मंत्र पूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी Surya Mantra

सूर्य नमस्कार: मंत्र पूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी Surya Mantra

सूर्य एक आकाशातील तारा आहे. तू एक तप्त गोळा आहे. असे असले तरी तो पृथ्वीवरील सर्व जीवनमात्राचा प्राण आहे. सूर्यामुळेच सर्व सजीव सृष्टी जिवंत आहे. सूर्यामुळे वनस्पती आपले अन्न तयार करू शकतात. वनस्पतीवर सर्व प्राणी  अवलंबून आहेत. सूर्याशिवाय कोणताही जीव या पृथ्वीवर जीवंत राहू शकत नाही म्हणून भारतीय संस्कृतीने त्याची ऋण व्यक्त केले आहे. सूर्याला जगाचा आत्मा आहे. असे ऋग्वेदातील संस्कृत श्लोकांमध्ये  Surya Mantra सांगितलेले आहे.

सूर्यनमस्कार (Surya Mantra)

  ‘सूर्य आत्मा जगतस्यस्थुषश्च |  (ऋग्वेद)

 भारतीय संस्कृती सूर्याची उपासना करते. त्यामुळे जगातील सर्वच लोकांनी सूर्याची उपासना करावी.सूर्याची उपासना सूर्यनमस्काराने करतात. सूर्यनमस्कार हा सूर्याची उपासना आहे. त्याचबरोबर सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक प्रकार देखील आहे. शरीराला सशक्त बनवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार (Surya Mantra) होय. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या प्रत्येक अंगाचा व उपांगाचा व्यायाम होतो. सूर्य उपासनेमुळे बुद्धी तेजस्वी होते. त्यामुळे लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनीच सूर्यनमस्काराचा व्यायाम आत्मसात करायला पाहिजे. 

सूर्यनमस्कारासाठी कोणते मंत्र? संस्कृत श्लोकांचा अर्थ आणि महत्व

ध्येय: सदा सवितृमण्डलमध्यवर्ती

नारायण: सरसिजासनसन्नि विष्ट:|

केयूरवान् मकरकुण्डलवान् कीरीटि 

हारी हीरण्यमयवपुर्धृतशङ्खचक्र:||

वरील संस्कृत श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल. सूर्य बिंबाच्या मध्यभागी कमळ आकार असणावर बसलेल्या सोन्यासारखे तेजस्वी शरीर असलेल्या, मस्तकावर मुकुट धारण केलेल्या, गळ्यामध्ये हार, बाहू मध्ये भूषणे आणि कानामध्ये मकराकार कुंडली घातलेल्या व हातामध्ये शंख, चक्र आदी आयुध धारण केलेल्या भगवान नारायणाचे नेहमी ध्यान करावे. 

सूर्याची महिमा: संस्कृत श्लोकांमध्ये बारा नावे

सूर्यनमस्कार (Surya Mantra)करताना व्यायामाच्या त्यामध्ये स्टेप्स (पायऱ्या) आहेत. सूर्यनमस्कार त्या बारा स्टेपला सूर्याच्या प्रत्येक नावाचा उच्चार करून त्या पूर्ण कराव्यात. ती बारा नावे पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत. 12 surya mantra

 ॐ मित्राय नमः | ॐ रवये नमः | ॐ सूर्याय नमः|

 ॐ भानवे नमः | ॐ खगाय नमः | ॐ पुष्णै नमः |

 ॐ हिरण्यगर्भाय नमः |  ॐ मरीचये नम: | ॐ आदित्याय     नमः

| ॐ सवित्रे नमः | ॐ अकार्य नमः | ॐ भास्कराय नम: |

सूर्य नमस्कारासाठी बारा मंत्र: संस्कृत श्लोक आणि त्यांचे अर्थ

 मित्ररविसूर्यभानुखगपुषहिरण्यगर्भमरीच्यादित्यसवित्रअर्क- भास्करेभ्यो नमो नमः|

सूर्यनमस्कार करून अनेकाने आपले जीवन तेजस्वी आणि प्रतिभा संपन्न बनवले आहे. सूर्य हा मानवाचा मित्र आहे. ऋषींनी ‘मित्राय नम:|’ म्हणून त्याला वंदन केलेले आहे.

 माणसाचे शरीर सशक्त तसेच मेहनत करणारे असले पाहिजे हे सुदृढ शरीर माणसाला सूर्यनमस्काराने प्राप्त होते. सूर्यनमस्काराने आपले शरीर स्वस्थ बनते. आपले शरीर सुदृढ असेल तरच देशाचे आणि धर्माचे रक्षण होते. शरीराला सशक्त बनवण्यासाठी सूर्यनमस्कार हा सरळ आणि सोपा मार्ग आहे. जीवनातील पहिले सुख निरोगी शरीर हे आहे. शरीर चांगले असेल तरच मनही निरोगी राहते. त्यामुळे ‘शरीरमाद्यं  खलु धर्मसाधनम्’ असे आपल्या ऋषीमुनींनी म्हटले आहे. त्यामुळे त्यामुळे आपण म्हटले पाहिजे जो करेल सुर्यनमस्कार (Surya Mantra) तो करेल रोग राहिला हद्दपार. 

सूर्यनमस्कार: योग, आरोग्य, तंदुरुस्ती, संस्कृत श्लोक

आदित्यस्यं नमस्कारान् ये कुर्वंन्ति दिने दिने |

 जन्मातरसहस्रेषु  दारिद्यं नोपजायते ||१||

या संस्कृत श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल. जो व्यक्तीदररोज सूर्यनमस्कार करतो. त्याच्या हजारो जन्मामध्ये दारिद्रता येत नाही. सूर्यासंबंधीचा राजा भर्तृहरीने एक संस्कृत श्लोक लिहिला आहे.

रथस्यैकं चक्रं भुजगयमीता: सप्त तुरगा: 

निरालम्बो मार्गश्चरणविकल: सारथिरपि |

रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभस: 

क्रियासिद्धि: सत्वे भवति महतां नोपकरणे||

   सदरील संस्कृत श्लोक मानवाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. या संस्कृत श्लोकामध्ये मानवाच्या जीवनातील यश तो वापरत असलेल्या साधनावर अवलंबून नसून त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते  असे सांगितले आहे. या संस्कृत श्लोकांमध्ये जे लोक कार्यातील अडचणी सांगतात ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत आणि जे यशस्वी होतात ते कधीही जीवनात अडचणी सांगत नाहीत हे सूर्याचे उदाहरण घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. सूर्याच्या जीवनात अनंत अडचणी आहेत पण तो त्यावर मात करून आपले नियमित काम यशस्वीपणे पार पाडतो हे सांगितले आहे. रथ चालण्यासाठी दोन चाकाची आवश्यकता असते. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. त्याला सात घोडे असून ते सापाच्या लगामाने आवरले जातात. सूर्याचा रथाचा सारथी पांगळा आहे. त्याचा रथ चालण्याचा मार्ग अधांतरीचाआहे. तरीही सूर्य या सर्व अडचणीवर मात करून आपले दररोजचे काम नियमितपणे पार पाडतो. मानवाने सूर्याकडून या गोष्टीचा प्रेरणा घेऊन आपले जीवन व्यतीत करावे.जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. सूर्याचे आपल्या जीवनात अनंत उपकार आहेत. म्हणून त्याची आराधना सर्वांनी करावी.

सूर्यनमस्कार झाल्यानंतर प्रसाद सेवन करताना म्हणायचा श्लोक

अकालमृत्युहरणं  सर्वव्याधिविनाशनम् |

 सूर्यपादोदकं तीर्थं  जठरे धारयाम्यहम् ||२||

आनेन  नमस्काराख्येन कर्मणा श्रीसवितृसूर्यनारायण : प्रियताम् |

Leave a Reply