You are currently viewing Ganesh Mantra – गणेश मंत्र संस्कृत श्लोक

Ganesh Mantra – गणेश मंत्र संस्कृत श्लोक

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे Ganesh Mantra संस्कृत श्लोक आहे.

Table of Contents

Ganesh Mantra – संस्कृत श्लोक 1

ॐ गं गणपतये नमो नमः| सिद्धिविनायक नमो नम|

अष्टविनायक नमो नमः| गणपती बाप्पा मोरया||

सदरील  संस्कृत श्लोकामध्ये अत्यंत प्रभावी असा ganesh mantra गणेश मंत्र सांगितलेला आहे. हे ओंकार स्वरूप असलेल्या गणेशा तुला नमस्कार असो. ज्या ठिकाणी भगवान विष्णूला आपण सिद्धी प्राप्त करून दिली अशा सिद्धीविनायका तुम्हाला नमस्कार असो. हे अष्टविनायका तुला माझा नमस्कार असो. अष्टविनायक म्हणजे श्री गणेशाचे महाराष्ट्रातील पुरातन आणि प्रसिद्ध अशी आठ मंदिरे होय.  अष्टविनायकापैकी पाच मंदिरे पुणे जिल्ह्यात, दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आणि एक मंदिर अहमदनगर जिल्ह्यात आहेत. मोरया गोसावी हा गणपती बाप्पाचा पुण्यातील भक्त होता त्याच्या नावाचा उल्लेख ही गणपती बाप्पाच्या नावाबरोबर केला जातो. हा मंत्र भक्ताचे कल्याण करणारा असून आत्म्याला शांती देणारा मंत्र आहे. अष्टविनायक व त्यांच्या ठिकाणाचे नाव पुढे दिले आहेत.

अष्टविनायक गणपती नावे व ठिकाण

  • १) गणनायक : मोरगाव
  • २) सिद्धि-विनायक:सिद्धटेक
  • ३) श्री बल्लाळेश्वर: पाली
  • ४) वरदविनायक: मढ(खोपोली)
  • ५) चिंतामणी: थेऊर
  • ६) गिरिजात्मक: लेण्याद्री 
  • ७) विघ्नेश्वर: ओझर
  • ८) महागणपती : रांजणगाव

Ganesh Mantra – संस्कृत श्लोक 2

ॐ गं गणपतये नम: | एकदंताय विद्महे |

वक्रतुण्डाय धीमहि| तन्नोधन ती प्रचोदयात ||८||

सदरील संस्कृत श्लोक (मंत्र)  हा गणपती अथर्वशीर्ष मधील आहे. श्री गणेशाच्या पूजनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व मंत्र म्हणण्याला आहे. मंत्रामध्ये त्या देवतेचे गुण वर्णन आणि फलश्रुती सांगितलेली असते. श्री गणेशाचे मनःपूर्वक पूजा केल्यास उपासकाला मनशांती मिळते. त्याचबरोबर तो उपासक श्री गणेशाच्या कृपेला पात्र ठरतो.

गणेश उपासनातील श्री गणपत्यथर्वशीर्षम् हे महत्वपूर्ण स्तोत्र असून ते प्रत्येकाने पाठ केले पाहिजे. या गणेश मंत्राचा  अर्थ ‘हे गणपती बाप्पा तुला नमस्कार असो. गणपतीचे एक नाव एकदंत असल्यामुळे गणपतीला उद्देशून हे एकदंता, वक्रतुंड आम्ही तुला प्रणाम करतो. तुझे आम्ही सतत ध्यान करतो. हे गणेशा आमचे कल्याण कर.

 कोणत्याही पूजेला सुरुवात करताना पूजेची सुरुवात गणपती पासून केली जाते. पुजेला गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीला गणपती समजुन पुजा करतात.श्री गणेश हा बुद्धीची देवता आहे. तो सुखाचा करता आणि दुःखाचा नाश करणारा आहे. गणेश पूजा करताना श्रद्धेला फार महत्त्व आहे. गणेशाला जास्वंदीचे लाल फुल प्रिय आहे. गणेशाला 21 दुर्वांची जुडी वाहतात.

दुर्वांची जुडी गणेशास अर्पण करताना म्हणायचा मंत्र

  • ॐ गणाधिशाय नमः|   
  • ॐ उमापुत्राय नमः|
  • ॐ अभयप्रदाय नमः|    
  • ॐ  एकदन्ताय नमः|
  • ॐ  उभवक्त्राय नमः|    
  • ॐ  मुषकवाहनाय नमः|   
  • ॐ विनायकाय नमः|  
  • ॐ इष्टपुत्राय नमः |
  • ॐ सर्व सिद्धीप्रदायकाय नमः|
  • ॐ लम्बोदराय नमः |
  • ॐ वक्रतुण्डाय नमः|.  
  • ॐ अघनाशाय नमः |
  • ॐ विघ्नविध्यंसकर्त्रे नमः|
  • ॐ विश्ववंद्याय नमः| 
  • ॐ अमरेश्वराय नमः|  
  • ॐ गजवक्त्राय नमः| 
  • ॐ नागयज्ञोपवीतिने नमः|
  • ॐ भालचंद्राय नमः| 
  • ॐ परशुधारीण्ये नमः| 
  • ॐ विघ्नाधिपाय नमः| 
  • ॐ सर्व विद्याप्रदाय नमः|

गणेशाचा मोदक हा अतिशय आवडता पदार्थ आहे. मोदक बाहेरून कडक असला तरी आत मध्ये गोड असतो. जो भक्त गणपतीला मोदक अर्पण करतो. गणपती त्या भक्ताला मोद म्हणजेच परमानंद देतो.

Ganesh Mantra – गणपतीला नमस्कार करताना म्हणायचा मंत्र

गजाननं भूतगणादिसेवितं 

कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्|

उमासुतं शोकविनाशकारकमं

नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम||

सदरील संस्कृत श्लोकामध्ये( मंत्रामध्ये) गणपतीला नमस्कार केलेला आहे.हे गजाचे अनन असणाऱ्या गणपती देवा आपली भूतगण , सुरगण, असुरगाण, मानवगण इत्यादी सर्वजण आपली मनोभावे सेवा करतात.आपण कवठ आणि जांभूळ या फळांना अतिशय आवडीने सेवन करतात. आपण माता पार्वतीचे पुत्र आहात. शोकाचा विनाश करणारे आणि भक्ताच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या हे गणपती देवा आपल्या चरण कमलाला मी प्रणाम करतो. गणपतीला नमस्कार करताना वरील मंत्र म्हणावा.

Ganesh Mantra – गणेशाची कृपा लवकर होते हा मंत्र बोलल्यास

अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पुजितो य: सुरासुरै:|

 सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः||

श्री गणेश विघ्नहर्ता असल्याने सर्वजण त्याचे मनोभावे पूजा करतात हे सदरील संस्कृत लोकांमध्ये सांगितले आहे.आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या, ज्यांचे पूजन सर्व सूर असूर गण मनोभावे करतात, भक्ताच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करणाऱ्या, भगवान शंकराच्या सेवक म्हणजे गण त्यांचा अधिपती असलेल्या गणेशाला मी नमस्कार करतो. हा मंत्र जपल्याने गणेशाची कृपा त्वरित होते.

Ganesh Mantra – कार्यारंभ करताना म्हणायचा मंत्र

नमस्तस्मै गणेशाय| सर्वविघ्नविनाशीने |

कार्यरंभेषु सर्वेषु |पूजितोय: सुरैरपि || 

भगवान श्री गणेशा विषयी हा संस्कृत श्लोक ( मंत्र)आहे. हे गणेशा तुम्हाला नमस्कार असो, आपण सर्व विघ्नाचे विनाश करणारे आहात, कार्याला आरंभ करताना मी आपले पुजन करतो, मीच नाही तर सर्व सुर ,असूर , आणि मानवगण आपले कार्यारंभ करताना आपली प्रार्थना करतात. अनेक ग्रंथाची, पुस्तकाची, कथा, कादंबरी , नाटके सिनेमा, तमाशे इ. सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते.

श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अभंग रचनेमध्ये लिहितात.

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे|ते तिन्ही देवांचे जन्मस्थान|

आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला|| तुकाराम महाराज यातून सांगतात ‘ॐ’ बीज मंत्र असून त्यामध्ये आ,उ,म् हे तीन वर्ण आहेत.आ- म्हणजे ब्रम्हा,उ – म्हणजे विष्णु आणि म्-म्हणजे महेश आहेत. भगवान गणेश हे निर्गुण निराकार तत्व असून त्यापासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देव निर्माण झालेले आहेत. हा सर्व उपदेश वेदांमध्ये केलेला आहे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवानी| भावे पुरानी विचारूनी| 

श्री समर्थ रामदास स्वामी आपले मनाचे श्लोक लिहिताना गणपतीला स्तवन करून लिहितात.

 गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा,

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा|

हे गनाचे घीश म्हणजे पती ज्यांच्याकडे सर्व गुणांचा खजिना आहे. ज्यांच्याकडे 64 कला आहेत. आपण निर्गुण निराकार असून सर्व जगाचा आरंभ आपल्यापासून आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना लिहितात.

ॐ नमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरुपा|| ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

 देवा तुंचि गणेशु| सकलार्थ मति प्रकाशु|  म्हणे निवृत्ती दासु| अवधारिजो जी||२||’ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ज्ञानेश्वरांनी देखील गणपतीला स्तवन करून आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सुरुवात केली आहे. श्रीमद्भागवत महापुराण हा ग्रंथ स्वतः श्री गणेशा ने दिलेला आहे.

कोणत्याही धार्मिक विधी करताना गणेश मंत्राने सुरुवात होते. ‘श्रीमन्महागणाधिपतये नमः|’ हा मंत्र म्हणून धार्मिक विधीची सुरुवात होते.

गणेशाला अग्र पूजेचा मान का दिला जातो याची एक कथा आहे.

सर्व देव देवतांना वाटत होते की आपल्याला अग्र पूजेचा मान मिळावा. त्यामुळे ते आपसात भांडू लागले. निर्णय होत नव्हता. सर्वजण आपले महत्व पटवून सांगत होते. हा निर्णय करण्यासाठी सर्वजण भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराने अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी सर्वांना एक कसोटी सांगितली.

जो कोणी सर्वात प्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेन त्याला सर्व विधीमध्ये अग्र पूजेचा मान दिला जाईल. सर्व देवता अग्र पूजेचा मान मिळवण्यासाठी आपापल्या वाहनावरती स्वार झाले. सर्वांनी  पृथ्वीची प्रदक्षिणा केली. गणेश जी आपल्या मुषक वाहनावर स्वार झाले. त्यांनी आपली माता पिता भगवान शंकर आणि पार्वती यांना तीन प्रदक्षिणा केल्या. आणि दोघांचे यथोचित  पूजन केले.  प्रदक्षिणा करून देव जेव्हा परत आले तेव्हा त्यांना गणेश जी तेथेच असलेले दिसले.

सर्वांनी भगवान शंकराला अग्र पूजेचा मानकरी आता कोण असा प्रश्न विचारला?. गणपतीने माता पिता पूजन केल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सर्व देवतांनी निर्णय दिला की पृथ्वी प्रदक्षिणा करण्यापेक्षा मातापिला प्रदक्षिणा करून वंदन करण्याचं पुण्य हे पृथ्वीप्रदक्षिणा करण्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. 

त्यामुळे अग्र पूजेचा मान हा श्री गणेशाला मिळाला पाहिजे असा सर्वांनी एकमताने ठराव पास केला. तेव्हापासून कोणत्याही कार्य आरंभी भगवान श्री गणेशाचे पूजन केले जाते. इतर कोणाची पूजा करण्यापेक्षा आई-वडिलांची पूजन हे सर्वश्रेष्ठ आहे. हे आपणाला गणेश चरित्रातून दिसून येते. भक्त पुंडलिकरायाने आई-वडिलांची सेवा केली. म्हणून त्यांना भगवान श्री विठ्ठल प्रसन्न झाले. आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव प्रसन्न होतात हे यावरून लक्षात येते. म्हणून सर्वांना विनंती जगात सर्व काही विसरा पण आपल्या आई-वडिलांना विसरू नका ते पूजनीय आहेत त्यांची पूजा केली पाहिजे. असा विचार आपल्याला या मंत्रातून घेता येईल.

श्री गणेशाचे काही प्रभावी मंत्र

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ|

निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा|| 

कल्याणासाठी मंत्र

ॐक्षेमदायिनीसहितं विघ्नराजं तर्पयामि|

अरिष्ट ( दुष्ट प्रवृती ) निवारणार्थ मंत्र

ॐ अभयासहितं विघ्नहर्तारं तर्पयामि |

व्यसन मुक्तीसाठी मंत्र

ॐ गं गणपतिं तर्पयामि|

 पुत्रप्राप्तीसाठी मंत्र

ॐ उमापुत्रं तर्पयामि |

इच्छापुर्तीसाठी  मंत्र

“ॐ -हीं,क्लीं,ग्लौं,गं गणपतये – वरवरद सर्व जनमे वशमानाय स्वाहा|”

 हा मंत्र दररोज 121 वेळा किमान 21 दिवस जपावा.

इतर संस्कृत श्लोक पाहण्यासाठ खालील लिंक ला क्लिक करा.

Leave a Reply