Holi !! होळी holi 2024 !! Sanskrit Shlok !!
कपाश्चितो हि शिशिरे शवसन्ते र्काशु तापीत:|
हत्वाग्नि कुरुते रोगनतस्तं त्वरया जयेत् ||
सदरील संस्कृत श्लोक आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत यांनी लिहिला आहे. यामध्ये होळी च्या सणाचे महत्त्व सांगितलेले आहे. शिशिर ऋतूमध्ये प्राण्यांच्या शरीरात कफ जमा होतो. हा कप घनस्वरूपमध्ये असतो. वसंत ऋतु सुरू झाला पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढू लागते. तेव्हा घन रूप असलेला कफ पातळ होतो. त्यामुळे प्राण्यांना सर्दी , पडसे ताप, खोकला, इत्यादी प्रकारचे आजार होतात. हे आजार शरीराची हालचाल केल्याने म्हणजेच विविध प्रकारची योगासने केल्याने नाहीसे होतात. यामध्ये मोठ्याने बोलणे, नाचणे, गाणे, वाजवणे ,पळणे, हा प्रकार करणाऱ्याला कफाचे रोग होत नाहीत. जे लोक वरील सर्व क्रिया करतात. ते रोगावर निश्चित विजय मिळवतात. या सर्व क्रिया लोकांकडून नकळतपणे झाल्या पाहिजेत. म्हणून ऋषीमुनी व साधुसंत यांनी जगत कल्याणासाठी उत्सव निर्मिती केली.
होळी धुलीवंदन उत्सव वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. होली हा सण पाच दिवस चालतो. यामध्ये धुलीवंदन करणे, मोठ्याने बोलणे, रंग फेकण्यासाठी एकमेकांच्या मागे धावणे, वाईट विचाराचे दहन करणे. इत्यादी गोष्टी केल्या जातात. उत्सवाचे निमित्त करून ऋषीमुनींनी ते व्यायाम समाजाकडून नकळत पण करून घेतल्या आहेत.
Holi – होळी चे प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले महत्त्व
होलिकायां भवेद्भस्म तृष्णा द्वेष आघानि|
वरील संस्कृत श्लोकामध्ये होली( होळी)उत्सवा बद्दल विशेष महत्त्व सांगितले आहे. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. या देशात अनेक धर्मामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. दिनांक 24 मार्च 2024 रोजी होळी उत्सव आहे. या दिवसाचे महत्त्व प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे.
‘ याच दिवशी शंकराने |काम जाळीला तिसऱ्या नयने’ आपल्या ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दिवसाचे महत्व वर्णन याच भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नयनाने बाधक असणारा काम जाळून भस्म केला तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. काम हा शत्रू सर्वांनाच त्रास देणार आहे. त्याच्यावर विजय मिळवलेले चा हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे दुसरे महत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात.
Holi – होळी च्या दिवशी भक्त प्रल्हादाचा छळ करण्यात आला.
याच दिवशी प्रल्हादाची छळणा| केली होती होळीने जाणा|
परी दुःख न झाले प्रल्हाद प्राणा |हरी भक्त म्हणोनि||६८||
ग्रामगीता अध्याय २३
याच (होळीच्या)दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भक्त प्रल्हादाचा छळ करण्यात आला. भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू हे असुरी वृत्तीचे होते. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अनेक प्रकारचे वर मागून घेतले होते. ब्रह्मदेवाचा वरदहस्त असल्यामुळे हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजू लागले. आणि इतर देवतांना तुच्छ लेखू लागले. जो देवांची पूजा करी त्याला हिरण्यकशकू मारून टाकीत असे. परंतु हिरण्यकश्यपू चा पुत्र भक्त प्रल्हाद भगवंताची सेवा करत असे. अनेकांना भगवंताचे महत्त्व पटवून सांगून त्यांना सेवा करायला लावत असे. प्रल्हादाची ही कृती हिरण्यकश्यपूला मुळिच आवडत नव्हते. हिरण्यकश्यपुचे म्हणणे होते भक्त प्रल्हाद त्यांच्या कीर्तीला कलंक लावीत आहे . अशा या दुर्बुद्धी कुलांगाराला वठणीवर आणण्यासाठी त्याला मारलेच पाहिजे .त्यामुळे त्याने भक्त प्रल्हादाला ठार मारण्याचे आदेश दिले.
आहामर्षरुषाविष्ट: कषायीभूतलोचन:|
वध्यतामा सश्वयं वध्यो नि:सारयत नैर्ऋता||३४||
श्रीमद्भागवतमहापुराण सप्तम स्कंद अध्याय ५
प्रल्हादाने भगवंताची भक्ती करणे सहन न झाल्याने हिरण्यकश्यपूचे डोळे रागाने लालबुंद झाले,तो दैत्याला म्हणाला त्याला ताबडतोब मारून टाका. हा मारून टाकण्याच्या लायकीचाच आहे. हिरण्यकश्यपूची आज्ञा ऐकताच सर्व दैत्त्याने भक्त प्रल्हादावर आपले आपले शस्त्र चालवले. त्या सर्व शस्त्राचा काही उपयोग झाला नाही. दैत्त्यांनी मारण्याचे अनेक प्रयत्न केले. प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले, उंच डोंगरावरून खाली फेकून दिले, हत्तीच्या पायाखाली दिले परंतु या सर्व गोष्टीचा काहीही परिणाम झाला नाही. भक्त प्रल्हादाला मारण्यामध्ये सर्व दैत्य अपयशी झाले.
तेव्हा होलिका समोर आली. होलीका ही हिरण्यकशपूची बहीण होती. तिने तपश्चर्या करून देवाकडून अग्नी तिला जाळणार नाही, असा वर मागून घेतला होता. ती म्हणाली ‘प्रल्हादाला मी मारते’. हिरण्यकश्यपुणे मोठ्या आनंदाने तिला परवानगी दिली. तिने गावातील अनेक जळाऊ लाकडांचा ढिगारा केला. त्या ढिगार्यावर जाऊन बसली. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले. दैत्यांना ती लाकडे पेटवून देण्यास सांगितले. त्या जळावु लाकडांना फार मोठा अग्नी लागला. अग्नीमध्ये होलिका जळून भस्मसात झाली. प्रल्हादाला काही झाले नाही. होलीका भस्मसात झाली याचे कारण भगवंताने तिला स्वतःच्या संरक्षणासाठी अग्नी काही करणार नाही असे सांगितले होते. पण तिने त्याचा उपयोग दुसऱ्याला मारण्यासाठी केला म्हणून ती भस्मसात झाली.
शेवटी छळणारे चे जळले|हे गावासि कौतुक झाले|
म्हणून जन ओरडले|उपहास त्यांचा करोनि|||६९||
ग्रामगीता अध्याय २३
भक्ताला (सज्जनाला) छळणारे जळाले म्हणून गावातील लोकांना आनंद झाला. हा आनंद कोणी गुलाल उधळून, विविध प्रकारचे रंग उधळून साजरा केला. कोणी आनंद उत्सवामध्ये धुळी मध्ये लोळले. म्हणून या उत्सवाला धुलीवंदन असेही म्हणतात. हा उत्सव पाच दिवस चालला म्हणून पंचमीच्या दिवशी रंगपंचमी खेळतात. भगवान श्रीकृष्णाने हा उत्सव साजरा करताना रंगाची उधळण केलेली आहे. या उत्सवाचा मुख्य उद्देश वाईट प्रवृत्ती नष्ट करणे असा आहे. हा उत्सव कशाप्रकारे साजरा केला पाहिजे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत सांगितलेले आहे.
त्याच दिवशी सज्जनांनी|वार्षिक यज्ञाची केली आखणी|
संपूर्ण गाव साफ करोनी|द्यावे पेटवोनि कैचन ते ||७१||
ग्रामगीता अध्याय २३
होळीच्या दिवशी गावातील सज्जन आणि एकत्र येऊन अगोदर सर्वांनी गाव साफ करून घ्यावा. त्यातून टाकाऊ निघालेला कचरा जाळून टाकावा. उत्साहाचे निमित्त करून गाव स्वच्छ होते. हा कचरा मोठ्या प्रमाणात एकत्रित केलेला असतो. त्यामुळे तो जळत असताना फार मोठ्या प्रकाश होतो.
त्याच्या प्रकाशीसर्वांनी जमावे|आपले दुष्कृत्य निवेदावे|
पुढे तैसे न करण्याचे योजावे |अनुतापाने ||७२||
ग्रामगीता अध्याय २३
त्याच्या प्रकाशामध्ये सर्वांनी एकत्रित यावे. सर्वांनी स्वतःच्या अंगी असलेले दुर्गुण सांगावेत. यामध्ये द्वेष ,राग, लोभ, विविध प्रकारचे व्यसने षड्विकार सर्वांसमोर प्रगट करावेत. आणि पुन्हा मी असे दुर्गुण करणार नाही अशी अग्नीला साक्षी ठेवून शपथ घ्यावी. गावातील घाण जसा अग्नि जळतो तसं आमच्या मनातील असलेले द्वेष अग्नीने जळाले पाहिजेत. होली हा दुर्गुण जाणारा सण आहे. गावाचे पाप जळणारा सण आहे. परंतु होळी सणाचा विप्रयास झालेला आहे.
पुढे याचा विपर्यास झाला|शिवीगाळ देती परस्पराला|
पोथ्याही सांगती अभद्र बोला| याचे मूळ न जाणता||७४||
ग्रामगीता अध्याय 23
होलिका ने प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी तिच्या या दुष्कृत्याचा निषेध म्हणून तिला शिव्या दिल्या. काही लोक याचा विप्रयास म्हणून शिव्या देण्याचा दिवस असे समजून एकमेकांना शिव्या देतात. ते मूळ ग्रंथांमध्ये पाहत नाहीत. काही लोकांनी होलिका चा निषेध म्हणून त्यावेळेला बोंब मारली. त्याचा विप्रयास म्हणून अलीकडे बोंबलण्याचा दिवस असेही या दिवसास म्हटले जाते.
कुणाची लाकडे चोरून नेती|घराच्या वस्तूही होळीत टाकती
गाडी घोड्यांचे सामान जाळती| खाट नेती स्मशानी ||
होळीच्या सणामध्ये जो कचरा टाकाऊ वस्तू पासून तयार झालेला आहे. ज्यांचा काही उपयोग होणार नाही यांचे दहन केले पाहिजे. परंतु विप्रयास म्हणून कुणाची तरी लाकडे चोरून आणतात. काहीजण घरातले लाकडी वस्तू ही त्यामध्ये टाकतात. व हा सण करताना
Holi – होळी पूजन
आधी सार्वजनिक अग्निपूजन| त्यात वाईट वृत्तीचे दहन|
मग राख नवी उघडी पूर्ण| करावे स्नान समुदाये ||७७||
प्रथम अग्नीचे पूजन करून घ्यावे. या आपल्या वाईट वृत्तीचे दहन झाले पाहिजे. वाईट वृत्ती, वाईट कृती, वाईट विचार, इ. दहन यामध्ये झाले पाहिजे. हाच होळी या सणाचा प्रमुख उद्देश आहे. कचरा जळत असताना त्यापासून खत तयार होत असेल तर अगोदर तो बाजूला करावा. त्यापासून खत तयार करावे. दहनातील वस्तू कुणाच्या कामाला येत असतील तर त्या त्यांना द्याव्यात. ज्या वस्तू कोणाच्याही कामाच्या नाहीत आणि समाजाला रोग पसरणाऱ्या आहेत अशाच वस्तूचं होलीमध्ये दहन केले पाहिजे. या होळीच्या सणा समाज उपयोगी कार्यक्रम ठेवले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा केला पाहिजे. मनुष्य हा उत्सव प्रिय आहे. उत्सव साजरा करताना सर्वांना पूरक होईल असा साजरा करावा. आपणा सर्वांना होळी दिनाच्या शुभेच्छा.