You are currently viewing Guru Purnima -गुरु पूर्णिमेचे महत्त्व: संस्कृत श्लोकांद्वारे अध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश 

Guru Purnima -गुरु पूर्णिमेचे महत्त्व: संस्कृत श्लोकांद्वारे अध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश 

मानवीय जीवनामध्ये माता -पित्याचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर गुरूंचेही जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माता पिता आणि गुरु यांचे वर्णन करणारे अनेक संस्कृत श्लोक आहेत. त्यापैकी माता-पिता आणि गुरु यांचे वर्णन करणारे काही संस्कृत श्लोक आपणास समोर Guru Purnima -गुरु पूर्णिमा महत्त्व: संस्कृत श्लोकांद्वारे अध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देत आहोत.

Guru Purnima – गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे कारण संस्कृत श्लोका मधून

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे 

फुल्लारविन्दायतपत्र नेत्र |

येन त्वया भारततैलपूर्ण: 

प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप: |

भारतीय संस्कृतीमध्ये वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. वेदामध्ये भारतीय धर्म दर्शन, अध्यात्म, आचार -विचार ,रीती- निती, विज्ञान, कला, या सर्वांचा समावेश केलेला आहे, वेद जाण्यामध्ये माणसाची बुद्धी कमी पडू लागली म्हणून व्यासांनी वेदाचे चार भाग केले.

ते भाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे चार वेद व्यासांनी आपल्या चार शिष्यांना शिकवले. त्यामध्ये पैल ऋषीला ऋग्वेद, वैशंपायन ऋषीला यजुर्वेद, जैमीनी ऋषीला सामवेद आणि सुमंतु ऋषीला अथर्ववेद यांचे अध्यायन केले. व्यास याचा अर्थ विस्तार करणे होय. महर्षी व्यासांनी वेदाचा विस्तार केला म्हणून त्यांना वेदव्यास असे म्हणतात.

त्याचबरोबर महर्षी व्यासाने महाभारताची ही रचना केली ज्या महाभारताला पंचमवेद असे म्हणतात. श्रीमद् भगवद्गीता ही महाभारतातील एक अंशात्मक भाग आहे महर्षी व्यासांनी 18 पुणे निर्माण केले. उपनिषदे लिहिली. ब्रह्मसुत्राचे निर्माण केले. या सर्वावर शंकराचार्य वल्लभाचार्य अशा अनेक विद्वानांनी आपले भाष्य केले.

त्याचबरोबर महर्षी व्यासांनी मानवाच्या कल्याणासाठी श्रीमद् भागवत पुराण ज्याच्यामध्ये 18 हजार श्लोक आहेत त्याची रचना केली. आज जगामध्ये जेवढे ज्ञान उपलब्ध आहे ते सर्व व्यासांच्या ग्रंथामध्ये आढळून येते त्यामुळे या जगताला व्यासचिष्ठ जगत असे म्हणतात अशा या महान ऋषींची वर्णन वरील संस्कृत श्लोकामध्ये केले आहे सुभाषितकार म्हणतात “ज्यांचे नेत्र उमलेल्या कमळाच्या पाकळ्या सारखे आहेत, ज्यांची बुद्धी अत्यंत महान आहे. ज्या व्यासांनी आपल्या ग्रंथाद्वारे  ज्ञानाचे दीप प्रजलित केले. अशा वेध व्यासांना मी नमस्कार करतो. 

      व्यासांनी जेवढे लिखाण केले आहे तेवढे लिखाण आज पर्यंत कोणीही लिखाण केलेले नाही. आणि पुढे करणे हे शक्य नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये आषाढी पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.  व्यास हे सर्व जगताचे गुरु असल्यामुळे या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात.  दिनांक 21 जुलै 2024 रोजी व्यासपौर्णिमा (गुरुपौर्णिमा) आहे. 

Guru Purnima – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली गुरु विषयी म्हणतात

आपल्याला जर जीवनामध्ये काही प्रगती करायची असेल तर त्यांनी गुरूला भजले पाहिजे. गुरुशिवाय जीवनामध्ये प्रगती करणे शक्यच नाही असे ज्ञानेश्वराने आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहे.

म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे | तेणें कृतकार्य होईजे |

जैसै मूळसिंचने सहजें | शाखापल्लव संतोषती |

ज्ञानेश्वरी अध्याय पहिला  २५

गुरु हे जीवनात कोणत्या स्थानी असतात .हे खालील संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:|

गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

सदरील संस्कृत श्लोका मध्ये गुरूंचे वर्णन केलेले आहे. गुरु हा संस्कृत शब्द असून त्याचा मराठी मध्ये अर्थ गुरुजी असा होतो. इंग्रजीमध्ये टीचर असे म्हणतात. गुरु हे मार्गदर्शक असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी शिकवत राहतात.

अशा गुरूंचा मोठेपणा किती आहे हे सदरील संस्कृत श्लोकांमध्ये वर्णन केलेले आहे. संस्कृत सुभाषितकार म्हणतात गुरु हे ब्रह्म आहेत, ते विष्णू आहेत, तसेच ते भगवान शंकर ही आहेत, ते परब्रम्ह आहेत अशा गुरूंना मी नमस्कार करतो. 

त्वमेव माता च पिता त्वमेव 

त्वमेव बन्धश्च सखा त्वमेव |

त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव 

त्वमेव सर्वं मम देवदेव ||

हे भगवंता तुम्ही माझे माता आहात. तुम्हीच माझे पिता आहात.तुम्हीच माझे सर्व नातेवाईक आहात, तुम्हीच विद्या आहात, तुम्हीच द्रव्य म्हणजे माझ्या जीवनातील धन आहात. अशा रीतीने तुम्हीच माझे देवांचे देव ( सर्वस्व)आहात.

शरीरं चैव वाचं च बुद्धिन्द्रिय मनांसि च |

नियम्य प्राञ्जलि: तिष्ठेत् वीक्षमाणो गुरोर्मुखम् ||

गुरु कडून शिक्षण घेत असताना आपले   तन, मण, वाणी, बुद्धी इन्द्रिय यांचा संयम करुन हात जोडून गुरूंच्या समोर बसुन विद्यार्जन करावे. 

गुकारस्त्वन्धकारस्तु रुकर चरण उच्च्यते |

अन्धकार निरोधत्वात् गुरूरित्यभिधीयते ||

सदरील संस्कृत श्लोकामध्ये गुरु कोणाला म्हणतातयाची व्याख्या केलेली आहे. गु (‘गु’कार) या शब्दाचा अर्थ अंधकार असा होतो. आणि ‘रु’ या शब्दाचा अर्थ प्रकाश असा आहे. जे विद्यार्थ्यांच्या जिवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश विद्यार्थ्यांना देतो त्यांना गुरु असे म्हणतात. 

Guru Purnima – श्रीमद्भागवतगीता संस्कृत श्लोक

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया |

चक्षुरुन्मीलीतं येन तस्मै श्रीगुरवे नम: ||

सदरील संस्कृत श्लोक श्रीमद्भागवत या ग्रंथातील असून या संस्कृत श्लोकात महर्षी व्यास आपल्या गुरूंना नमस्कार करतात. नमस्कार करत असताना ते सर्वच गुरूंना नमस्कार करत नाहीत. गुरु हे अनेक प्रकारचे असतात. मंत्र गुरु, यंत्र गुरु, तंत्र गुरु, सद्गुरू, जगद्गुरु इ. असे अनेक प्रकार गुरूंचे आहेत. म्हणून महर्षी व्यास विशिष्ट गुरुणां नमस्कार करतात ते म्हणतात,अज्ञानरूपी अंधारामुळे आंधळा झालेल्या मनुष्याच्या  जीवनातील अज्ञानाचा अधंकार घालवण्यासाठी ते डोळा मध्ये ज्ञानरूपी काजळ काडीने घालून ज्ञानाची ज्योत पेटवतात त्या गुरुला माझा नमस्कार असो. 

Guru Purnima – गुरुच्या अंगी कोणते गुण असावेत

सद्वर्तनं च विद्वत्ता तथाऽध्यापनकौशलम् |

शिष्यप्रियत्वमेताद्धि गुरोर्गुणचतुष्टयम् |

सदरील संस्कृत श्लोक मध्ये गुरुच्या अंगी कोणते गुण असावेत हे सुभाषितकाराने सांगितले आहे. गुरूंकडे चार गुण असले पाहिजेत १) सद्वर्तनम् म्हणजे गुरूंचे आचरण चांगले असले पाहिजे. २) त्यांच्याकडे विद्वत्ता खूप असली पाहिजे. ३)त्यांना अध्यापन कौशल्य म्हणजेच शिकवण्याची कला चांगली अवगत असली पाहिजे आणि ४) ते शिष्यांचे प्रिय गुरु असले पाहिजेत. हे चार गुण प्रत्येक गुरूंच्या अंगी असले पाहिजेत. आज गुरु मध्ये सद्वर्तनम् हा गूण फार दुर्मिळ झाला आहे. 

वसुदेवसुतं देवं कंसचाणुरमर्दनम् |

देवकीपरमानन्दं  कृष्णं वन्दे जगद्गुरुम् |

भगवान गुरुरूपाने महत्व सदरील संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण जे वसुदेवजी चे पुत्रअसून, ज्यांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले, दृष्ट प्रवृत्ती असणाऱ्या कंस आणि त्याला सहकार्य करणारे चाणुरादी  यांचा नाश करणाऱ्या आणि देवकी मातेला परमानंद देणाऱ्या त्या जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो.

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave a Reply