भगवान शंकराची आनंदी अवस्थेत नृत्य करताना केलेली स्तुती म्हणजे Natraj Stuti नटराज स्तुती होय .भगवान शंकर हे नृत्य विज्ञान चे जनक आहेत. ते एक वैश्विक नर्तक आहेत. भगवान शंकर नृत्य करतात त्याला तांडव नृत्य असे म्हणतात. तांडव नृत्याचे दोन प्रकार मानलेले आहेत.
त्यामध्ये पहिले तांडव नृत्य म्हणजे जेव्हा शंकर भगवान शंकर क्रोधायमान होऊन नृत्य करतात त्याला ‘रुद्र तांडव’ नृत्य असे म्हणतात. भगवान शंकराच्या अतिशय आनंदमय तांडव नृत्याच्या स्वरूपाला ‘नटराज’ असे म्हटले जाते. सनातन धर्मामध्ये भगवान शंकराचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली आहे.
भगवान शंकराने या ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी अनेक रूपे घेतली आहेत. भगवान शंकराचे नटराज हे स्वरूप सृजन आणि विनाश या दोन्ही प्रतिक्रिया दर्शविते. शास्त्रामध्ये असे वर्णन केलेली आहे की प्रदोषाच्या काळामध्ये भगवान शंकर कैलास पर्वतावर डमरू वाजून अतिशय आनंदाने नृत्य करतात.
जेंव्हा जेंव्हा भगवान शंकर कैलास पर्वतावर तांडव नृत्य करतात तेंव्हा तेंव्हा भगवान शंकराची पूजा आणि स्तुती करण्यासाठी सगळे देव देवता कैलास पर्वतावर येतात. सर्वजण नटराजाचे स्तुती गातात.
Table of Contents
Natraj Stuti – संस्कृत श्लोक 1
सत सृष्टि तान्डव रचयिता नटराज राज नमो नम:|
हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नम: || धृ||
शास्त्रानुसार भगवान शंकराने सृष्टीची रचना केली आहे. सृष्टी निर्माण (रचनेच्या) वेळेला भगवान शंकराने आनंदमय तांडव नृत्य केले. हे भगवान शंकरा आपल्याला माझा नमस्कार असो. भगवान शंकर जी आपण या जगताचे सर्वात प्रथम म्हणजे आद्य गुरु आहात. त्याचबरोबर या जगताचे परमपिता आहात. आनंदमय नृत्य करणाऱ्या हे नटराजा माझा आपणाला वारंवार नमस्कार असो.
Natraj Stuti – संस्कृत श्लोक 2
गंभीर नाद मृदंगना धबके उरे बह्मांडना
नित होत नाद प्रचंडना नटराज राज नमो नम: ||१||
या भगवान शंकराच्या नृत्यच्या वेळेला माता सरस्वती विणा वाजवतात. इंद्रदेव बासरी वाजवतात. ब्रह्मदेव ताल देण्याचे काम करतात. माता लक्ष्मी सुंदर असे भगवान शंकराच्या स्तुतीचे गीत गातात आणि भगवान विष्णू मृदंग वाजवतात. भगवान विष्णू ने वाजवलेला मृदंगाचा आवाज इतका सुरेख आणि उंच आहे सर्व ब्रह्मांड त्या नादामध्ये तल्लीन होऊन जाते. असा हा मृदंगाचा प्रचंड आवाज पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून टाकतो आशा आहे नटराजा तुला नमस्कार असो.
Natraj Stuti – संस्कृत श्लोक 3
शिर ज्ञान गंगां चद्रमा चिद् ब्रह्मज्योति ललाटमा |
विष नाग माला कंठ मां नटराज राज नमो नम: || २||
या भगवान शंकराच्या नृत्यच्या वेळेला माता सरस्वती विणा वाजवतात. इंद्रदेव बासरी वाजवतात. ब्रह्मदेव ताल देण्याचे काम करतात. माता लक्ष्मी सुंदर असे भगवान शंकराच्या स्तुतीचे गीत गातात आणि भगवान विष्णू मृदंग वाजवतात. भगवान विष्णू ने वाजवलेला मृदंगाचा आवाज इतका सुरेख आणि उंच आहे सर्व ब्रह्मांड त्या नादामध्ये तल्लीन होऊन जाते. असा हा मृदंगाचा प्रचंड आवाज पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून टाकतो आशा आहे नटराजा तुला नमस्कार असो.
Natraj Stuti – संस्कृत श्लोक 4
तव शक्ति वामांगे स्थिता हे चंद्रिका अपराजिता
चंहु वेद गाए संहिता नटराज राज नमो नम: ||३||
आपण अर्धनारी नटेश्वर आहात. आपली शक्ती अर्धांगिनी पार्वती माता नेहमी आपल्या डाव्या बाजूला विराजमान असते. आपल्या सोबत आपली शक्ती असल्यामुळे आपण नेहमीच अपराजित असे असतात. अथर्ववेद, ऋग्वेद ,यजुर्वेद ,आयुर्वेद हे सर्वच वेद आपली नेहमी नटराज स्तुती गातात. अशा नटराजा आपणाला माझा नेहमी वारंवार नमस्कार असो.
भगवान शंकराची नटराज स्तुती अतिशय प्रभावी असुन ती स्तुती जो गातो त्याचे अनिष्ट निवृत्त होतात आणि त्या व्यक्तीला इष्ट प्राप्त होते.
Natraj Stuti – याविषयी कथा
भगवान शंकराने आनंदमय तांडव नृत्य केले. त्याला नटराज स्वरूप असे म्हणतात. भगवान शंकराने हे नृत्य करण्याच्या मागचे कारण असे सांगितले जाते की अपस्मार नावाचा एकदैत्य होता. अपस्मार म्हणजे खुजा किंवा बुटका असा अर्थ होतो.
त्याला स्वरूप बदलण्याची वरदान होते . एखाद्या नटाप्रमाणे विविध रुपे घ्यायचा. त्यामुळे तो विविध रूपे घेऊन मानवामध्ये बुद्धी प्रवेश करण्याचे काम करीत असे. त्याने बुद्धीत प्रवेश केला की त्या व्यक्तीची सतसद्विवेक बुद्धी काम करत नसे. त्याच्या या कृत्याने सृष्टीमध्ये आराजक्ता माजू लागली. त्याला अमरत्वाचे वरदान दिलेले होते.
त्यामुळे तो कसाही वागू लागला. त्याची अराजकता नष्ट करण्यासाठी भगवान शंकराने नटराज हे स्वरूप धारण केले. भगवान शंकराच्या नटराज या मूर्तीमध्ये पाहिले असता अपस्मार राक्षस उजव्या पायाखाली दाबलेला आपल्याला दिसतो. तो लोभाचे प्रतिक होता. आपल्याला नटराजाच्या मूर्तीमध्ये नटराजाला चार हात असून एका हातामध्ये अग्नी, एक हातामध्ये डमरू आणि सभोवताली सर्व दिशांना अग्नीची ज्वाला दिसते.
डमरू हा सृजनाचे प्रतीक आहे. तर अग्णी हे विनाशाचे प्रतीक आहे. भगवान शंकर सज्जन करतात त्याच बरोबर विनाश ही करतात. असे सर्जन आणि विनाश दोन्ही गोष्टी एकाच वेळी नटराजाच्या मूर्तीमध्ये आपणाला दिसून येतात. नटराजाने याच्यामध्ये डावा पाय उचललेला आहे तो तो मोक्षाची प्रतीक आहे.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा