You are currently viewing छोटे संस्कृत श्लोक one line

छोटे संस्कृत श्लोक one line

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे छोटे संस्कृत श्लोक one line आहे.

छोटे संस्कृत श्लोक one line 1

एखाद्याने केलेला उपकार सज्जन माणसे आपल्या जीवनात विसरत नाहीत. हे या संस्कृत श्लोकामध्ये सांगितले आहे.

छोटे संस्कृत श्लोक one line 2

मौन म्हणजे गप्प राहणे हे सर्वात मोठे साधन आहे. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 3

विनय नसलेल्या आणि विश्वास नसलेल्या माणसाजवळ आपल्या गुप्त गोष्टी सांगू नयेत. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 4

हुशार, चतुर आणि निर्लोबी असणाऱ्या व्यक्तीला प्रमुख (मंत्रीं) करावे. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 5

तीन लोकांचे एक मत झाले. तर आपल्या कार्याची दिशा योग्य आहे असे समजावे. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 6

व्यसन करणाऱ्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नये आणि त्यांच्यावर कोणत्याही कामाची जिम्मेदारी सोपवू नये . संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 7

सर्व कार्याचे मूळ प्रेरणास्थान हे अर्थच असते. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 8

विष हे कुठल्याही काळात आणि कोणत्याही ठिकाणी विषयच असते. संस्कृत श्लोक

छोटे संस्कृत श्लोक one line 9

संस्कृत श्लोक वाचनाने माणसाचे वक्तृत्वामध्ये वाढ होते. आणि संभाषणामध्ये माणसाचा प्रभाव पडतो. सदरील एका ओळीच्या संस्कृत श्लोकामध्ये माणसाच्या जीवनामध्ये यश कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते हे सविस्तर सांगितले आहे.

कोणतीही गोष्ट साध्य होण्यासाठी ती गोष्ट करणाऱ्याची कार्यक्षमता असावी लागते. अकार्यक्षम माणसाच्या हातामध्ये कितीही चांगले उपकरणे कींवा हत्यारे असले तरी तो यशस्वी होऊ शकत नाही. जीवनामध्ये अपयश आल्यानंतर असा व्यक्ती दोष आपल्या हत्याराला (उपकरणाला)देतो. नाचता येईना अंगण वाकडे या अर्थाचा हा संस्कृत श्लोक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्याने कधीही कारण सांगितले नाहीत. कारण त्यांना माहिती होते कारणे सांगणारी माणसे कधी इतिहास घडवू शकत नाहीत. आणि इतिहास घडवणारे माणसं कधी कारण सांगत नाहीत. अशा अर्थाचा हा संस्कृत श्लोक आहे.

छोटे संस्कृत श्लोक one line 10

या छोट्या एका ओळीच्या छोट्या संस्कृत श्लोकामध्ये वेळेचं महत्त्व सांगितलेले आहे. मानवाने आपल्या जीवनातील सर्व कार्य वेळेत पूर्ण केले पाहिजेत. हिंदीमध्ये म्हटलं जातं ‘जो वक्त को बरबाद करता है वक्त उसे बरबाद कर देता है’. काळ हा कुणासाठी कधीही थांबत नाही.

पळण्याच्या शर्यतीमध्ये काही सेकंदाचाच फरक असतो. सेकंदासाठी त्याला पहिला नंबर गमवावा लागतो. काही वेळेला आपले एका मिनिटासाठी बस ,रेल्वे ,विमान,इ. चुकते. काही विद्यार्थी वेळेवर अभ्यास न केल्यामुळे अगदी एक मार्काने सुद्धा नापास होतात.

मराठी मध्ये काही म्हणी आहेत ‘बैल गेला आणि खोपा केला’ किंवा ‘वराती मागून घोडे’याचा अर्थ वेळ निघून गेल्यावर काही गोष्टी करण्यात अर्थ नसतो.

        शहाणी माणसे आपल्या आयुष्यातील एकही क्षण वायाला घालवत नाहीत. काही माणसे आपला वेळ मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात. काही व्यर्थ पत्ते खेळण्यांमध्ये घालवतात. काही लोकांचा वेळ भांडण खेळण्यात जातो. मूर्ख माणसाला वेळ कुठे घालवावा हा प्रश्न असतो.

तर शहाणी माणसे त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या जीवनामध्ये प्रगती घडवून आणतात. जो वेळेचा सदुपयोग करतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. काळाचे महत्व या छोट्या एक ओळीच्या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे.

छोटे संस्कृत श्लोक one line 11

या छोट्या एका ओळीच्या संस्कृत श्लोकामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगले उद्दिष्ट ठेवून कार्य करावे. ते उद्दिष्ट आपणास पूर्णच करायचे आहे असा दृढ निश्चय करून कार्य करावे. असा दृढनिश्चय करून कार्य केल्यास निश्चित ध्येय पूर्ण होते. हे या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे.

  अनेक जण जीवनात उद्देशच ठेवत नाहीत . बरीचशी माणसे उद्देश डोळ्यासमोर ठेवतात परंतु त्यानुसार कृती करत नाहीत. काहीजण कृती करतात पण मनातून करत नाहीत. काहीजण कृती करतात पण समोर उद्देशच ठेवलेला नसतो. ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे आहे त्याने डोळ्यासमोर ध्येय किंवा उद्देश ठेवून ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करावेत. असे केल्यास तुमचा निश्चितच विजय होतो असे या संस्कृत श्लोकात सांगितले आहे.

छोटे संस्कृत श्लोक one line 12

स्वतःचे रक्षण केल्याशिवाय इतरांचे रक्षण करता येत नाही. असा सिद्धांत या छोट्या संस्कृत श्लोकामध्ये दिलेला आहे. आपल्याला समाजाचे रक्षण करायचे असेल तर आपण अगोदर सुरक्षित असणे गरजेचे आहे. आपण जगलो तरच इतरांना जगवु शकतो. याचे सुंदर उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबा च्या भेटीला आग्र्याला गेले. तेथे त्यांच्या जीविताला धोका आहे हे ओळखून त्यांनी स्वतःला औरंगजेबाच्या तावडीतून सोडवून तर घेतलेच घेतले परंतु त्यांच्याबरोबर असलेले सर्व सेवक ,मावळे , संभाजी राजे यांना पण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आणले. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचीच रक्षण करता आले नसते तर त्यांना इतरांचे सुद्धा रक्षण करता आले नसते

छोटे संस्कृत श्लोक one line 13

दोन कच्ची मडकी एकमेकांवर आदळले की फुटतात. असा सुंदर संदेश या एक ओळीच्या संस्कृत श्लोकामध्ये कवीने दिला आहे. दोन्ही माणसाला जर एखाद्या गोष्टीचे कमी ज्ञान असेल तर त्या भांडणांमध्ये त्या दोघांचाही तोटा होतो. असे म्हणतात की काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगडं टाकू नयेत. कारण त्यानेही आपल्या घरावर दगडं टाकली तर आपलेही अतोनात नुकसान होते.

छोटे संस्कृत श्लोक one line 14

‘एकी हेच बळ’ असा सुंदर संदेश सदरील एका ओळीच्या संस्कृत श्लोकामध्ये दिलेला संस्कृत आहे. कमी दर्जेच्या वस्तू किंवा व्यक्ती एकत्रित आल्यास फार मोठे कार्य होऊ शकते. वाळलेला गवताच्या काड्या एकत्रित आल्या आणि त्यांचा दोरा केला तर त्या दोराने महाकाय हत्ती सुद्धा बांधला जाऊ शकतो.

प्रभू रामचंद्राने वानराच्या साह्याने बलाढ्य राक्षसांचा नायनाट केला. त्यांच्या मदतीने रावण मारून लंकेवर विजय मिळवला. भगवान श्रीकृष्ण आणि सर्व गोपाळांना एकत्रित करून गोवर्धन पर्वत उचलला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील मावळ्यांना एकत्र करून बलाढ्य असा अफजलखान , सिद्धी जोहर ,शाहिस्तेखान ,कार्तलब खान, अशा अनेक सरदारावर विजय मिळवला. आणि मराठा स्वतंत्र साम्राज्य उभे केले.

छोटे संस्कृत श्लोक one line 15

जीवनामध्ये कितीही संकट आली तरी न्यायाने चालणारी माणसं आपला सत्याचा मार्ग कधीही सोडत नाहीत. असा महत्वपूर्ण संदेश कवीने या संस्कृतश्लोकाद्वारे आपणाला दिला आहे. थोडा नफा होईल म्हणून ते कधीही वाईट मार्ग अवलंबत नाहीत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक संकट आली गावात दुष्काळ पडला. एक पत्नी वारली, मुलगा वारला, सावकारकी स्वतःहून बुडवली. रामेश्वर भट्ट आणि त्यांनी लिहिलेल्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. तरी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सध्याचा मार्ग कधीही सोडला नाही.

छोटे संस्कृत श्लोक one line 16

विद्या म्हणजे ज्ञान नसलेला मनुष्य म्हणजेच पशु असतो. असे संस्कृत श्लोकधारकांनी या छोट्या श्लोक मध्ये सांगितले आहे. आहार भय निद्रा मैथुन सर्व योनीशी समसमान . सगळ्या पशुपक्षांमध्ये आहार असतो ,निद्रा म्हणजे झोप असते, भीती असते आणि प्रज्योत्पानाचे ज्ञान असते. पशूंच्या या सर्व क्रिया मानवाच्या जीवनात सुद्धा असतात. परंतु मानवाला एक विशेष देणगी आहे. तो शिक्षण घेऊ शकतो. ज्ञान मिळू शकतो. ही गोष्ट प्राणी मात्र करू शकत नाहीत. म्हणून या संस्कृत श्लोकामध्ये कवी म्हणतो माणूस जर शिकलेला नसेल तर तो पशुच असतो.

गणेश मंत्र संस्कृत श्लोक पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply