You are currently viewing Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स अर्थांसह संग्रहित केले आहेत.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 1

नमामि शारदां देवीं विद्यारम्भे सुमङ्गलाम्|

नरतस्त्या प्रसादेन पाण्डित्यं लभते सुदा||

हे शारदा देवी आपणाला नमस्कार असो , मी विद्या शिकण्यासाठी आरंभ करत आहे. आपल्या कृपेचा प्रसाद ज्या मानवाला मिळतो तो नेहमीच पंडित होतो.

वज्ञात्रुटीतं प्रेम नवीकर्तुं क ईश्वर:|

सन्धि न याति स्फुटितं लक्षालेपेन मौतिकम् ||

जसे लाखेचा लेप देऊन फुटलेला मोती कधीही जोडता येत नाही तसे अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा नव्याने निर्माण करता येत नाही.

उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये |

पय:पानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम्  ||

मूर्ख माणसाला उपदेश केल्यानंतर तो कधीही शांत होत नाही उलट तो जास्त रागावतो जसे की सापाला दूध पाजल्या नंतर हि साप नेहमी विषच ओकतो.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 2

युक्तियुक्तमुपादेयं वचनं बालकादपि | 

अन्यत् तृणमिव त्याज्यमप्युक्तं पद्मजन्मना ||

बोलणे खरे असेल तर ते लहान मुलाचे देखील ग्राह्य धरावे आणि खोटे असे तर ब्रह्मदेवाचेही गवताच्या काडीप्रमाणे ( तुच्छ ) मानावे.

सर्वेऽत्र सुखिन:सन्तु सर्वे सन्तु निरामया|

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दु:खमाप्नुयात्||

सर्वजण सुखी असावेत, सर्वजण निरोगी असोत सर्वांना चांगल्या गोष्टी पहायला मिळोत, दुःख कोणाच्याही वाट्याला न येवो.

काले वर्षतु पर्जन्य: पृथिवी सश्याशालिनी |

देशोऽयं  क्षोभरहित: सज्जना: सन्तु निर्भया:||

देशात पाऊस वेळेवर पडो, पिकामुळे पृथ्वी हिरविगार सुंदर दिसो, देशामध्ये नेहमी शांतता नांदो, देशात सज्जन माणसे निर्भयपणाने राहोत.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 3

स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा नखा नरा|

इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परितेचेत् ||

दात , केस, नख आणि मनुष्य यांनी आपले स्थान सोडले की त्यांची काही किंमत राहत नाही. या सर्वांची किंमत जागेवरच आहे. हे सर्व जाणून माणसाने आपले स्थान ( पद/ हुद्दा)कधीही सोडू नये.

गुणा: कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सताम् |

केतकीगन्धमाग्राय स्वयमायान्ति षट्पदा: ||

सज्जन व्यक्ती कितीही दूर राहत असला तरी त्याच्या अंगी असलेले सदगुन त्याच्या दुताचे काम करतात. जसे केवड्याच्या फुलाचा वास घेऊन भुंगे स्वतःहून केवड्याच्या मुलाकडे येतात.

गुणैरुत्तुंङ्गतां याति नोत्तुङ्गेनासनेन ना|

प्रासादशिखर स्थोऽपि काक: किं गरुडायते ||

उच्च आसनावर बसल्यामुळे कोणालाही मोठेपणा मिळत नाही. मनुष्य आपल्या अंगी असलेल्या सद्गुणांमुळे मोठेपणा मिळवतो. जसे की कावळा राजवाड्याच्या शिखरावर बसला म्हणजे गरुड होत नाही.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 4

दैवमेवेति सञ्चित्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत् |

अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्य: प्रातुमर्हति ||

दैवानुसार आपल्याला सर्व काही मिळेल असे म्हणून माणसाने आपला चालू असलेला उद्योग कधीही सोडू नये.कारण प्रयत्न केल्याशिवाय तिळापासून तेलही मिळत नाही.

वाच्यं श्रद्धासमेतस्य प्रच्छकशस्य विशेषतः|

प्रोक्त्ं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत् ||

ज्याची श्रद्धा आहे. शिकण्याची जिज्ञासा आहे. प्रश्न विचारतो अशा व्यक्तीला सांगावे. श्रद्धा विहीन माणसाला सांगणे म्हणजे अरण्यात मोठ्याने रडणे होय.

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जन:|

सर्पो दशति कालेन, दूर्जनस्तु पदे पदे ||

दुर्जनाची आणि सर्पाची तुलना केल्यास यामध्ये दुर्जनापेक्षा सर्प बरा कारण सर्प कधीतरी चावतो पण दुर्जन मात्र नेहमीच आपल्या कृतीने आणि वर्तनुकिने चावत असतो.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 5

खल: सर्षमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |

आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

दुष्ट मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे लहानात लहान मोहरी एवढे सुद्धा दोष पाहतो. परंतु स्वतःचा दोष मात्र मोठ्यात मोठा अगदी बेलाच्या फळाएवढा असला तरी तो झाकून ठेवतो.

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका:|

बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् ||

स्वतःच्या गोड बोलण्याने पोपट आणि मैना बंधनात (पिंजऱ्यात) अडकून ठेवले जातात. बगळा काहीच बोलत नाही त्यामुळे त्याला कोणी अडकवून ठेवत नाही कारण मौन हे अनेक ठिकाणी फायद्याचे ठरते.

पयसा कमलं कमलेन पय: |

पयसा कमलेन विभाति सर:||

पाण्यामुळे कमळाला शोभा येते, कमळामुळे पाण्याला शोभा येते. कमळ आणि पाणी या दोघांमुळे सरोवराला शोभा येते.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 6

नारीकेलसमाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जना:|

अन्ये बदरिकाकाश बहिरेव मनोहर:||

सज्जन माणसे नारळाच्या फळाप्रमाणे बाहेरून टनक पण आतून गोड असतात तर इतर माणसे बोराप्रमाणे बाहेरून मनोहर पण आतून कडक असतात.

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्|

उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||

आपला परका हा भाव संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे असतो. परंतु उदार अंतकरणाची माणसे पूर्ण जगालाच आपले कुटुंब माणतात.

गौरवं प्राप्यते दानान्न तु वित्तस्य संचयात् |

स्थितिरुच्चै: पयोदानां पयोधीनामध: स्थिति:||

दान (धन इ. ) देणाऱ्या माणसाला मोठेपणा मिळतो. संचय ( धनाचे) करणाऱ्याला मिळत नाही. जसे पाणी देणाऱ्या ढगाचे स्थान वर अस्ते तर पाण्याचा साठा करणाऱ्या समुद्राचे स्थान खाली असते.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 7

आपन्नाशाय विबुधै: कर्तव्या: सुहृदोऽमला:|

न तरत्यापदं कश्चिद्योऽत्र मित्रविवर्जित: ||

जीवनात संकट आल्यानंतर दूर होण्यासाठी सुज्ञ माणसाने चांगले मित्र जोडावेत. ह्या जगात ज्याला चांगले मित्र नाहीत असा मनुष्य संकटातून तरुण जात नाही.

सुहृदां हितकामानां य: शृणोति न भाषितम्|

विपत्संनिहिता तस्य स नर: शत्रूनंन्दन: ||

जो मनुष्य आपल्या हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या मित्राचे बोलणे ऐकत नाही. अशा मनुष्याजवळ संकटे आलेले असतात आणि तो आपल्या शत्रूला आनंद देणारा ठरतो.

कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं न शोभते|

न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ||

फुल कितीही दिसायला चांगल्या रंगाचे असले तरी त्याला सुगंधा शिवाय शोभा नाही  मनुष्य कितीही गोड बोलत असेल आणि कृती शून्य असेल तर त्याला शोभत नाही.

Sanskrit Quotes – संस्कृत कोट्स 8

माता शत्रु: पिता वैरी येन बालो न पाठित:|

न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ||

जे बालकाला शिकवत नाहीत असे माता पिता त्या मुलाचे वैरी असतात कारण हंसाच्या सभेमध्ये जसा बगळा शोभत नाही तसा विद्वानांच्या सभेमध्ये निरक्षर शोभत नाही.

छिन्नोऽपि रोहति तरु: क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्र:|

इति विमृशन्त: सन्त: सन्तप्यन्ते न ते विपदा ||

वृक्ष तोडला तरी पुन्हा वाढतो आणि चंद्र नाहीसा झाला तरी पुन्हा तो हळूहळू वाढत राहतो त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी संकटाने खचून न जाता तो पुन्हा प्रयत्न करत राहतो.

अल्पाक्षररमणीयं य: कथयति निश्चितं स खलु वाग्मी | 

बहुवचनमल्पसारं  य: कथयति विप्रलापी स:||

जो मधुर ,कमी आणि सारयुक्त बोलतो त्याला वक्ता असे म्हणतात. जो भरपूर बोलतो पण तथ्यांश नसलेले बोलतो त्याला बडबड्या असे म्हणतात.

कर्तव्यमेव कर्तव्यं प्राणै: कण्ठगतैरपि |

अकर्तव्यं न कर्तव्यं प्राणै:  कण्ठगतैरपि ||

जे कार्य करण्यासारखे आहे ते कार्य प्राण कंठापर्यंत आले तरी सोडू नये. जे कार्य जीवनात करण्यासारखे नाही ते कार्य प्राण कंठात आले तरी करू नये.

इतर संस्कृत श्लोक पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

Leave a Reply