शारदीय नवरात्र हा देवीची उपासना, भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंग समर्पित असतो. navratri colours नवरात्रातील रंग हे फक्त परंपरेचा भाग नसून त्यामागे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व दडलेले आहे. प्रत्येक रंग भक्तामध्ये सकारात्मकता, शक्ती आणि नवीन ऊर्जा निर्माण करतो. या लेखामध्ये आपण नवरात्रातील ९ रंग, त्यांचे महत्व आणि ते आपल्या जीवनात कसे मंगल परिणाम करतात हे जाणून घेऊया.
Table of Contents
Navratri Colors 2025 (Day-wise) with Shloka & Meaning
प्रतिपदा (22 सप्टेंबर 2025) – शैलपुत्री देवी – रंग: पिवळा
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥
मी पर्वतराजाची कन्या शैलपुत्रीला वंदन करतो. ती वृषभावर आरूढ असून हातात त्रिशूल धारण करते. तिच्या पूजनेने यश व इच्छित फल मिळते.
द्वितीया (23 सप्टेंबर 2025) – ब्रह्मचारिणी देवी – रंग: हिरवा
दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलु ।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ॥
हातात जपमाळा व कमंडलू धारण केलेली ब्रह्मचारिणी देवी साधकाला ज्ञान व तपश्चर्येची शक्ती प्रदान करते.
तृतीया (24 सप्टेंबर 2025) – चंद्रघंटा देवी – रंग: करडा
पिण्डजप्रवरारूढा चन्द्रखण्डकृतशेखराम् ।
चन्द्रघण्टेति चाम्याता यशस्विनीं ॥
सिंहावर आरूढ व शिरावर चंद्राकृती घंटा धारण केलेली चंद्रघंटा देवी शौर्य व पराक्रमाची प्रतीक आहे.
चतुर्थी (25 सप्टेंबर 2025) – कूष्माण्डा देवी – रंग: नारंगी
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।
दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तु मे ॥
कूष्माण्डा देवीने विश्वाची उत्पत्ती केली. तिच्या पूजनाने आयुष्य, आरोग्य व संपत्ती प्राप्त होते.
पंचमी (26 सप्टेंबर 2025) – स्कंदमाता देवी – रंग: पांढरा
सिंहासना समारूढा स्कन्दमाता यशस्विनीम् ।
हस्ताभ्यां पद्मधरा देवी शुभदास्तु सदा मम ॥
कार्तिकस्वामीला मांडीवर घेऊन सिंहावर आरूढ झालेली स्कंदमाता देवी शांती, करुणा व मातृत्वाचे प्रतीक आहे.
षष्ठी (27 सप्टेंबर 2025) – कात्यायनी देवी – रंग: लाल
चन्द्रहासोज्ज्वलकरा शारदूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दद्यान्महासुरमर्दिनी ॥
कात्यायनी देवी सिंहावर आरूढ असून दुष्टांचा नाश करणारी आहे. ती आरोग्य व पराक्रम देणारी मानली जाते.
सप्तमी (28 सप्टेंबर 2025) – कालरात्री देवी – रंग: निळा
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता ।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ॥
कालरात्री देवी अंधकार नष्ट करणारी व भय दूर करणारी आहे. तिच्या पूजनेने साधक निर्भय बनतो
अष्टमी (29 सप्टेंबर 2025) – महागौरी देवी – navratri colours रंग: गुलाबी
श्वेतवृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुभा ।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ॥
महागौरी देवीचे रूप अत्यंत तेजस्वी व पवित्र आहे. तिच्या कृपेने पापांचा नाश होऊन जीवनात पावित्र्य येते.
नवमी (30 सप्टेंबर 2025) – सिद्धिदात्री देवी – navratri colours रंग: जांभळा/जांभळी
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदात्री शुभा मम ॥
सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धी देणारी आहे. तिच्या कृपेने भक्ताला यश, सिद्धी आणि चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.
नवरात्र विशेष श्लोक – तुळजाभवानी (आदिशक्ती) संदर्भात
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
हे देवी! तू सर्व भूतांमध्ये आईच्या रूपाने वसलेली आहेस. तुला पुन्हा पुन्हा नमस्कार, तुला वारंवार प्रणाम.
नवरात्रीत हा श्लोक तुळजाभवानी मातेच्या उपासनेत विशेषतः वापरला जातो.
यातून देवीचे मातृस्वरूप, करुणा आणि भक्तांच्या कल्याणासाठी असलेले तिचे स्थान स्पष्ट होते.
दारिद्र्य-दुःखदहन स्तोत्र (daridra dahan shiv stotra) श्री शंकराची कृपा मिळवणारे भक्तिपूर्ण श्लोक.
अशा प्रकारे navratri colours नवरात्रातील ९ दिवसांचे ९ रंग हे केवळ परंपरेपुरते मर्यादित नाहीत, तर प्रत्येक रंग भक्तामध्ये विशिष्ट सकारात्मकता व आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो.