You are currently viewing प्रेरणादायक संस्कृत श्लोक

प्रेरणादायक संस्कृत श्लोक

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त  अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हा प्रेरणादायक संस्कृत श्लोक आहे.

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 1

(सदरील प्रेरणादायक संस्कृत श्लोक श्लोकामध्ये तीन प्रकारच्या व्यक्तीचे वर्णन केलेले आहे. त्यामध्ये नीच म्हणजे कनिष्ठ ,मध्यम आणि उत्तम व्यक्ती कोणाला म्हणतात त्याचे वर्णन केलेले आहे. संस्कृत कवी म्हणतात आपल्याला अपयश येईल म्हणून जे कार्याला सुरुवातच करत नाहीत त्यांना’ नीच’ लोक म्हणतात. काही व्यक्ती कार्य सुरू करतात पण त्या कार्यमध्ये संकटे येऊ लागले की मध्येच कार्य सोडून देतात.

विद्या संस्कृत श्लोक पाहण्यासाठी येथे क्लीक करा

अशा लोकांना मध्यम लोक असे म्हणतात. आणि छत्रपती शिवरायांसारखे काही व्यक्ती जीवनामध्ये कितीही संकट आले तरी आपल्या कार्यापासून, ध्येयापासून, उद्देशापासून कधीही दूर होत नाहीत म्हणजेच ते कार्य पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत त्यांना उत्तम लोक असे म्हणतात. कवीच्या या श्लोकाचे आपण जर आचरण केले तर आपली गणना सुद्धा उत्तम लोकात होऊ शकते)

समाजामध्ये 87% प्रकारचे लोक असे आहेत की ,त्यांना
आपण जीवनामध्ये काय करणार आहोत हे देखील माहीत नसते. जीवन जगण्याचा कुठलाही उद्देश नसतो .परमेश्वराने जन्मला घातले आहे म्हणून खातात, पितात आणि एक दिवस मरून जातात. उद्देश म्हणून कुठलंही कार्य ते जीवनामध्ये करत नाहीत. अशा लोकांना कवीने नीच लोक असे म्हटले आहे.
समाजामध्ये दहा टक्के लोक असे आहेत त्यांना जीवन जगण्याचा अर्थ कळलेला असतो. म्हणून ते जीवनामध्ये विशिष्ट ध्येय ठेवतात.अशा ठरवलेल्या ध्येयाच्या स्फूर्तीसाठी ते कार्य करतात करत असतात. त्यांना माहिती असतं की ध्येय नुसतं मनात ठेवून प्रगती होत नाही तर ते ध्येय सत्यात उतरावे लागते तेव्हा कुठेतरी प्रगती होते. म्हणून ते कार्य सुरू करतात.परंतु कार्य करत असताना मध्ये काही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर कशी मात करतात हे त्यांना माहिती नसतं आणि म्हणून ध्येयपुर्ति करत असताना अडचणी किंवा संकटे आली की ते ध्येय मध्येच सोडून देतात. अशा लोकांना कवी मध्यम लोक मानतात.
समाजामध्ये तीन टक्के लोक असे आहेत कि आपल्या ध्येय पूर्ण करण्यामध्ये कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी ते ध्येय पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांना कवी उत्तम पुरुष असे मानतो. म्हणून प्रत्येकाने आपले एक ध्येय ठरवून त्याची पूर्ती करण्यामध्ये कितीही संकट आली तरी न डगमगता ध्येय पूर्ण करावे.)

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 2

(सदरील प्रेरणादायी संस्कृत श्लोकामध्ये संस्कृत कवीने फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात ज्या माणसाला आपली प्रगती करायची आहे .त्यांनी सहा शत्रूंचा नायनाट केला पाहिजे. जीवन जगत असताना आपल्याला सर्वात त्रास देतात ते म्हणजे आपले शत्रू . आपल्याला ज्या शत्रूंचा नायनाट करायचा संस्कृत कवीने सांगितला आहे ते शत्रु म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरील नसून आपल्या शरीरामध्ये राहणारे आहेत. बाहेरचे शत्रू आपल्याला स्पष्ट दिसत असतात. म्हणून त्यांना संपवणे किंवा मारणे सोपे असते. पण आपल्यातील शत्रू आपल्याला मात्र दिसत नाहीत. म्हणून त्यांना मारणे किंवा संपवणे अवघड जाते. जे शत्रू नष्ट करायचे आहेत कवीने क्रमाने सांगितले आहेत.ते पुढील प्रमाणे निद्रा , तंद्रा , भीती ,क्रोध ,आळस आणि दीर्घसूत्रता. मानवी जीवनातील सर्वात मोठे हे सहा शत्रू आहेत.एक जरी शत्रू असेल तरी तो फार मोठा त्रास देतो. आपल्याला तो विजयापर्यंत पोहोचू देत नाही.यातल्या पहिल्या शत्रूतचा आपण विचार करू.

01. निद्रा:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

निद्रा म्हणजे झोप सर्व प्राण्यासाठी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. पण ती प्रमाणात असायला हवे भगवान श्रीकृष्ण म्हणतात आती झोपणारा कधी योगी होऊ शकत नाही आणि अति जागणारा ही योगी होऊ शकत नाही म्हणजे जीवन व्यवस्थित जगायचे असेल तर झोप असायला हवी पण प्रमाणात. आपले कर्तव्य कर्म करत असताना आपण नेहमीच जागरूक असायला हवे. आपण ज्यावेळेस आपले कर्तव्य कर्म करतो त्यावेळी जो झोपतो तो संपतो. मराठीमध्ये एक म्हन आहे ‘झोपला तो संपला’. सर्वांना ससा आणि कासव यांची गोष्ट माहिती आहे. या गोष्टीमध्ये पळण्याची शर्यत आहे. ससा पळण्यामध्ये कुशल आहे. तरीही तो हरला कारण त्याचे कर्तव्य कर्म करत असताना तो झोपला त्याप्रमाणे आपण कर्तव्य कर्म करत असताना जर आपण झोपलो तर आपली ही हार निश्चित आहे यासाठी सर्वांनी झोपेवर विजय मिळवावा. मराठीमध्ये एक म्हण आहे ‘आळस सुखाचा वैरी आणि झोप दारिद्र्याची सोयरी’. जो मर्यादा पेक्षा जास्त झोपतो त्याच्या घरी दारिद्र्य चालू येते. म्हणून जीवनामध्ये ज्यांना यशस्वी व्हायचे आहे त्यांनी झोप या शत्रूवर विजय मिळवावा.

02. तन्द्रा:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

तंन्द्रा म्हणजे झोपेचे सोंग घेणे होय. तंद्रीत असलेल्या माणूस झोपलेला नसतो. पण त्याने झोपेचे सोंग घेतलेले असते. एक वेळेला झोपलेल्या माणसाला जागे करणे सोपे आहे पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करणे सोपे नाही. ज्याला काम म्हणजेच कर्म करण्याची इच्छा नसते ती माणसं झोपेचे सोंग घेतात आणि झोपेचे सोंग घेतल्यामुळे अशा व्यक्ती आपल्या जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत. म्हणून आपण तंद्रेवर सुद्धा विजय मिळवला पाहिजे.

03. भयं:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

भय म्हणजे भीती होय. जीवनामध्ये यशस्वी होत असताना आपल्याला काही गोष्टी अवघड वाटतात आणि त्या अवघड वाटणाऱ्या गोष्टींचे मनामध्ये भीती निर्माण होते. अभ्यास करत असताना काही मुलांना गणिताची भीती वाटते ,काही नाही इंग्रजीची भीती वाटते तर काहींना सायन्स या विषयाची भीती वाटते, निवडणुकीत उमेदवाराला पडण्याची भीती वाटते ,व्यापाऱ्याला व्यापार डुबण्याची भीती वाटते, अशी प्रत्येकाच्या जीवनात कशाची नाही कशाची भीती वाटते. माणसाच्या मनात जेव्हा हरण्याची भीती वाटते तेव्हा असा माणूस रनात निश्चितपणे हरतो. या भीतीवर मात करण्यासाठी विवेकानंदाच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आपल्यासमोर सांगतो. विवेकानंद एके दिवशी रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागे चार-पाच माकडे लागली. त्या माकडाच्या भीतीने विवेकानंद पुढे पळु लागले. ते पुढे पळत असताना माकडे त्यांच्या पाठीमागे पडू लागले. ते पाहून विवेकानंद जोरात पळु लागले .तसेच माकडेही त्यांचा पाठलाग करण्यासाठी जोरात पळू लागली. माकडाच्या विषयी विवेकानंदाच्या मनात भीती निर्माण झाली. आणि त्यांच्यापासून सोडवणूक करण्यासाठी ते पळत सुटले होते .एवढ्यात समोरून त्यांचा एक मित्र येताना दिसला .आणि ते म्हणाले अरे विवेकानंद कुठे पळतो आहेस. त्यावेळेस त्यांनी त्या माकडाकडे बोट दाखवून म्हणाले हे माझा पिच्छा सोडत नाहीत. त्यावेळेस त्या मित्राने त्यांना एक कल्पना सुचवली की तू जोपर्यंत पळत राहशील तोपर्यंत ते तुझा पाठलाग सोडणार नाहीत. यावर एक उपाय आहे तु त्यांचा सामना कर. म्हणून मित्राने खाली वाकून दगड घेण्यास सांगितले व माकडाच्या दिशेने भिरकावण्यास सांगितले विवेकानंद ने तसे केले तेव्हा माकडे पळून गेली. माणसाच्या जीवनात हे असेच आहे जोपर्यंत एकदा व्यक्ती संकटांना घाबरतो आणि त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेवढी संकटे त्याचा पिच्छा सोडत नाहीत .त्या माकडाप्रमाणे संकट हे कधी एकटे येत नाही तर ते संघटित होऊन येतात.
परंतु विवेकानंदांनी जसा त्या माकडाचा सामना केला तसा जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर आपणही संकटाला सामोरे जा संकटाचा सामना करा त्यांच्याविषयी भीती बाळगू नका तुम्ही निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत.

04. क्रोध:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

क्रोध म्हणजे रागवणे होय. आपण बऱ्याच वेळेस जीवनामध्ये निष्कारण रागावतो. एखादी घटना इच्छेप्रमाणे नाही झाल्यास आपल्याला राग येतो. राग आल्यानंतर मनुष्य काय करतो हे त्याला भान राहत नाही .त्या क्षणा रागामुळे त्याच्या हातून मोठ्या मोठ्या चुका होतात .त्या झालेल्या चुका पुन्हा दुरुस्त होत नाहीत . आपण पेपरामध्ये बऱ्याच घटना वाचतो. अगदी शंभर रुपयासाठी माणसाने माणसाचा खून केलेला पाहतो. कधी कधी शुल्लक कारणावरून झालेली भांडणे अगदी खून करण्यापर्यंत जातात .त्यामुळे माणसाच्या जीवनातील क्रोध हा फार मोठा शत्रू आहे. क्रोध या शत्रू वर विजय मिळवायचा असेल त्या प्रसंगापुरते संयमाने राहून विचार करून त्यावर कृती करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘क्रोधात् भवति समोह संमोहात. स्मृती विब्रह्म स्मृती भृन्शात‌ बुद्धि नाशो बुद्धीनाशात प्रणश्यते. म्हणजे त्या व्यक्तीच्या सर्वस्वाचा क्रोधामुळे नाश होतो. म्हणून मानवाने क्रोधावर विजय मिळवावा.

05. आलस्य:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

संस्कृत कवीने म्हटले आहे की ‘आलस्य ही मनुष्यानाम शरीरस्तो महा रिपु’. रिपू म्हणजे शत्रू. आळस हा माणसाच्या शरीरात राहणारा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि हा शत्रू माणसाच्या प्रगतीच्या नेहमी आड येतो.

06. दीर्घसूत्रता:- ( प्रेरणादायक संस्कृत श्लोक )

दीर्घसूत्रता म्हणजे एखादे काम वेळेवर न करता ते काम कारणे सांगून किंवा आळस आल्यामुळे पुढे ढकलने होय. ते काम पुढे ढकलल्यामुळे वेळेत पूर्ण होत नाही. अचानक काही वेगळी कामे आपल्याला करावी लागतात. हा आपल्या जीवनातील प्रगतीत येणारा फार मोठा अडथळा आहे. तानाजी मालुसरे जेव्हा शिवाजी महाराजांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला गेले .त्या वेळेस शिवाजी राजे म्हटले की त्या दिवशी किल्ला घ्यायला जाणार आहोत .तानाजीच्या घरी लग्नकार्य असताना देखील स्वराज्याला प्रथम प्राधान्य दिले . तो म्हणाला आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे आणि तो किल्ले कोंढाणा घेण्यासाठी गेला. तानाजीच्या या उदाहरणावरून आपल्याला तानाजी ची कार्य तत्परता दिसून येते. आपणही आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या कामाला पुढे न ढकलता योग्य वेळी ते काम पूर्ण केले पाहिजे. संत कबीर जी म्हणतात ‘कल करे सो आज कर आज करे सो अब ,क्षण मे प्रलय हो जायेगा फिर करेगा कब. याचा अर्थ असा की उद्या करावयाचे काम माणसाने आजच पूर्ण करावे. आज करायचे काम आता पूर्ण करावे. कोणतेही काम पुढे ढकलू नये. अशा रीतीने संस्कृत कवीने या श्लोकामध्ये ज्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचा आहे त्यांनी आपल्या शरीरात असणाऱ्या वरील सहा शत्रूचा नायनाट करून आपल्या जीवनामध्ये इच्छित ध्येय पूर्ण करावे.)

Leave a Reply