Gudi Padwa विषयी विशेष महत्त्व , या दिवशी कडुनिंबापासून प्रसाद कसा तयार करावा, गुढीपाडवा विधीचे महत्त्व काय आहे. गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो पुराणांमध्ये काही माहिती सांगितलेली आहे. शके 1946 क्रोधी नाम संवत्सराचे फल काय असणार आहे, हे खालील काही संस्कृत श्लोकातून सांगितले आहे.
Table of Contents
Gudi Padwa – विषयी विशेष महत्त्व
नात्वा गणपतिं खेटान् ब्रह्माविष्णूशिवात्मकान्|
संवत्सरफलं वक्ष्ये सर्वकामार्थ सिद्धये ||
सदरील संस्कृत श्लोकामध्ये Gudi Padwa विषयी विशेष महत्त्व सांगितले आहे. या उत्साहाला सुरुवात करताना ते कार्य सिद्ध होण्यासाठी भगवान गणेशाला नमस्कार करावा. गुढीपाडवा का साजरा करावा? त्याचे फळ काय आहे? तो कसा साजरा करावा? हे सांगण्यापूर्वी जगाची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, जगाचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू, जगाचा सृजन करणारे भगवान शंकर यांना नमस्कार करून क्रोधी नाम संवत्सराचे फल सांगतो. गुढीपाडवा या दिवशी नूतन संवत्सर सर सुरू होते. या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभा करतात. मंगल स्नान करून ब्रह्मदेवासह सर्व देवांची पूजा करतात. घरातील पुरुष मंडळी स्त्रिया व मुले यांना नवीन वस्त्रे व अलंकार यांनी विभूषित करतात. गुढीपाडव्या दिवशी कोणती विधी करावी हे पुढील संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे.
Gudi Padwa – विधीचे महत्त्व
तैलाभ्यंगं स्नानमाधौ च कृत्वा पीयूषोत्थं परिभद्रस्य पत्रम् |
भक्षेत्सौख्यं मानवो व्याधिनाशं विध्यायुश्रीर्लभ्यते वर्षमुले ||
परिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषत: |
सपुष्पानि समानीय चूर्ण कृत्वा विधानत:||
हा संस्कृत श्लोक गुढीपाडव्याच्या विधीचे महत्त्व सांगणार आहे. गुढीपाडव्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. अंगाला सुगंधी उठणे तेल लावून अभ्यंग स्नान करून घ्यावे. स्त्रियांनी घरासमोर सडासारवण करून उत्तम अशी रांगोळी काढावी . अम्रवृक्षाच्या पानाचे दाराला तोरण बांधावे . गुढी उभारण्यासाठी एक वेळची काठी घेतात . त्यावर भर जरी वस्त्र त्या वेळुच्या काठीवर एक तांब्याचा तांब्या ठेवतात. त्या काठीला कडुनिंबाचा फंटा साखरेचा किंवा खोबऱ्याचा हार अर्पण करतात. ती वेळुची काटी घराच्या दारासमोर उभारतात.
या काठीलाच गुढी किंवा ब्रह्मध्वज असं म्हणतात . गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढ्या तोरणे उभारण्यात येतात व त्यांचे पूजन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशीअमृता पासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या तौरासह (पुष्पासह) कोवळ्या पानाचे चूर्ण करून घ्यावे. गुढी पाडव्याच्या दिवशी हे प्रसाद म्हणून भक्षण करावे. कडुनिंबाची अंगी औषधी गुण असल्यामुळे या प्रसादाचे भक्षण केल्यानंतर अनेक व्याधीचा नाश होतो. त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होते.
Gudi Padwa – या दिवशी कडुनिंबापासून प्रसाद कसा तयार करावा
मरीचि हिंगुलवणमजमोदासशर्क रै:|
तिंतिणि मेलनं कृत्वा भक्षयेद्रोगशांतये ||
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबापासून प्रसाद कसा तयार करावा हे सदरील संस्कृत श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. कडुलिंबाच्या प्रसादामध्ये मिरे, हिंग, मीठ, ओवा गुळ यांचे मिश्रण घ्यावे. या सर्वांचे मिश्रण चिंचेसहित एकत्र करावे. हे सर्व एकत्र खाल्ल्यास अनेक रोग नाहीसे होतात. हा प्रसाद सर्व लहान थोर मंडळी खातात. त्यामुळे त्यांचे शरीर तेजस्वी निरोगी आणि सुदृढ बनते.
संस्कृत श्लोकातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद |
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्य मद्गृहे मङ्गलं कुरू ||
जो ध्वज सर्व सर्व अभिष्ट फल देतो अशा ब्रह्म ध्वजाला माझा नमस्कार असो, मी आपल्या चरणी अशी प्रार्थना करतो की येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलदायी जावो.
सूर्य संवेदना पुष्पे दीप्ति कारुण्यगंधने |
लब्ध्वा शुभं नववर्षेऽस्मिन कुर्यात्सर्वस्य मंगलम् ||
ज्याप्रमाणे सूर्य जगाला प्रकाश देतो, संवेदना करूणाला जन्म देते, फुल नेहमी फांदीवर टवटवीत असते, त्याप्रमाणे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला मंगलदाई जावो ही शुभेच्छा.
9 एप्रिल 2024 गुढीपाडवा विषयी
दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे. गुडी म्हणजे ध्वज किंवा झेंडा. हा ध्वज विजयाचे प्रतीक असून तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी फडकावला जातो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखाद्या किल्ल्यावर विजय मिळवत असत तेव्हा त्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकून आनंद उत्सव साजरा करीत असत .पाडवा म्हणजे प्रतिपदा .
गुढीपाडव्याचा हा सण भारतामध्ये विविध ठिकाणी साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हिंदूंच्या नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे.
गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दीपावली पाडवा हिंदू संस्कृतीमध्ये हे तीन पुर्ण मुहूर्त आहेत. आणि विजयादशमी हे अर्धे मुहूर्त आहे. म्हणून कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. हा शालिवाहन संवत्सराचा पहिला शुभ दिवस आहे.
गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो पुराणांमध्ये काही माहिती
- ब्रह्मदेवाने याच दिवशी जगाची निर्मिती केली असे ब्रह्मांड पुराणांमध्ये सांगितले आहे. जगाच्या निर्मितीचा दिवस म्हणून गुड्या उभारून हा सण साजरा केला जातो.
- रामायण या ग्रंथामध्ये प्रभू रामचंद्राने रावणासह व अन्य दुष्ट राक्षसांचा पराभव केला त्यांना ठार मारुण आपल्या आयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर नगरवाशीयांना आनंद झाला तो आनंद त्यांनी गुढी उभारून साजरा केला. म्हणून प्रतिवर्षी हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो.
- काही ग्रंथामध्ये नारद पत्नीस झालेले 60 मुले 60 संवत्सरे मानले जातात. या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस गुढीपाडवा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवसांमध्ये निसर्गात अनेक बदल झालेले असतात. झाडांना नवीन पाली फुटलेले असते. अनेक झाडांना फुले याच दिवसात येतात.
- शालिवाहन शके या दिवसापासून सुरू झाल्यामुळे हा दिवस गुढी उभारून साजरा करतात .
शके १९४६ क्रोधी नाम संवत्सराचे फल पुढील प्रमाणे आहे.
कामार्ता: स्युर्भूमिषाला: समस्ता युद्धे सक्ता ईतिजा भीतिरुग्रा |
क्रोधिन्यब्दे मध्यवृष्टी: कणानां वृद्धि: श्याता क्रोधलोभौ जनानाम् ||
क्रोधी शालीवाहन संवत्सरांत सर्व राजे मद उन्मत्त होतील. पदासाठी त्यांच्यामध्ये लढाया होतील. या संवत्सरा मध्ये पाऊस जेमतेम पडेल. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे धान्य ,फळे, फुले व्यवस्थित वाढणार नाहीत. चोरांचा सुळसुळाट होईल. उंदीर, टोळ ,घुस सुवर इ. प्राण्यापासून शेतकरी वर्गाला त्रास जाणवतो. लोकांमध्ये षडविकार मोठ्या प्रमाणात वाढतील. पृथ्वी द्रव्य आणि
धान्य विरहीत होईल. राजेलोक आपसामध्ये लढाईत गूंतल्यामुळे जनतेकडे त्यांची दुर्लक्ष होईल. या सर्व गोष्टीचा लोकांना त्रास होऊन त्यांना सुख मिळणार नाही. तीळ उडीद गहू मुग यासारखी पिके चांगली येतील.
ऊस चंदन सोने यांच्या किमतीमध्ये पुष्कळ वाढ होईल. 21 जून पासून चांगला पाऊस पडेल. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद होईल. पावसामध्ये मधेच खंड पडल्यामुळे पिकाची नासाडी होण्याची शक्यता आहे. असे हे कृती शालीवाहन नाम संवत्सराचे फळ ग्रंथामध्ये सांगितलेले आहे.
इतर संस्कृत श्लोक पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा