दिपावली म्हणजे दिवाळी Diwali हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा एकच सण नसुन या मध्ये धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मी पुजन (पाडवा), बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा लगत पाच सणाचा समुदाय आहे. या प्रत्येक सणाचे वर्णन अनेक संस्कृत श्लोकातून केलेले आहे. प्रत्येक वर्षी आपण दिवाळीचा सण साजरा करतोत.
त्यामध्ये घराच्या वर अंगणामध्ये पणत्या लावल्या जातात. दारामध्ये रांगोळी काढली जाते. सर्वांनाच नवीन कपडे घेतले जातात. खाण्यासाठी स्वादिष्ट आणि रुचकर असे पदार्थ बनवले जातात. एवढे केल्याने दिवाळी साजरी होते असे नाही. तर या पाठीमागची कारणे काय आहेत. हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी दीपावली ( दिवाळी Diwali ) या सणाला एवढे विशेष महत्त्व का दिले आहे. हे ही आपण जाणून घेतले पाहिजे. यामध्ये घराच्या समोर दिवे का लावतात? याच्या मागचे काय कारण आपण जाणून घेऊत. दिव्याचे वर्णन पुढील संस्कृत श्लोका मध्ये आपल्याला दिसून येते.
श्री रामाचे नामस्मरण – सुख शांतीचा मार्ग – Shri Ram Stuti
Table of Contents
दिवाळी Diwali निमित्त घरासमोर दिवे का लावले जातात ?
दीपज्योति: परब्रम्ह दीपज्योतिर्जनार्दन:|
दिपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ||
या संस्कृत श्लोकाचा अर्थ दीप अर्थात दिवा हा परब्रम्ह स्वरूप आहे. दीपज्योतीच जनार्धन म्हणजेच विष्णू आहे. हा दिवा आयुष्यातील पापाचे हरण करतो आणि आरोग्य सुख, संपदा इत्यादी प्राप्त करून देतो.
अध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास दिवा म्हणजेच मानवी देह होय, तेल म्हणजे आत्मा आहे. चेतना आणि आत्मज्ञान हे ज्योती आहे. म्हणून दिव्याला ज्ञानाचे प्रतीक मानले आहे.दिवा हा अज्ञान दूर करतो आणि मानवी देहामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवतो. संतश्रेष्ठ नामदेवराय आपल्या अभंगांमध्ये म्हणतात. ‘नाचू कीर्तनाचे रंगी |ज्ञानदीप लावू जगी’ . अज्ञानी लोकांमध्ये ज्ञान प्रगट व्हावे म्हणून संत नामदेवांनी किर्तन परंपरा चालू केली.
संत नामदेवाने चालू केलेल्या कीर्तनपरंपरेचा आज रास होऊन किर्तन म्हणजेच विनोद होय अशी व्याख्या तयार झालेली दिसत आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा हि उक्ति मनाशी घेऊन दीपावलीला ज्ञानाच्या दिव्याची माळ पेटवली पाहिजे. याचा अर्थ या जगतामध्ये सर्व ज्ञाने झाले पाहिजे. यासंदर्भात एक हिंदी कवी म्हणतो, ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ म्हणून हिंदू संस्कृतीला उत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या मनात ज्ञानज्योत पेटवणे हेच या उत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
पण तो दिपवाळीतच का पेटवायचा याच्या मागची ही एक कथा श्रीमद्भागवत महापुराणाच्या दशम स्कंद अध्याय एक्कोनसाठाव्या मध्ये आलेलि आहे. ती नरक चतुर्दशी ची कथा आपल्यासमोर मांडत आहे
जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणारे संस्कृत श्लोक
दिवाळी Diwali निमित्त दीप उत्सव करण्यामागील एक कथा
इन्द्रेण हृतच्छत्रेण हृतकुंण्डल बन्धुना |
हृतामद्रिस्थानेन ज्ञापितो भौमचेष्टितम् |
सभार्यो गरुडारूढ: प्रागज्योतिषपुरं ययौ||२||
ही एक कथा श्रीमद्भागवत महापुराणाच्या दशम स्कंद अध्याय एकोणसाठव्या मध्ये आलेलि आहे. ती नरक चतुर्दशी ची कथा आपल्यासमोर मांडत आहे.
सदरील संस्कृत श्लोक हा श्रीमद्भागवत या ग्रंथातील दशम स्कंद मधील एकोणसाठव्या अध्यायातील दोन क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये नरकासुरांचा जीवन परिचय दिला आहे. प्राग्ज्योतिषपूर नावाच्या नगरामध्ये नरकासुर (भौमासुर) नावाचा दैत्य राहत होता. तो अत्यंत ताकतवर, क्रुर, कपटी होता. त्याने आपल्या राज्याच्या सभोवतालच्या तसेच इतर प्रांतातील राजांना हरवून त्यांना कैद केले होते.
तसेच त्या राजाच्या राजकन्यालाही आपल्या बंदी ग्रहांमध्ये बंद करून ठेवले होते. एवढे करून नरकासुर थांबला नाही. तर त्याने वरुणाचे छत्र, अदितीची कुंडले आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान नरकासुराने हिरावून घेतले होते. हे सर्व हकीकत इंद्राने भगवान श्रीकृष्णाला सांगितली. ही हकीगत ऐकून भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला चांगलाच धडा शिकवायचे ठरवले. आणि आपल्या पत्नीला सोबत घेऊन गरुडावर बसून भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या राज्यावर आक्रमण केले.
नरकासुराच्या सैन्याने चिवट प्रतिकार केला परंतु भगवान श्रीकृष्णाच्या पुढे त्यांचे काही चालेना. भगवान श्रीकृष्ण कर्वी सर्व सैन्य मारला गेल्यानंतर नरकासुर भगवान श्रीकृष्ण बरोबर युद्ध करण्यास आला. भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे शीर उडवले.
आणि नरकासुर गतप्राण झाला. त्या नरकासुराचा पुत्र भगदत्त भयभीत होऊन भगवान श्रीकृष्णाला शरण आला. भगवान श्रीकृष्णाने त्याला अभयदान दिले. नंतर भगदत्तासह भगवान श्रीकृष्ण आणि नरकासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णाने तेथे काय पाहिले हे भागवत ग्रंथाच्या पुढील संस्कृत श्लोकांमध्ये सांगितले आहे.
तत्र राजन्यकन्यानां षट्सहस्राधिकायुतम् |
भौमाहृतानांं विक्रम्य राजभ्यो ददृशे हरि: ||३३||
श्रीमद्भागवत/दशम स्कंद /अध्याय ५९
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराने बंदी ग्रहामध्ये कैदी केलेल्या सोळाहजार राजकुमारी पाहिल्या. नरकासुराने ज्या ज्या राजाला हरवले होते. त्या राजाच्या राजकुमारी आपल्या बंदीखाण्यात ठेवल्या होत्या. त्यांची संख्या सोळा हजार होती. भगवान श्रीकृष्णाने त्या सोळा हजार राजकुमारींना कैदेतून मुक्त केले.ज्यावेळेस त्या राजकुमारीने भगवान श्रीकृष्णाला आणि त्याचा पराक्रम पाहिला त्यावेळेस सर्वांनी आपल्या मनामध्ये आपल्याला असाच पती मिळावा अशी अभिलाषा व्यक्त केली. त्यांच्या मनातील भाव पुढील संस्कृत श्लोकांमध्ये भगवान व्यासानी प्रकट केले आहेत.
तं प्रविष्टं स्त्रियो वीक्ष्य नरवीरं विमोहिता: |
मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ||३४||
श्रीमद्भागवत/दशम स्कंद /अध्याय ५९
जेव्हा त्या सर्व राजकुमारीने भगवान श्रीकृष्णाला पाहिलं तेव्हा प्रत्येकीने स्वतंत्रपणे मनात हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी अशी देवाकडे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने त्यांना सुंदर अशी वस्त्रे परिधान करायला लावले . सर्वांना पालकित बसून द्वारकेला पाठवले.
अथो मुहूर्त एकस्मिन् नानागारेषु ता: स्त्रिय: |
यथापयेमे भगवांस्तावद्रुपपधरोऽव्यय ||४२||
श्रीमद्भागवत/दशम स्कंद /अध्याय ५९
त्या सर्व सोळा हजार राजकुमारी द्वारकेत आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे विजय होऊन परत द्वारकेत आले. भगवान श्रीकृष्ण अंतरज्ञानी असल्याने त्यांनी सर्व राजकुमारीच्या मनातील अपेक्षा ओळखून एक शुभ मुहूर्त पाहून त्या सर्वांबरोबर विवाह केला. अशा रितीने भगवान श्रीकृष्णाला पहिल्या एकसेआठ पत्न्या होत्या आणि आता या १७१०८ अशा सर्व मिळून पत्न्या झाल्या.
ज्या राज्यामध्ये नरकासुराचा वध झाला. तेथे अनेक राक्षस मारले गेले होते. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी सुटली होती. लोकांच्या घरादारांमध्ये रक्ताचे सडे पडले होते. लोकांनी नरकासुर मेल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाचा जयजयकार केला. नरकासुराच्या जाचातून त्यांची मुक्तता झाली होती.त्यानी आपला परिसर स्वच्छ करून घेतला.
दारामध्ये रांगोळी काढल्या घरावरती तोरणे उभारले. सर्वांनी दिवे आपापल्या घरावर लावले. आपल्या शरीराला दुर्गंधीचा येत असलेला वास नाहीसा व्हावा म्हणून सुगंधी उठणे लावून दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व लोकांनी अभ्यंग स्नान केले आणि आनंदोत्साजरा केला. आपल्याही सर्वांच्या जीवनात अज्ञानरुपी असलेला नरकासुर नष्ट व्हावा या उद्देशाने तेव्हापासून नरक चतुर्थी हा सण साजरा केला जातो.