You are currently viewing Small Sanskrit Thought – संस्कृतातील लहान विचारांचा मोठा प्रभाव

Small Sanskrit Thought – संस्कृतातील लहान विचारांचा मोठा प्रभाव

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे small sanskrit thought अर्थांसह संग्रहित केले आहेत.

Small Sanskrit Thought – 1 to 10

काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् |

बुद्धिमान व्यक्ती आपला काळ काव्य करण्यात, शास्त्र लिहिण्यात किंवा विनोद करण्यात घालवतो.

व्यसनेन तू मूर्खाणां निद्रया कलहेन वा |

मूर्ख माणसे आपला अमूल्य वेळ व्यसनामध्ये, झोपेमध्ये किंवा भांडणांमध्ये घालवतात. 

मूर्खहस्ते न दातव्यम् एवं वधति पुस्तकम् |

 मुर्खाच्या हाती मला सोपऊ नका असे पुस्तक आपले मनोगत व्यक्त करते.

सम्भावितस्य चाकिर्तिर्मरणादतिरिच्यते |

स्वाभिमानी माणसाला अपकीर्ती मरणा पेक्षा जास्त दुख:दायी असते. श्रीमद् भगवद्गीता

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते |

धर्मयुद्धापेक्षा क्षत्रिय साठी दुसरे कोणतेच महान (कल्याणकारी) कार्य नाही. श्रीमद्भगवद्गीता

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |

धर्ममय युद्धात जर मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्त होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल. श्रीमद्भगवद्गीता

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: |

म्हणून अर्जुना उठ जागा हो आणि युद्धासाठी तयार हो.  श्रीमद् भगवद्गीता

नियतं कुरु कर्म त्व |

नियतीने तुझ्या वाटणीला आलेले कर्म कर.  श्रीमद्भगवद्गीता

मनस्वी कार्यार्थी न गणयति दु:खं |

 मनातून कार्य करणारा कार्यामुळे आलेले दुःख कधी पाहत नाही.

 विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन |

विद्वानाची आणि राजाची कधीही तुलना होऊ शकत नाही.

Small Sanskrit Thought – 11 to 20

स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते |

राजाला आपल्या स्वतःच्या राज्यात किंमत असते परंतु विद्वानाला मात्र पूर्ण जगतामध्ये किंमत असते. म्हणून माणसाने विद्वान व्हावे. 

सततं कार्यं समाचर |

मानवाने निरंतर चांगल्या कर्माचे आचरण करावे.

रिपोरभिमुखे श्लाघ्य: शुराणां वध ईप्सित:|

शत्रूच्या समोर पराक्रम गाजवताना मृत्यू येणे हेच वीरांचे भूषण आहे. श्रीमद्भागवत

पौरुषं यावन्न विपद्येत पुष्कलम् |

बुद्धिमान माणसाने आपल्या कल्याणासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. श्रीमद्भागवत

सुखाय दु:खमोक्षाय संकल्प इह कर्मिण:|

सुख मिळवणे आणि दुःखापासून सुटका करून घेणे कर्माचे हे दोनच उद्देश आहेत. श्रीमद् भागवत

विनाशकाले विपरीतबुद्धि:|

विनाशाची वेळ आली की बुद्धी फिरते.

जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपि गरीयसी |

आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महत्त्वाची असते. 

अति सर्वत्र वर्जयेत् |

चांगली  किंवा वाईट असो कोणत्याही गोष्टीचा माणसाने अतिरेक करू नये. 

वाग्भूषणं भूषणम् |

मधुर वाणी हे सर्वात मोठे भूषण आहे.

सत्यं कण्ठस्य भूषणम्|

सत्य हे कंठाचे  भूषण आहे.

Small Sanskrit Thought – 21 to 30

परोपकारार्थ इदं शरीरम् |

परमात्म्याने हे शरीर परोपकार करण्यासाठी दिले आहे.

अमन्त्रम् अक्षरं नास्ति |

ज्यात मंत्र नाही असे अक्षर नाही.

अनौषधं मुलं नास्ति|

ज्यात औषधी गुणधर्म नाहीत असे एकाही झाडाचे मूळ नाही.

अयोग्य: पुरुष: नास्ति |

ज्याचा काहीच उपयोग नाही असा मनुष्य नाही.

दैवमेवेति सञ्चित्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत् |

दैवच सगळं करेल म्हणून माणसाने स्वतःचा चालू असलेला उद्योग सोडू नये.

अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्य: प्राप्तुमर्हति |

काहीच प्रयत्न न करता तिळापासून तेल निघणे शक्य नाही.

गुणा:  कुर्वन्ति  दूतत्वं दुरेऽपि वसतां सताम् |

सज्जन माणूस कितीही दूर असला तरी त्याचे सद्गुण त्याच्या दुताचे काम करतात.

प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति |

उत्तम प्रतीची माणसे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय कधीही सोडत नाहीत.

ज्ञान पंथ कृपाण कै धारा |

ज्ञानमार्गावरून चालणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे अत्यंत कौशल्याचे व धोक्याचे काम आहे. 

यादृशं वपते बिजं क्षेत्रमासाद्य कर्षक: |

शेतकरी शेतीमध्ये ज्या प्रकारचे बीज फिरतो त्या प्रकारची त्याला फळ मिळते. ( शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी) 

Small Sanskrit Thought – 31 to 37

सुकृते दुष्कते वाऽपि तादृशं लभते फलम् |

माणसाने चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळते.

उत्तमो नातिवक्ता स्यादधमो बहु भाषते |

उत्तम प्रतीचे लोक कार्य जास्त करतात आणि कमी बोलतात पण हलक्या प्रतीची लोक कार्य कमी करतात आणि जास्त बोलतात. 

आगतं तु भयं वीक्ष्य नर: कुर्याद् यथोचितम् |

जीवनात समस्या  (संकट ) येण्यापूर्वीच त्यांच्या  प्रतिकारासाठी योग्य तो उपाय करावा. 

पुरुष: श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा चतुर्भि परिक्षते |

माणसाची परीक्षा  शिक्षण, च्यारित्र्य, सदगुण आणि कार्य या चार गोष्टीने केली जाते. 

यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |

ज्या ठिकाणी बुद्धिमान लोक नसतात त्या ठिकाणी कमी बुद्धीच्या माणसाची देखील प्रशंसा होते.

निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते |

ज्या देशात मोठे वृक्ष नाहीत त्या देशात एरंड देखील पुजले जातात. (वासरात लंगडी गाय शहाणी)

मौनं सर्वार्थसाधनम्  |

 मौन सर्वदृष्टीने फायदेशीर असते.

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave a Reply