You are currently viewing Mahashivratri – महाशिवरात्रि मराठी अर्थासह संस्कृत श्लोक

Mahashivratri – महाशिवरात्रि मराठी अर्थासह संस्कृत श्लोक

Mahashivratri ! महाशिवरात्रि

  सदरील संस्कृत श्लोक हा उमामहेश्वरस्तोत्रम् मधील असून हे स्तोत्र आद्य गुरु शंकराचार्य यांनी लिहिलेले आहे. यावर्षी 08 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरा चे चरित्र आपल्यासमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे

Mahashivratri – महाशिवरात्रि मराठी अर्थासह संस्कृत श्लोक 1

.श्लोकांचा सरळ अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल. जीवांना परम औषध देऊन बहुरोगापासून मुक्त करणारे,’ओम नमः शिवाय’हा पंचाक्षरी मंत्र देऊन भक्तांना रमवेणारे आणि सुखी करणारे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारण असणारे, भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना वारंवार नमस्कार असो.

        महाशिवरात्रि ( Mahashivratri ) दिवशी भगवान शंकराची सर्व भक्त गण मनोभावे पूजा करतात.  प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला शिवरात्र असे म्हणतात. वर्षामध्ये बाराशिवरात्री येतात. या बाराशिवरात्रीपैकी माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला महाशिवरात्रि असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. 

म्हणजे आजच्या भाषेत महाशिवरात्रीला शंकर आणि पार्वतीचा लग्नाचा वाढदिवस ( anniversary) म्हणता येईल. इतर शिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला पार्वती सहित शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला शंकराची का पूजा करतात. त्याचे काय महत्त्व आहे हे स्वतः भगवान शंकराने सांगितले आहे. भारत देश श्रेष्ठ देश आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये असलेल्या अध्यात्मिक उन्नती, भगवत भक्ती, उपासना या सर्व दृष्टीने आपण जगातील सर्व देशाच्या पुढे आहोत.

      एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शंकर जी रत्नजडित सिंहासनावर बसले होते. त्यांच्या डाव्या बाजूला पर्वती माता बसल्या होत्या. त्यांच्यासमोर सिद्ध ऋषी मुनी इत्यादी सर्वजण होते. नारद तुंबर गायन करीत होते. गणेश जी त्यांच्यासमोर होते. रिद्धी सिद्धी द्वाराचे रक्षण करीत होत्या. सर्वजण मृदंगाच्या तालावर नामाचा गजर करत होते. या ब्रम्हरसामध्ये सर्वजण तल्लीन होते. शिवजी ला प्रसन्न पाहून पार्वतीने आदराने त्यांना प्रश्न केला.

Mahashivratri – हा प्रश्न  संतश्रेष्ठ नामदेवरायने एक अभंगातून घेतला आहे

 हे स्वामी तुम्ही आम्हाला एखादे वृत्त असे सांगा की ज्यामुळे आम्हा सर्वांना तुमच्या चरणाजवळ जागा मिळेल. भक्तांची काही चुकून झालेले पापे पूर्णपणे जळून जातील. सर्व जगत सुखी होईल. काळाची भीती नाहिसी होईल.

   माता पार्वतीने असा प्रश्न विचारल्यानंतर तो ऐकून भगवान शंकर खुश झाले.

भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा महाशिवरात्रि mahashivratri संबंधित सवांद

 भगवान शंकर म्हणाले,”हे देवी तुझा प्रश्न ऐकून माझ्या मनाला अतिशय समाधान झाले. तुझा हा प्रश्न जगत उद्धारासाठी आहे. तुझ्या या प्रश्नाने तुझे तर समाधान होईलच आणि पूर्ण जगताच कल्याण देखील होईल “

भगवान शंकराच्या मुखातून महाशिवरात्रि चे महात्मे

     भगवान शंकर म्हणाले, ऐका सावधान कथा शिवरात्री| पावन पवित्र तिन्ही लोकी|’शिवरात्रीची कथा ही स्वर्ग ,मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना पावन करणारी अशी ही कथा आहे. म्हणून सर्वांनी सावध एक चित्ताने ऐकावी. शिवरात्री हे एक व्रत आहे. शिवरात्रीच्या दिवशी उपवास केला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये जे लोक उपवास करतात. त्या उपवासाला फार तर आहार बदल असे म्हणता येईल. उपवास या शब्दाचा अर्थ, उप हा शब्द उपसर्ग आहे. त्याचा अर्थ जवळचा असा होतो. आणि वास म्हणजे भगवंता जवळ निवास करणे होय. नाहीतर जगतामध्ये अनेक जीव अन्न न मिळाल्यामुळे उपाशी राहतात. या क्रियेला उपवास म्हणता येणार नाही.आपल्या ज्या क्रियेने भगवंताजवळ जाता येईल त्या क्रिया म्हणजे उपवास होय. उपवास हा निरंकार असला पाहिजे. फार तर पाणी किंवा दूध आपण घेऊ शकतो. हे शक्य नसेल थोडासा फल आहार घेऊ शकतो. संत श्रेष्ठ नामदेव राय म्हणतात शिवरात्रीला ‘उपवास आणि शिवाचे पूजन| रात्री जागरण विधी त्याचा|| ‘महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला पाहिजे. रात्रभर जागरण केले पाहिजे. असा ह्या व्रताचा विधी आहे. रात्री जागरण करणे म्हणजे गप्पागोष्टी किंवा इतर पद्धतीने नाही. पत्ते खेळणारे लोक रात्र रात्र जागतात. तशा प्रकारचे जागरण नाही. संतश्रेष्ठ तुकोबाराय सांगतात,’गात जागा गात जागा|प्रेम मागा श्री विठ्ठला||’भगवंताचे नाम घेत जागरण झालं पाहिजे. यामध्ये लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्म रस आवडीने. भगवंताचे नाम चिंतन करताना श्रुती म्हणजे विना, मृदंग ,हार्मोनियम, टाळ इ. मधुर वाद्यांच्या साथीने नाम घोष केला पाहिजे. लोकांचा शक्य नसेल तर एकांतामध्ये ॐ नमः शिवाय|हा भगवान शंकराचा पंचक्षरी महामंत्र जप केला पाहिजे| त्याचबरोबर नामदेवराय भगवान शंकराच्या पूजेची विधी सांगतात. ‘एक पसा पाणी एक बिल्वदळ|पूजन केवळ सोपे बहू|’ भगवान शंकराला त्रिदल बेलपत्राची अतिशय आवड आहे . भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करून पाणी अर्पण करावे. भगवान वस्तूकडे कधीही पाहत नाही. कारण ती वस्तू त्यानेच निर्माण केलेली असते. तो पाहतो तो अर्पण करणाऱ्या व्यक्तीचा भाव. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात जो मला श्रद्धेने पत्र ,पुष्प किंवा फल अर्पण करतो त्याचे ते पत्र ,पुष्प आणि फल मी अतिशय आनंदाने स्वीकारतो. बेलपत्र हे

संस्कृत श्लोक विथ मिनिंग अर्थासह पाण्यासाठी येथे क्लिक करा

Mahashivratri – महाशिवरात्रि साठी बेलाचे महत्व

भगवान शंकराच्या चरित्रामध्ये तीन आकडा फार महत्वाचा आहे. त्यांना अर्पण करायला बेल तीन पानाचा असतो. हा बेल सत्व, रज आणि तम कोणाचे प्रतीक आहे. त्यामुळे बेल अर्पण करणे म्हणजे आपले त्रिगुण अर्पण करणे असा अर्थ होतो. भगवान शंकर त्रिनेत्रधारी आहेत. त्यांच्याकडे पिनाक नावाचे धनुष्य, त्रिशूल आणि ब्रम्हांडाला भस्म करेल असा तिसरा नेत्र हे तीन आयुधे आहेत. जो भगवान शंकराला बेल अर्पण करतो. त्याच्या तीन जन्माचे पाप नष्ट होते. म्हणून भगवान शंकराला बेल अर्पण करायला पाहिजे.

Mahashivratri – बेल अर्पण करताना म्हणायचा मंत्र

हा मंत्र म्हणून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे. हा मंत्र शक्य नसेल तर ॐ नमः शिवाय किंवा हर हर महादेव म्हणून बेलपत्र अर्पण करावे. असा हा शिवरात्रीचा विधी कोणी केला त्यावर लिंग पुराणांमध्ये एक कथा आलेली आहे. ती पुढील प्रमाणे

महाशिवरात्रि कथा

चण्ड भिल्ल नावाचा एक पारधी समाजाचा मनुष्य असतो. जंगलामध्ये शिकार करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे त्याचे कार्य असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी निघाला. जात असताना एका शिवमंदिराच्या बाजूने तो जात होता. त्या शिव मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने लोक हर हर महादेव असा जय घोष करून भगवान शिवजी चे पूजन करीत होते. शिकार करण्यासाठी तो जंगलात गेला आणि एका झाडावर चढून बसला. ते झाड योगायोगाने बेलाचे होते. शिकार करण्यासाठी त्याला झाडाची पाने आडवी येऊ लागली. म्हणून त्याने ते बेलाची पाने तोडून टाकले. दुसरा योग असा की त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. बेलाची पाने शिवलिंगावर ते पडू लागली. गावातील लोकाचा हर हर महादेव चा ध्वनी त्याच्या कानावर येत होता. त्यामुळे तोही हर हर महादेव म्हणू लागला. दिवसभर खायला काही मिळाले नाही म्हणून उपवास घडला. त्याच्याकडून नकळतपणे शिवलिंगावर बेल अर्पण झाले. उपवास झाला आणि हर हर महादेव असा जप पण झाला. या सर्व क्रिया झाल्यामुळे भगवान शिवजी ची त्याच्यावर कृपा झाली आणि त्याला सर्व प्राणी पशुपक्षी यांची भाषा समजू लागली. रात्र उलटून जात होती तेव्हा सूर्योदयाला दोन हरीणी व एक काळवीट त्याच्या जवळील तलावावर पाणी पिण्यासाठी आले. काळवीट पारध्याने लावलेल्या जाळ्यामध्ये अडकून पडला. स्पर्धेने त्याला मारण्यासाठी धनुष्यबाण बाहेर काढला. तेवढ्यात एक हरणी त्याच्यासमोर आली.तिची शिकार करण्यासाठी त्यांने धनुष्याला बाण लावला आणि सोडणार इतक्यात ती हरणी बोलू लागली. हे जाळ्यात अडकलेले माझे पती आहेत. त्यांना मारण्यापूर्वी तू माझ्या वध कर कारण पतीच्या अगोदर मला मरण पाहिजे फक्त एक विनंती आहे कि माझी दोन पाडसे घरी उपवासी आहेत त्यांना दूध पाजून मी येते मग मला अवश्य मार. मी जर परत नाही आले तर मला महापातक लागेल. माझी पाडसे जर उपाशी राहिलें तर तुला पातक लागेल. त्यामुळे मला सोड. पारध्याने तिला सोडले. तेवढ्यात दुसरी हरणी तेथे आली. पारध्याने तिला मारण्यासाठी बाण लावला. तिने त्याला न मारण्याची विनंती केली कारण ती गर्भिण होती. ती म्हणाली हे परद्या माझ्या प्रस्तुती काळ जवळ आलेला आहे. काही वेळात मी पाळसांना जन्म देते. आणि नंतर तू मला माझ्या पतीच्या अगोदर मारू शकतो. दुसरी हरणी ही त्याच काळविटाची पत्नी होती. तेव्हा परदी म्हणाला मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवु तुम्ही परत याल. त्यावर दोघे हरणी म्हणाल्या’गुरु स्वामी यांच्याशी द्रोह करणारा, विश्वासघात करणारा याला नेहमी नरक प्राप्त होते . परद्रोह व परिंदा करणारा जन्मोजन्मी कावळा जे लोक पंक्तीमध्ये भेद करतात त्यांची बाळे लहानपणीच मरतात. नेहमी दुष्ट कर्म करणारे वराह, गाढव, कुत्रा इत्यादी नीच योनीत जन्म घेतात. जे भगवंताची पूजा करीत नाहीत ते बिळामध्ये राहणारे घुस किंवा सर्प होतात. पापी लोकांना तापलेल्या खांबाला बांधतात. तापलेल्या भूमीवर लोळवतात. त्या ठिकाणी त्यांना कावळे व इतर पक्ष येऊन त्वचा मारतात. पापी लोकांच्या माथ्यावर ये मधून घाव घालत असतात. त्यांना उपराटी टांगतात.’ इत्यादी प्रकारचे सर्व होणारे पाप आमच्या डोक्यावर येईल आम्ही जर सांगितल्याप्रमाणे नाही वागलो तर. आम्ही भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो. आम्ही तिघेजण आमच्या पाडसाला भेटून येतो. परद्याला त्यांची दया आली व सोडून दिले. थोड्याच वेळात ते काळवीट दोन हरणी आणि दोन बाळे परदध्याकडे आले. आणि सर्वजण मला आधी मार, मला आधी मार, विनंती करू लागले. तेव्हा त्या पारध्याला सर्व प्राण्यांची तयारी व सर्वांना सोडून दिले. पारध्याकडून नकळतपणे उपवास घडला. भगवान शंकराच्या पिंडीवरती बेल अर्पण केले. आणि लोकांना वाकूल्या दाखवण्यासाठी तो हर हर महादेव म्हणल्यामुळे नामजप झाला. नकळतपणे त्याचा महाशिवरात्रीच्या सर्व विधी पूर्ण झाला. म्हणून भगवान शंकराने त्याला कैलास लोकांमध्ये निवास दिला. आपणही सर्वांनी त्या भोळ्या शंकराची भक्ती भावाने सेवा करा. भगवान शंकरा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाहीत.

Leave a Reply