राम नवमी 2024 || Ram Navami || राम नवमी
रामनवमी ( चैत्र शुद्ध नवमी) हा दिवस फार महत्त्वाचा आहे. रामनवमी या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र अवताराला आले. श्री रामाने जो आदर्श जगापुढे ठेवला आहे त्याचे स्मरण रामनवमीच्या निमित्ताने करून त्यांच्या सदगुणांचा अंगीकार करावा. हा रामनवमी साजरी करण्याच्या मागचा प्रमुख उद्देश हा आहे . दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी आहे .रामनवमी हा दिवस प्रभू रामचंद्राचे भक्त मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले. रामाने अवतरला येऊन अन्याय आणि अत्याचारी राक्षसांना ठार केले. आणि जनतेला एक आदर्श राज्य निर्माण करून दिले. प्रभू रामचंद्रांचा कर्तव्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये दिसून येतो.
Table of Contents
Ram Navami – श्रीमद गोस्वामी तुलसीदास यांच्या श्लोकातून प्रभू रामचंद्रा विषयी
शान्तं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशांशन्तिप्रदं
ब्रह्माशम्भूफणिन्द्रज्ञसेव्यमनिशं वेदांत वेदान्त विभुम्|
रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं
वंदेऽहं करूणाकरं रघुवरं भुपालचुडामणिम् ||
सदरील संस्कृत श्लोक हा श्रीमद गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या रामचरित मानस या ग्रंथातील आहे. या संस्कृत श्लोक मध्ये तुलसीदासजी सांगतात. शांत, सनातन, निष्पाप, मोक्षरूप परम शांती देणारे प्रभू रामचंद्र यांना मी नमस्कार करतो. ज्या प्रभुरामचंद्रांची ब्रह्मदेव, महादेव , शेष हे नित्य सेवा करतात. वेदांतान जानता येणाऱ्या सर्व व्यापक आणि सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असणारे रामचंद्र ज्यांचे रूप पापाचे हरण करणाऱ्या आहे. जे करुणेचा महासागर आहेत. अशा रघुकुळामध्ये जन्म घेणाऱ्या प्रभू रामचंद्र ज्यांना प्रभू रामचंद्र म्हटले जाते. अशा जगदीश्वराला मी वंदन करतो असे तुलसीदाजी संस्कृत श्लोकामध्ये सांगतात.
Ram Navami – बुद्ध कौशिकुशीने रचलेल्या राम रक्षा स्तोत्र यांच्या श्लोकातून प्रभू रामचंद्रा विषयी
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् |
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ||
बुद्ध कौशिकुशीने रचलेल्या राम रक्षा स्तोत्र मध्ये मधील हा संस्कृत श्लोक आहे. या संस्कृत श्लोकांमध्ये बुद्ध कौशिक ऋषी सांगतात प्रभू रामचंद्राचे चरित्र शंभर कोटी संस्कृत श्लोक लिहिण्याइतके विस्तारित आहे. ज्या संस्कृत श्लोकांमधील एक एक अक्षर सुद्धा मानवाच्या मोठ्या मोठ्या पापाचा नाश करणारे आहे.
Ram Navami -संत एकनाथ महाराज आपल्या अभंग रचनेत सांगतात प्रभू रामचंद्रा विषयी
श्रीराम नामे जगाचा उद्धार| करिता उच्चार दो अक्षरी ||
पाहता साधन आन नसे दुजे| राम नामे नासे महत्पाप ||
संत एकनाथ महाराज आपल्या अभंग रचनेत सांगतात जो राम नामाचा जप करतो ज्याचा उद्धार होतो. उद्धार करण्यासाठी राम नामासारखे दुसरे साधन नाही. आणि रामनामाने महत्पाप नाहीसे होते. रामनवमी हा महोत्सव का साजरा करतात त्याची कारणे अनेक आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या भगवद्गीते मध्ये सांगतात.
Ram Navami – रामनवमी हा महोत्सव का साजरा करतात त्याची कारणे भगवद्गीते मधील
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः |
त्यक्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ||
श्रीमद्भगवद्गीता ४/९
सदरील संस्कृत श्लोक हा श्रीमद्भगवद्गीतेतून घेतलेला आहे. या सदरील संस्कृत श्लोक मधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. हे अर्जुन माझा जन्म आणि कर्म दिव्य आहेत. अशा प्रकारच्या माझ्या या दिव्य जन्माला आणि कर्माला तत्त्वाने जाणतो . त्याने शरीराचा त्याग केल्यानंतर म्हणजेच मृत्यूनंतर त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही तर तर तो मलाच प्राप्त झालेला असतो. भगवंताचा जन्म आणि कर्म दिव्य असतात ते आपण सर्वांनी तत्वाने जाणून घेतले पाहिजेत. प्रभुरामचंद्रांचा अवतार हा दिव्य अवतार आहे. म्हणून आपण तो सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. त्याच बरोबर रामचंद्रांनी अवतार का घेतला? अवतारामध्ये काय कार्य केले? आणि त्यांचे कार्य हजारो, लाखो वर्षानंतर हे स्मरणात का राहिले? परमात्मा अवताराला का येतात हे भगवान श्रीकृष्णाने गीते मध्ये सांगितलेले आहे. ते म्हणतात
१)पहिले कारण धर्माचे रक्षण!
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||
सदरील संस्कृत श्लोकामधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या अवताराचा प्रयोजन सांगतात ते म्हणतात हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वाढ होते तेंव्हा तेंव्हा मी अवतराला येतो. आपलं साकार स्वरूप जगासमोर प्रगट करतो. परमात्मा राम नवमीच्या दिवशी प्रभूरामचंद्राच्या अवताराला आले कारण त्या काळामध्ये धर्माची हानी झाली होती आणि अधर्म वाढला होता.
आज जगतामध्ये अनेक धर्म आहेत. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये आजच्यासारखे धर्म नव्हते. त्या काळामध्ये मानवता हा एकच धर्म होता आणि जे मानवतेचे दुश्मन ते परमात्म्याचे दुश्मन होते. त्या काळामध्ये रावण, कुंभकर्ण ,इंद्रजीत आणि रावणाचे इतर सहकारी यांनी आपल्या तपश्चर्याच्या जोरावर देवाकडुन अनेक वर मागून घेतले होते. या सर्व वरांचा उपयोग ते सर्व सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी करत असत. रावण हा या सर्व अन्यायकारी मंडळींचा लीडर होता त्याच्या या सर्व कृतीमध्ये कुंभकर्णाची त्याला साथ होती .या कुंभकर्ण आणि रावण या अन्यायकारी जोडीला मारण्यासाठी प्रभुरामचंद्राने अवतार घेतला आणि या अन्यायाने वागणाऱ्या रावण आणि कुंभकर्ण चा वध केला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचे दुसरे प्रयोजन पुढील संस्कृत श्लोकामध्ये सांगतात.
२) दुसरे कारण साधूचे संरक्षण!
परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्|.
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे||
श्रीमद्भगवद्गीता ४/८
मागील संस्कृत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो असे सांगितले आहे. परंतु धर्म ही ही रक्षण करता येईल अशी मूर्त वस्तू नाही. तर ‘धर्मो रक्षती रक्षिता:’ या न्यायाने धर्माने जे लोक वागतात त्यांचे रक्षण करणे म्हणजेच धर्माची रक्षण करणे होय. जे लोक धर्माने वागतात त्यांना साधू असे म्हणतात. अशा साधूंचे त्राण हरण करण्यासाठी म्हणजेच दुःख निवारण करण्यासाठी आणि धर्माचं संस्थापन करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये परमात्मा अवतार घेतो.
Ram Navami – संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, प्रभू रामचंद्रा विषयी
घेऊन या चक्र गदा हाची धंदा करितो |
भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी ||
परमात्म्याच्या अवतारामध्ये भक्ताचे संरक्षण दुर्जनाचा संहार हे प्रमुख कार्य आहे प्रभू रामचंद्राने आपल्या उत्तरामध्ये अनेकांचा उद्धार केला आहे. त्यामध्ये अहिल्या उद्धार, गोहक ,सुग्रीव, जटायू ,शिबरी, बिभीषण इ. भक्ताचे त्राण ( दुख:) हरण केले.
प्रभू रामचंद्रांच्या अंगी अनेक गुण आपल्याला पाहायला मिळतात. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तसेच नैतिक मर्यादा मध्ये राहून उत्तम पुरुष कसा व्हावे हे प्रभू रामचंद्र कडून आपल्याला शिकायला मिळते. मानव उच्च ध्येय, उच्च आदर्श समोर ठेवून आपली उन्नती करू शकतो हे प्रभु रामचंद्राने आपल्या जीवनाद्वारे दाखवलेले आहे. प्रभू रामचंद्र हे फक्त आदर्श पुरुषास नव्हते तर ते एक वचनी, एक पत्नी, एक वाणी तसेच एक बानी असे होते.
प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये त्यागही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांनी कैकयीच्या आग्रहाखातर आयोध्याच्या राज्याच्या त्याग केला. त्यानंतर वालीला मारल्यानंतर सुग्रीवाची राज्य त्यांना बळकवता आले असते. त्यांनी तसं न करता ते सुग्रीवाला दिले आणि रावण मारल्यानंतर लंकेचे राज्य स्वतःकडे ठेवून घेता आले असते तरीही त्यांनी ते राज्य बिभीषणाला दिले. आज प्रभू रामचंद्राच्या नावाने जे लोक राज्य करतात त्यांनी प्रभू रामचंद्राचा हा गुण घ्यायला शिकले पाहिजे. आजच्या राजाकडे त्यागी भूमिका नसून भोगी भूमिका आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी हे सुद्धा प्रभू रामचंद्राकडून शिकले पाहिजे. त्यांच्या जीवनात
विजेतव्या लंङ्का चरणतरणीयो जलनिधिर्
विपक्ष: पौलस्त्यो रणभूवि सहायाश्च कफय |
तथाप्येको राम सकलमवधीद्राक्षसकुलं
क्रियासिद्धि: सत्वे भवति महतां नोपकरणे ||
सदरील संस्कृत श्लोकामध्ये प्रभू रामचंद्राने अनेक संकटावर मात कशी केली हे सांगितली आहे. त्यांना अजिंक्य श्रीलंका जिंकायची होती. लंकेला जाण्यासाठी पायी समुद्र ओलांडायचा होता. प्रभू रामचंद्रचा शत्रु रावणासारखा बलाढ्य होता. त्याचे सैन्य हे बलाढ्य होते प्रभू रामचंद्राचे सैन्य हे वानर होते .
इतक्या कठीण परिस्थितीवर मात करून प्रभुरामचंद्राने रावणाला ठार केले. यातून त्यांनी एक संदेश दिला गराणे करणारे कधी इतिहास निर्माण करत नसतात आणि इतिहास निर्माण करणारे कधी गराणे करत नसतात. प्रभू रामचंद्राच्या जीवनातून मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत.
भारताची भूमी धन्य आहे .जिथे प्रभूरामचंद्र सारखे, श्रीकृष्ण सारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, संत तुकाराम महाराज सारखे, ज्ञानोबारायासारखे आदर्श पुरुष जन्माला आले. या आदर्श पुरुषांचे चरित्र त्यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण गुणगान गाऊन सर्वांनीच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Ram Navami – रामजन्म अभंग
प्रभू रामचंद्राचा जन्म दुपारी बारा वाजता झाल्यामुळे रामनवमी दुपारी बारा वाजता साजरी करतात. संतश्रेष्ठ नामदेवरायाने लिहिलेला हा अभंग म्हणून सातवे चरण म्हणताच सर्वांनी प्रभुरामचंद्राच्या नावाचा जयघोष करून त्यांच्यावर गुलाल व पुष्पे टाकावेत.
उत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ||१||
शुक्लपक्षी ही नवमी |उभे सुरवर ते योमीं ||२||
माध्यान्हासी दिनकर |पळभरी होय स्थिर ||३||
धन्य मीच त्रिभुवनी |माझें वंशी चक्रपाणी ||४||
सुशोभित दाही दिशा |आनंद नरनारी शेषा ||५||
नाही कौशल्येसीभान |गर्भी आलें नारायण ||६||
आयोनी सम्भव | प्रगटला हा राघव ||७||
नामा म्हणे डोळां |पाहीन भुवनत्रयपाळा ||८||
यानंतर पाळणा म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
इतर संस्कृत श्लोक पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा