सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे Bhagavad Gita Sanskrit Quotes अर्थांसह संग्रहित केले आहेत.
Table of Contents
Bhagavad Gita Sanskrit Quotes – अध्याय 2
गुरूनहत्वा हि महानुभावन्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके |
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ||५||
वंदनीय गुरुजनांना मारून राज्यभोगण्यापेक्षा मी अर्जुन भिक्षा मागून खाणे अधिक पसंत करेन कारण गुरुजनांच्या रक्ताने माखलेल्या जमिनीपासून मिळालेले धन हे केवळ भोगानाच भोगेल त्यापासून मुक्ती मिळणार नाही.
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |
गतासुनगतासुंश्च नानुशोचन्ति पंडिता: ||११||
हे अर्जुना ज्या गोष्टीचा शोक करायला नाही पाहिजे अशा गोष्टीचा तु शोक करत आहेस आणि पंडिताच्या गोष्टी बोलत आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव ज्यांचे प्राण निघून गेले आहेत आणि ज्यांचे प्राण निघून गेलेले नाहीत यांच्यासाठी पंडित लोक कधीही शोक करत नाहीत.
देहिनोऽस्मिन्यता देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ||१३||
प्राणीमात्राच्या शरीरामध्ये जसे बालपण, तारुण्य , वृद्धावस्था होतात. त्याचप्रमाणे आत्म्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते या नियमाने धैर्यवान पुरुष मोहित होत नाहीत.
अविनाशि तु तद्विद्धी येन सर्वमिदंततम् |
विनाशमव्ययस्यास्य न किश्चित्कर्तुमर्हति||१७||
हा संसार अविनाशी पासून बनलेला आहे. त्याला तू जान. या अविनाशी जगताचा कोणीही नाश करू शकत नाही.
न जायते म्रियते वा कदाचि –
न्नायं भूत्वा भविता वा न भुय 😐
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ||२०||
आत्मा हा कधीही जन्मत नाही आणि तो मरत ही नाही. हा आत्मा एकदा उत्पन्न झाला की पुन्हा उत्पन्न होणारा नाही. हा जन्म नसलेला ,नेहमी राहणारा ,अतिशय प्राचीन असा आहे. त्यामुळे शरीर मारले अथवा मेले, तरी हा मारला जात नाही.
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही||२२||
मनुष्य ज्याप्रमाणे मळालेले, जुने ,जीर्ण झालेले कपडे टाकून देऊन नवीन कपडे घालतो. अगदी त्याचप्रमाणे जीवात्मा जुने झालेले शरीरे टाकून देतो आणि दुसऱ्या नव्या शरीरात प्रवेश करतो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:|
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ||२३||
आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही. तो अग्नीने जाळला जात नाही. त्याला पाणीही भिजवू शकत नाही आणि वाराही वाळवू शकत नाही.
Bhagavad Gita Sanskrit Quotes – अध्याय ३
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:|
स य्यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ||२१||
श्रेष्ठ मनुष्य जे जे वर्तन करतो समाजातील सर्व लोक त्याचे अनुकरण करतात. तो जे काही बोलतो ते प्रमाण मानून सर्व लोक त्याप्रमाणे वागतात.
Bhagavad Gita Sanskrit Quotes – अध्याय 17
दातव्यमिती युद्दान दियतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रेच तद्दान सात्त्विकं स्मृतम् ||20||
जिवनात दान देणे म्हणजे आपले कर्तव्य आहे ,असे समजून योग्य देश, योग्य काळ आणि कुठल्याही परतफेडची अपेक्षा न ठेवता योग्य व्यक्तीला दिले जाते. त्याला सात्विक दान असे म्हणतात.
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुन: |
दियते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ||२१||
जे दान उपकाराची परतफेडीसाठी अथवा फळा च्या प्राप्तीचा उद्देश ठेवून द्वेषपूर्वक दिले जाते . त्याला राजस दान असे म्हटले जाते.
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दियते |
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ||२२||
जे दान सत्कार न करता दिले जाते, अवज्ञापूर्वक, अयोग्य व्यक्तिला, अयोग्य देशात, अयोग्य काळात आणि पात्र नसलेल्या व्यक्तीला दिले जाते ,त्या दानाला तामस दान असे म्हटले गेले आहे.
Bhagavad Gita Sanskrit Quotes – अध्याय
जातस्य हि ध्रुवो मृत्यूर्ध्रुंवं जन्म मृतस्य च|
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि||२७||
जन्माला आलेला एक ना एक दिवस मरतोच आणि मेलेला पुन्हा एक ना एक दिवस जन्म घेतोच. त्यामुळे ज्या गोष्टीवर उपाय नाही. त्या गोष्टीवर शोक करणे योग्य नाही.
Bhagavad Gita Sanskrit Quotes – अध्याय 18
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनूष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्मिषम् ||४७||
दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला दिसत असला आणि आपला धर्म चांगला दिसत नसला तरीही आपण आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. नियतीने निर्माण केलेल्या धर्मानुसार जर आपण आचरण केले तर मनुष्य पापाचा धनी होत नाही. म्हणून आपण आपल्या धर्मशास्त्रानुसार वर्तन करावे.
ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्टति |
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ||६१||
सदरील संस्कृत श्लोक श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथातील अठराव्या अध्यायातील आहे. या संस्कृत श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात राहतो. शरीर रुपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांच्या शरीराला आपल्या मायेने नेहमी स्वभावानुसार भ्रमण करत राहतो.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु |
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियऽसि मे ||६५||
श्रीमद् भगवद्गीतेतील या संस्कृत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की, ‘हे अर्जुन तू माझा भक्त हो माझ्यात मन रमलेला आणि माझे पूजन करणारा हो. मला नमस्कार कर. अशा गोष्टी केल्याने तू मलाच प्राप्त होशील. तुझ्यासमोर मी असी खरी प्रतिज्ञा करतो की तू मला अत्यंत प्रिय आहेस.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:||६६||
भगवान श्रीकृष्ण गीतेच्या या संस्कृत श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात .सर्वधर्माच्या आश्रयाचा त्याग करून मला शरण ये मी तुला सर्व पापातून मुक्त करेल. तु काहीही चिंता करू नकोस.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा