You are currently viewing शिव संस्कृत श्लोक

शिव संस्कृत श्लोक

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे शिव संस्कृत श्लोक आहे.

शिव संस्कृत श्लोक  1

(भगवान शिवजी च्या या मंत्राला महामृत्युंजय मंत्र असे म्हणतात. ‘ॐ’ या यज्ञातील आहुतीने सुगंधित झालेल्या हे त्रिनेत्रधारी आम्ही आपली उपासना करत आहोत. एखादी कोवळी काकडी तिच्या देठापासून सहज विलग करतात. त्याचप्रमाणे ह महादेव शंकरा आम्हाला तू मृत्यूच्या बंधनापासून सोडव. म्हणजे आम्हाला अमरत्व आपोआप मिळेल.

 ऋग्वेदाच्या सातव्या मंडळातील 59 व्या सुक्तातील बारावा मंत्र आहे. या शिव मंत्रामध्ये भक्ताने मृत्यूच्या भयाचे निरसन होण्यासाठी त्रिनेत्रधारिस विनम्र प्रार्थना केले आहे.

हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. भगवान शंकराचे पूजन करून या मंत्राचा नित्य नियमाने जप केल्याने असाद्य रोग नाहीसे होतात .ग्रहप्रकोप, अपमृत्यू ,संकट यांचे निवारण होते . तसेच मनातील इच्छा पूर्ण होतात. भाव धरून या मंत्राचा जप करणारा साधक शेवटी मोक्षाला प्राप्त होतो.)

विद्या संस्कृत श्लोक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिव संस्कृत श्लोक  2

(कापरासारखा शुभ्र वर्ण असणाऱ्या, करुणेचा दयासागर असणाऱ्या, संसार उत्पत्तीचा सार असणारे, ज्यांच्या गळ्यामध्ये सर्पराज नागेंद्रचा हार आहे. नेहमी आनंदी राहणाऱ्या आणि ज्यांची हृदय कमळाप्रमाणे आहे असे भगवान शंकर सह पार्वती माता दोघांना मी नमस्कार करतो. संस्कृत सुभाषित कवीने त्रिनेत्रधारी शंकराला या श्लोकातून नमस्कार केलेला आहे)

शिव संस्कृत श्लोक 3

( महेशा सारखा म्हणजेच भगवान शिवजी एवढा मोठा कोणता देव नाही म्हणून त्यांना महादेव असे म्हणतात. महादेव म्हणजे मोठा देव. शिवजी ची स्तुती महिम्नस्तोत्रा मध्ये केली आहे म्हणून महिम्न पेक्षा मोठे कोणते स्तोत्र नाही. अघोर मंत्र ‘ॐ नमः शिवाय ‘यासारखा दुसरा महानमंत्र नाही आणि जीवनामध्ये गुरु पेक्षा मोठं कोणत तत्व नाही. सदरील श्लोकामध्ये शिवजीचे मोठेपण त्यांची स्तुती करणाऱ्या मोठे महिम्नाची महिमा, अघोर मंत्राचे महत्व आणि गुरु विषयीची श्रद्धा प्रगट केली आहे)

शिव संस्कृत श्लोक  4

(गळ्यामध्ये सर्प धारण करणा-या, त्रिनेत्र धारी, भस्माचा विलेपन करणाऱ्या, महान ईश्वर असणाऱ्या, नेहमी सुचिर्भुत अवस्थेत राहणाऱ्या आणि दिशा ज्यांची वस्त्र आहेत अस्या दिगंबर अवस्थेमध्ये राहणाऱ्या ‘न’कार स्वरूप शिवास मी नमस्कार करतो.)

शिव संस्कृत श्लोक  5

(मंदाकिनी म्हणजे गंगा सलील म्हणजे पाणी याचा अर्थ गंगाजल आणि चंदन यांचे विलेपन केलेल्या, नंदीचा ईश्वर भूतनाथ असे महेश्वराला आणि मंदार फुलासारख्या फुलांनी ज्यांचे पूजन केले जाते, अशा ‘म’कारस्वरुप भगवान शिवास मी नमस्कार करतो)

शिव संस्कृत श्लोक  6

(सूर्याची किरणे कमल पुष्पावर पडल्यावर कमल पुष्प विकसित होते. त्याप्रमाणे ज्यांचं मुखदर्शन झाल्यावर गौरी म्हणजेच पार्वतीचा चेहरा कमळाप्रमाणे फुलतो असे भगवान शिव, ज्यांनी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला, समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन करून देवतांना वाचवणारे नीलकंठ ज्यांच्या ध्वजावर वृषभ विराजमान आहे अशा ‘ शि’स्वरूप भगवान शंकरास शिवास मी नमस्कार करतो)

शिव संस्कृत श्लोक  7

(वशिष्ठ ,अगस्ती ,गौतमाचार्य यासारख्या ऋषीमुनींनी ज्या भगवान शंकराची पूजा केली आहे. ज्यांना चंद्र ,सूर्य आणि अग्नी यासारखे तीन लोचन म्हणजे डोळे आहेत अशा ‘व’कार स्वरूप भगवान शिवास मी नमस्कार करतो.)

शिव संस्कृत श्लोक  7

(यक्षाचं स्वरूप असणाऱ्या, जटा धारण करणाऱ्या, पिनाक नावाचे धनुष्य हातामध्ये धारण करणाऱ्या,सनातन धर्माचा ज्यांनी प्रचार केला, अशा दिव्यमान दिगंबर अवस्थेमध्ये राहणाऱ्या ‘य’कार स्वरूप शिवाला मी नमस्कार करतो)

शिव संस्कृत श्लोक  8

(शिव पंचाक्षर स्तोत्र भगवान शंकराचार्यांनी लिहिले आहे. या मध्ये त्यांनी भगवान शिवजी चे वर्णन केलेला आहे. भगवान शिवजी चा जो पंचाक्षरी मंत्र आहे तो ‘नमः शिवाय’ या मंत्राचा सार या पंचाक्षरी स्तोत्र मध्ये दिला आहे. या पंच अक्षरी मंत्रामध्ये पंचमहाभूतांची तत्त्वे आहेत. ते पुढील प्रमाणे

न –हे पृथ्वी तत्व आहे.

म–हे जल तत्व आहे.

शि–हे अग्नी तत्व आहे.

वा– हे वायू तत्व आहे.

य–हे आकाश तत्व आहे.

 असा हा सर्व पंचमहाभूत तत्वानि युक्त मंत्र आहे.  हा पंचाक्षरी मंत्र जे नेहमी उच्चारण करतात. त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांती लाभते. मंत्राचा जप करणारे साधक सर्व भयापासून मुक्त होतात. ज्या घरामध्ये कालसर्पाची बाधा आहे. अशा घरांमध्ये हा भगवान शिव चा पंचाक्षरी मंत्राचा जप केल्यास कालसर्प बाधा दूर होते आणि शेवटी असा साधक मोक्षाला पोचतो. असे या शिवपंचाक्षरी मंत्राचे महत्व ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे)

शिव संस्कृत श्लोक  9

हा भगवान शंकराचा पंचाक्षरी मंत्र आहे. या पंचाक्षरी मंत्राला ‘ॐ’ हे षटाक्षर जोडलेले आहे .याचा अर्थ असा आहे .मी भगवान शिवाला नमस्कार करतो. या मंत्राचा सतत जप केल्याने मन प्रसन्न राहते. दररोज 108 वेळा हा मंत्र जप केल्यास भगवान शिवजी प्रसन्न होतात. हा मंत्र धाडस देणारा आणि उत्साहवर्धक आहे. भगवान शंकर हे भोळे दैवत असल्यामुळे त्वरित प्रसन्न होणारे आहे . शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात.’ वाचे वदता शिवनाम तया न बाधि क्रोध काम’. याचा अर्थ जो ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करतो त्याच्या जीवनात काम, क्रोधाधी विकार बाधत नाहीत.भगवान शंकराला प्रसन्न करण्यापासून ते मोक्षापर्यंत हा मंत्र जपला जातो. मनामध्ये भाव धरून जो या मंत्राचा निरंतर जप करतो तो मोक्ष पदाला प्राप्त होतो.)

Leave a Reply