दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी Hanuman Jayanti हनुमान जयंती (जन्मोत्सव) आहे. चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती (जन्मोत्सव) केला जातो.
Hanuman Jayanti – हनुमान जयंती ला जयंती म्हणण्याऐवजी जन्मोत्सव म्हणावे. कारण जयंती त्यांची साजरी होते ज्यांनी लोककल्याणासाठी आपल्या देहाचा त्याग केला आहे. हनुमान जी चिरंजीवी असल्याकारणाने त्यांनी देहाचा त्याग अद्याप केलेला नाही.
Table of Contents
चिरंजीवी ची यादी संस्कृत श्लोकामध्ये दिलेली आहे.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण:|
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: ||
हा संस्कृत श्लोक चिरंजीवी ची यादी सांगतो. सदरील संस्कृत श्लोकामध्ये
1) अश्वत्थामा
2) बळीराजा
3) महर्षि व्यास
4) हनुमान
5) बिभीषण
6) कृपाचार्य आणि
7) परशुराम
हे सात चिरंजीवी आहेत असे सांगितले आहे. चिरंजीवी ची जयंती होत नसते त्यामुळे Hanuman Jayanti ऐवजी हनुमान जन्मोत्सव असे म्हणावे.
हजारो वर्षांपूर्वी गौतम ऋषिची मुलगी अंजनी व केसरी यांच्या पोटी चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या पूर्वी झाला. समरीराज केसरी हा वायू देवतेचा अवतार आहे. हनुमानाचा जन्म झाला सूर्यनुकताच उगवला होता. बाल हनुमानाला वाटले ते खाण्याचे फळ आहे. त्यामुळे ते फळ खाण्यासाठी सूर्याकडे उठाण घेतले. हनुमानाने सूर्य गिळला तर पृथ्वीवर हाहाकार माजेल म्हणून इंद्राने आपले वज्र हनुमानाला मारले. बाल हनुमान मूर्च्छित पडला .आपल्या लहान बालकाला इंद्राने
वज्र मारल्यामुळे वायू देवाने संप केला. त्यामुळे पृथ्वीवरील जीवजंतू, प्राणीमात्र, वनस्पती यांचा स्वाच्छोश्वास बंद झाला. म्हणून सर्व देवतांनी मिळून वायू देवाची प्रार्थना केली आणि पुन्हा कार्यरत होण्यासाठी विनंती केली. हनुमंताला सर्व देवतांना आशीर्वाद दिले. इंद्राने हनुमानाला शक्ती दिली. सूर्याने स्वतःच्या अंशाचे तेज दिले.
त्यामुळे तो प्रखर बुद्धिमान झाला. यम वरूण इत्यादी देवांनी हनुमानाला काही ना काही तरी दिले. त्यामुळे हनुमान शक्ती संपन्न आणि बुद्धी संपन्न झाले पुढे बालपणी हनुमान आपल्या शक्तीचा उपयोग ऋषींना त्रास देण्यासाठी केला. त्यामुळे ऋषींनी हनुमानजीला शाप दिला की तुमची शक्ती सूप्त राहील. ज्यावेळेस त्याची गरज भासेल तिचे स्मरण केल्यावरच प्राप्त होईल. हनुमानजी कडे शक्ती आहे. पण ती सुप्त अवस्थेत आहे .त्यांना वेळोवेळी शक्तीची जाणीव करून द्यावी लागली. हनुमानजी बलशाली आणि बुद्धी संपन्न होते. त्यांना मानसशास्त्र, राजनीती, साहित्य ,तत्त्वज्ञान, शास्त्र यांचे खूपच ज्ञान होते. हनुमान जी प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. हनुमानजी चा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये केलेला आहे.याच ग्रंथातील काही श्लोक आपण Hanuman Jayanti निम्मित पाहत आहोत
बुध कौशिक ऋषी आपल्या राम रक्षा संस्कृत श्लोक मध्ये हनुमान जी चा उल्लेख
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठम् |
वातात्मज वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं शरणंं प्रपद्ये ||
हा संस्कृत श्लोक रामरक्षातील आहे .या संस्कृत श्लोकामध्ये हनुमानाला सात उपमा खालील प्रमाणे दिल्या आहेत
1) मनोजवम्
याचा अर्थ मनाच्या भविचारत वेगा प्रमाणे धावणारा .मनाचा वेग अत्यंत प्रचंड असतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मनासंबंधी बोलतात ‘मन बहुत चंचल आणि चपाळ कोठे जाता येताना लागे वेळ’ क्षणार्धात मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते.
मनाच्या संदर्भात अर्जुन श्रीमद् भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला विचारतात.
चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् |
तस्याहं निग्रहं मन्ये वायोपरिव सुदुष्करम् ||
श्रीमद्भगवद्गीता ६/३४
सदरील संस्कृत श्लोक श्रीमद् भगवत गीतेतील आहे. या संस्कृत श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णाला मनाच्या चंचलते विषयी विचारतो. अर्जुन म्हणतो हे कृष्ण मन हे अत्यंत चंचल दृढ आणि बलवान आहे.
ज्याप्रमाणे आकाशात वाहणाऱ्या वायूला कोणीही आपल्या मुठीत पकडू शकत नाही त्याप्रमाणे या मनाचा निग्रह करणे अत्यंत कठीण आहे. असे मनाच्या वेगाने क्षणार्धात कोठेही जाणारे आणि कोठूनही परत येणार हनुमंत राय आहेत. त्यांना मनोजवम् ही उपमा सार्थ आहे.
2) मारूततुल्यवेगम्
मारुती म्हणजे वारा वाऱ्याच्या वेगाने धावणारे हनुमंत राय तुम्ही आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा हनुमंत राय लंके वरून उत्तर प्रदेशात गेले.तेथून द्रोणागिरी घेऊन परत आले. तेही रात्री गेले आणि सकाळ होण्याच्या आत परत आले. त्यामुळे त्यांना मारुततुल्यवेगम हि उपमा शोभते.
3) जितेंद्रियम्
जितेंद्रिय म्हणजे जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो.
4)बुद्धिमतां वरिष्ठम्
हनुमंत राय अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे होते .त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी शिष्टायीची अनेक कामे हनुमंत रायला करायला लावले.
5) वातात्मजं
हनुमंत रायला वातात्मजम् म्हणतात. कारण हनुमंत हे वायुदेवतेचे पुत्र आहेत.
6) वानरयुथमुख्यं
वानरामध्ये हनुमंत रायाचे स्थान असामान्य होते. त्यांना उत्कृष्ट मान होता. सुग्रीवाच्या राज्यामध्ये ते प्रधान मंत्री होते. सर्व वानर युवकाचे ते हृदयस्त होते. म्हणून त्यांना ‘वानर युथमुख्यम्’ ही पदवी शोभते.
7) श्रीरामदुतम्
भगवान श्री रामाचा दूत म्हणून त्यांनी अनेक वेळा जिम्मेदारी पार पाडली. हनुमंत हे भगवान श्रीरामाचे निश्चिम भक्त आहेत.
रामायणाच्या उत्तराखंडमध्ये वाल्मिकी ऋषी हनुमंताचे पुढील प्रमाणे वर्णन करतात.
शौर्यं दाक्ष्यं बलं धैर्यं प्राज्ञता नयसाधनम् |
विक्रमश्च प्रभावश्च हनुमति कृतालय: ||
रामायणाचे रचेता वाल्मिकी ऋषी या संस्कृत श्लोकांमध्ये हनुमंताचे वर्णन करतात. हनुमंताकडे अनेक कौशल्य आहेत. त्यामध्ये ते प्रज्ञा आहेत .त्याच्याकडे धीर आहे, ते वीर आहेत, राजनीति मध्ये ते निपुण आहेत, या सगळ्या गोष्टींची हनुमंत राय खाण आहेत.
गोस्वामी तुलसीदास हनुमंत राया विषयी आपल्या संस्कृत श्लोकामध्ये लिहितात
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं
दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यम् |
सकलगुणनिधानं वानराणामधीशं
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ||
सदरील संस्कृत श्लोक हा रामचरितमानसमध्ये आहे. रामचरितमानस मधील सुंदरकांड लिहिताना गोस्वामी तुलसीदासांनी हा संस्कृत श्लोक लिहिला. या संस्कृत श्लोकांमध्ये हनुमंताचे वर्णन केलेल आहे. अतुलित बलराम म्हणजे ज्यांच्याकडे अतुलनीय असं शक्ती आहे.
त्यांच्या शरीराची कांती सुवर्ण पर्वताप्रमाणे आहे. दैत्यरुपी वन जाळण्यासाठी अग्नी रूप धारण करणारे ,समस्त सद गुणांची खाण असणारे, ज्ञानी पुरुषांमध्ये अग्रगण्य असणारे ,जे वानरांचे स्वामी आहेत, अशा श्रीरामाच्या आवडत्या भक्ताला, पवनपुत्राला मी नमस्कार करतो. जे भक्त हनुमंत रायाचे भजन करतात त्यांच्या जीवनात अनेक समस्या दूर होतात.
भूत पिसाच नीकट नही आवै
महावीर जब नाम सुनावै ||
जे हनुमानजी चे निरंतर भजन करतात. त्यांच्याजवळ भुत पिशाच्य येत नाही.
नासे रोग हरे सब पीरा |
जप्त निरंतर हनुमंत वीरा ||
जय हनुमान जी चे निरंतर भजन करतात. त्यांचे सर्व रोग नाहीसे होतात.
संकट ते हनुमान छुढावे |
मन क्रम वचन ध्यान जो लावे||
हनुमान ज्याच्या चरणी जे मन लावतात. त्यांची सर्व संकटे हनुमानजी दूर करतात.
म्हणून सर्वांनी नित्य हनुमानजी चे भजन करावे. त्यांचा जन्मोत्सव साजर करावा सर्वांना हनुमान जन्मांच्या हार्दिक शुभेच्छा.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी