You are currently viewing Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग

Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग

Sanskrit Shlok with meaning !!  एक श्लोकी रामायण !! Sanskrit Shlok !! एक श्लोकी रामायण अर्थ सहित !! एक श्लोकी भागवत

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे Sanskrit Shlok with meaning म्हणजे अर्थांसह संग्रहित केले आहेत.

Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग 1

जीवनामध्ये सुखाचा मंत्र या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेला आहे. या संस्कृत श्लोकाचा मिनिंग (meaning) पुढील प्रमाणे. प्रिय बोलण्याने सर्व प्राणिमात्रांना अधिकरुण मानवांना अतिशय आनंद होतो. म्हणून बोलत असताना माणसाने नेहमी प्रिय बोलावे.

अलीकडे समाजामध्ये प्रिय बोलणं या गुणाची कमतरता दिसत आहे. समाजामध्ये इतरांना मान देऊन बोलण्याचे ऐवजी त्याचा अपमान करून बोलण्याची रुढ प्रभावी झाल्याचे दिसत आहे. समोरच्याला अपमान करून बोललो याची सुद्धा फुशारकी मारताना बरेच जण दिसतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

बोलताना आपले बोलणे ‘साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे’ साच म्हणजे खरे आणि प्रेमळ असले पाहिजे. त्यामध्ये आपुलकी जिव्हाळा असला पाहिजे. असे बोलणे असेल तर तो अमृताचा कल्लोळ आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला सांगतात. ‘

बोलावे खरे बोलावे बरे कोणाच्याही मना पडू नये चरे ‘आपले बोलणे चांगले असावे. ते खरे असावे आणि ज्याच्या विषयी बोललो त्याचं मन दुखावेल असे बोलू नये. पाणी, नाणी आणि वाणी जपून वापरा असा संदेश देखील तुकोबारायाने दिलेला आहे . शस्त्राने केलेली जखम भरून येते. परंतु जीभेने केलेले जखम नेहमी मनामध्ये सलत राहते. सर्वसाधारणपणे मानवाचे वजन 50 ते 60 किलो असते. त्यांच्या जिभेच्या वजनाचा विचार केला  सुमारे 50 ग्रॅम असेल . 50 ते 60 किलोच्या माणसाला आपली 50 ग्रॅमची जीभ आवरणे कठीण आहे. जीभ जो खाताना आणि बोलताना आवरतो तो जीवनामध्ये सुखी होतो. जो जीभ जिंकतो तो जग जिंकतो. असा हा सुंदर संदेश या संस्कृत श्लोकांमध्ये (meaning) दिलेला आहे.

Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग 2

 सदरील संस्कृत श्लोक आपण भोजन करताना म्हणायचं आहे. या संस्कृत श्लोकाचा मिनिंग (meaning) पुढील प्रमाणे आहे.

     आपण जेव्हा जेव्हा भोजन करतो. तेव्हा तेव्हा नेहमी आपल्या भूमी मातेचे स्मरण केले पाहिजे. त्याचे कारण आपल्याला खाण्यासाठी जे अन्न मिळते आहे. ते भूमातेपासूनच मिळत आहे. आपली आई जसी आपल्ये संगोपन करते. भरण पोषण करते. त्याप्रमाणे भूमातादेखील आपलं पोषण करते. म्हणून लोक भूमीला माता म्हणतात. ती आपलं भरण पोषण करते म्हणून तिचा मोठ्याने जयजयकार करावा. भूमातेपासून मिळणारे हितकारक, सुखकारक आणि आरोग्यदायी अन्न आपण दररोज खातोत. असे उत्तम प्रतीचा अन्न खाल्ल्यानंतर आपले शरीर सुद्रढ होते. आणि अशा या सुद्रढ शरीराने त्या भूमी मातेचे संरक्षण करावे.         

  आपला देश कृषीप्रधान देश आहे. या देशातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जेवणासाठी लागणारे अन्नधान्य हा जगाचा पोशिंदा शेतकरी भूमातेची सेवा करून आपणा सर्वांना देत असतो. ऊन, वारा ,पाऊस, दुष्काळ इत्यादी संकटांना तोंड देऊन तो जगासाठी अन्न बनवत असतो.  जवान आपला जीवनातील प्रत्येक श्वास ,रक्ताचा थेंब मातृभूमीच्या रक्षणासाठी वापरत असतो.

म्हणून आपण सर्वांनी जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि देशाचे रक्षण करणारा जवान या दोघांचा जयजयकार केला पाहिजे. या दोघांच्या सन्मानासाठी लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान ‘हे घोषवाक्य तयार केले. किमान भोजन करताना तरी मातृभूमी, शेतकरी आणि सैनिक यांचा सर्वांनी जय जयकार करावा! हा या संस्कृत श्लोकाचा मीनिंग (meaning) आहे.

Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग 3

(एक श्लोकी रामायण ) संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा आहे. सदरील श्लोक संस्कृत श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जीवन कार्याचे वर्णन केलेले आहे. या संस्कृत श्लोकाचा मिनिंग (meaning) पुढील प्रमाणे सांगता येईल. रामायण हा फार मोठा हिंदूंचा ग्रंथ आहे. संस्कृत श्लोक कर्त्याने संपूर्ण रामायण एवढ्या छोट्याशा श्लोक मध्ये बसवले आहे.

  सूर्यवंशा मध्ये राजा दशरथ-कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र ज्येष्ठ पुत्राच्या स्वरूपामध्ये रामनवमीला प्रगट झाले. दशरथ राजाला तीन राण्या होत्या. कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी. कैकयीने दशरथ आला दोन वर मागितले. एका वरने ज्येष्ठ पुत्र राम याला गादीवर बसन्याचा अधिकार काढून त्याला वनवास द्यावा.

आणि दुसऱ्या वराने कैकयीचा पुत्र असणारा भरत याला राजगादीवर बसवावे. त्यामुळे प्रभू श्रीराम वनामध्ये गेले. बरोबर त्यांची पत्नी सीतादेवी ( वैदेहि) आणि लक्ष्मण होते. नाशिक  पंचवटी येथे वनात असताना येथे वनात असताना  सितेच्या पुढे एक सुंदर हरणाचे रूप घेऊन मारीच राक्षस आला. ते हरिण इतके सुंदर होते की सीता माईला त्या हरणाच्या मृगाजीनची चोळी शिवण्याचा मोह झाला.

त्यामुळे त्यांनी प्रभु रामचंद्राकडे त्याला मारून त्याची मृगाजीन आणण्याची विनंती केली. तो हरणाने प्रभू  रामचंद्राला दूर घेऊन गेला. प्रभू रामचंद्राने तो हरिण मारला. तोपर्यंत इकडे पंचवटीमधुन राक्षसांचा राजा रावण सीतामाईचे         (वैदेहि )अपहरण करून घेऊन गेला. रावण सीतामय्याला लंके कडे घेऊन जात असताना त्या रावणाला जटायू नावाच्या गिघ पक्षाने अडवण्याचा प्रयत्न केला. जटायू आणि रावणामध्ये युद्ध झाले.

या युद्धामध्ये जटायू जखमी झाला. प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत जटायू जवळ आले. जटायुने रामाला राक्षसांचा राजा रावण सीतेला लंकेला घेऊन गेला असल्याचे सांगितले आणि आपला प्राण सोडला. त्या युद्धात जटायला वीर मरण आले. प्रभू रामचंद्र सीता मैया चा शोध घेत किस्किंदा नगरीमध्ये आले. किस्किंदा नगरीचा अन्यायकारी राजा वाली त्याचा प्रभू रामचंद्रने वध करून किस्किंदेचे राज्य सुग्रीवाला दिले.

सुग्रीव व त्याचे वानर सैन्य घेऊन प्रभु रामचंद्राने लंके कडे जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला. त्या सेतुवरुण रामचंद्र व सर्व वानर सेना श्रीलंकेला गेले. तत्पूर्वी शेतीचा शोध घेण्यासाठी हनुमंताला लंके कडे पाठवले होते. हनुमंत सीतेचा शोध घेऊन आला त्याचबरोबर लंका जाळून देखिल

आला. पुढे रावणाचा लहान बंधू बिभिषण रामाला येऊन मिळाला. रावणाचे इतर बंधू कुंभकर्ण आदि रावणाकडून मारण्यात आले. इंद्रजित रावणाचा मुलगा याचा वध लक्ष्मणाने केला. पुढे रावण व रामाचे घनमोर युद्ध होऊन त्यामध्ये रावण मारला गेला. लंकेचे राज्य बिभीषणाला देऊन व सितेला सोबत घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये आले. त्यांचा 14 वर्षाचा वनवास संपला आणि त्यानंतर अयोध्या नगरीचा राजा राम झाला .

असी प्रभू रामचंद्राच्या जीवनाची इथंभूत माहिती या संस्कृत श्लोकामध्ये दिले आहे त्याचा मिनिंग( meaning)वरील प्रमाणे आहे.

Sanskrit Shlok with meaning – संस्कृत श्लोक विथ मिनिंग 4

( एक श्लोकी भागवत ) महाभारत हा ग्रंथ संस्कृत श्लोक रुपी असून यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे विस्तृत वर्णन केले आहे. वरील एका संस्कृत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र वर्णन केले आहे. या संस्कृत श्लोकाचा मिनिंग( meaning) पुढील प्रमाणे आहे.

  सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी मथुरेचा राजा कंसा होता. कंस आपल्या जनतेचाअतोनात छळ करत होता. कंसाने आपली बहीन देवकी वसुदेवांना पत्नी म्हणून दिली. भगवान श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकीच्या पोटी श्रावण शुध्द अष्टमीच्या दिवशी अवतराला आले. देवकी आणि वसुदेव कंसाच्या बंदीखाण्यामध्ये होते.

कारण आकाशवाणीने कंसाला देवकीचा आठवा पुत्र तुला मारेल असे सांगितले होते.भगवान श्रीकृष्णाने वसुदेवांना विनंती केली की मला नंदराजाच्या घरी नेऊन सोडा. त्याप्रमाणे वसुदेव आणि श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घालून पाऊस सुरू असताना देखील नंदराजाच्या घरी नेऊन दिले.

नंदराज हे गोप होते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे बालपण नंदराज- यशोदा मैया यांच्या घरी गेले. कंसाला कृष्णा पासून भीती असल्यामुळे कंसाने अनेक राक्षस पाठवून भगवान श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुरुवातीला कंसाची बहीण असणारी पुतना मायावी स्वरुप घेऊन कृष्णाला मारण्यासाठी गोकुळामध्ये आली.

परंतु भगवान श्रीकृष्णाने तिलाच ठार केले. त्यानंतर कंसाने श्रीकृष्ण मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले. परंतु भगवान श्रीकृष्णाला मारण्यामध्ये कोणीही यशस्वी झाले नाही.

म्हणून कंसाने युक्तिवाद करून अक्रुराकर्वी भगवान श्रीकृष्णाला मथुरेत आणले. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने मुष्टीर चानुर इत्यादी मल्ल मारले. त्यानंतर कंसाला सिंहासनावरून खेचून मारून टाकले. मथुरेचे राज्य उग्रसेनाला दिले.

        त्यानंतर मोठे झाल्यानंतर भगवान पांडवाच्या मदतीसाठी हस्तीनापूरला आले. कौरवानी पांडवावर केलेला अन्याय दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पांडवाची मदत केली. महाभारताचे युद्ध कौरव आणि पांडवात लढले गेले. त्यामध्ये युद्धातून निवृत्ती घ्यायची ठरवलेल्या अर्जुनाला गीता रुपी उपदेश केला.

हा गीता उपदेश सर्व मानव जातीला अर्जुनाचे माध्यम करून केला. या उपदेशाने प्रेरित होऊन अर्जुनाने युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये त्याची जीत झाली. पांडवाकडून सर्व कौरव व कौरव सैन्य मारले गेले.

हस्तिनापूरचे राज्यचा राजा युधिष्ठिरला केले. भगवान श्रीकृष्णाच्या या सर्व लीला भागवत ग्रंथामध्ये विस्तीर्ण सांगितलेले आहेत. त्या लीलाच संक्षिप्त स्वरूप एक श्लोकी भागवतामध्ये आहे. त्याचा सर्व मिनिंग( meaning) याप्रमाणे आहे.

सफलता पर संस्कृत श्लोक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply