vasubaras वसुबारस हा दिवस गाईची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे .अश्विन वद्य द्वादशी हे वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गाईचे वारसासह पूजा केली जाते घरातील सवाष्ण महिला गाईचे पंचोपचाराने पूजा करतात. ‘ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय ‘असे संतांनी म्हटले आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गाईची पूजा करतात. वसु म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
Table of Contents
vasubaras – गाईची पूजा करताना बोलायचा संस्कृत श्लोक
क्षिरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते |
सर्वदेवमये मातृर्गहाणार्ध्य नमोस्तुते ||
या संस्कृत श्लोकाचा अर्थ “क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर आणि असूरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता वास्तव्य करतात . हे गोमाते हा आमचा पूजनाचा अर्ध्य घे गोमाते तुला नमस्कार असो.
भारतीय संस्कृतीमध्ये भगवंताचे सर्व व्यापक रूप मानले आहे. त सर्व चराचर ,जड ,चेतन या सकळसृष्टीमध्ये परमात्म्याची स्वरूप पाहायला मिळते. वसुबारस या दिवशी गायीचे पूजन का केले जाते. याचा विचार आपण आजच्या संस्कृत श्लोक या भागामध्ये पाहणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अनेक प्राणी मात्राचे पूजन केलेले दिसून येते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे’ सर्व प्राणीमात्राबरोबर मित्रत्व झालंच पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या हृदयात प्राणीमात्राबद्दल आदर असला पाहिजे. सर्व पृथ्वीवरचे प्राणी मात्र व्यापक असल्यामुळे आपण सर्वांचीच पूजा करू शकत नाहीत. म्हणून ही मर्यादा लक्षात घेऊन ऋषीमुनींनी गाईला सृष्टीचे प्रतीक म्हणून पूजा करण्याचा आदेश दिला आहे.
गोभिर्विप्रश्च वैदैश्च सतीभि: सत्यवादिभि:|
अलुब्धै: दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही:||
सदरील संस्कृत श्लोकामध्ये गाईचे वर्णन केलेले आहे. या संस्कृत लोकांमध्ये असे सांगितले आहे की, गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभि व दानशूर या सात लोकांमुळे पृथ्वी धारण होते. हे सात जण पृथ्वीचे भूषण आहेत.
रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना:|
एते परोपकाराय लोके देवेन निर्मिता: |
सदरील संस्कृत श्लोकामध्ये देवाने माणसासाठी सात गोष्टी निर्माण केल्या आहेत.त्या कोणकोणत्या ते या श्लोकामध्ये सांगितले आहे. रवी म्हणजे सूर्य ,चंद्र, ढग, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन माणसे हे देवाने परोपकारासाठी निर्माण केलेले आहे. गाय मानवावर अनेक प्रकारचे उपकार करते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपकार म्हणजे गाय आपणाला दूध देते. ते दूध कशी देते पुढील श्लोक संस्कृत श्लोकामध्ये सांगितले आहे.
गाय वाळलेलं गवत खाते. जलाशयामध्ये साठलेलं पाणी पिते. म्हणजे खाण्यासाठी तिला टाकाऊ पदार्थ आहे. पिण्यासाठी ही स्वच्छ पाणी मिळत नाही. तरीही मानवासाठी ती अमृततुल्य असे दूध देते. तो पिऊन माणूस पुष्ट होतो म्हणून सदरील संस्कृत श्लोकामध्ये गाईला लोकमाता असे म्हणतातअसे सांगितले आहे.
आईचे दूध पिऊन बालक जसा मोठा होतो. त्याप्रमाणेच गाईचे दूध पिऊन हे बालक मोठा होतो म्हणून गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे. गाईला आईचा दर्जा देऊन मानवाने तिला पूज्य स्थान दिले आहे. आजही भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाक करताना महिला गाईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाईसाठी पहिला घास काढून ठेवतात.
गाईच्या पोटी जन्मनारी संतती बैल हा शेतीसाठी अत्यंत उपयोगाचा आहे. बैल आपले पूर्ण जीवन शेतकऱ्यांसाठी व्यतित करतो. त्याच्यामुळे शेती हिरवीगार बनते. गाईचे सेण शेतीसाठी उपयुक्त शिकत आहे.
अनेक रोगावर उत्तम औषध असणारे पंचगव्य आहे. पंचगव्यासाठी लागणारे सर्व पदार्थ आपणाला गाईपासूनच मिळतात. गाईचे दूध, गाईचे तूप, गोमूत्र, गाईच्या दुधापासून तयार केलेले दही, आणि गाईचे शेण हे सर्व पंचगव्यातील पदार्थ आहेत.
vasubaras – पंचगव्य प्राशन केल्यावर मानवी शरीरावर काय परिणाम होतो
यत्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठन्ति मामके|
प्राशनात् पंचगव्यस्य दहत्व ग्रिरिवेन्धनम्||
सदरील संस्कृत लोकांमध्ये पंचगव्य पिल्यानंतर माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो ते सांगितले आहे. त्वचा, शरीरातील हाडे, तसेच मानवाच्या शरीरामध्ये जे रोग आहेत ते पंचगव्याच्या सेवनाने नष्ट होतात .जसे अग्नी इंधनाला नष्ट करून टाकतो ;त्याप्रमाणे पंचगव्य शरीरातील पापाला ( रोगानां) नष्ट करून टाकते. पंचगव्याने स्नान केल्यानंतर त्वचेचे विकारही नष्ट होतात . पंचगव्य म्हणजे मानवी जीवनासाठी मिळालेले औषध राज आहे. त्यामुळे अनेक रोग नाहीशे होतात.
आपल्या संस्कृतीने सांगितले आहे की गाईमध्ये 33 कोटी देवतेचे वास्तव्य असते.
vasubaras – पूर्वजांचे गाई बद्दलचे मत.
गावो मे अग्रत: सन्तु गावो मे सन्तु प्रष्ठतः |
गावो मे हृदये मे सन्तु गवांमध्ये वसाम्यहम् ||
ते म्हणतात ,’माझ्यापुढे गाई असोत, माझ्या मागेही गायी असोत, माझ्या हृदयामध्ये गाईचा वास असो, त्याचबरोबर गाईमध्ये माझा निवास असो, ‘भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गायही फार मोठी विभूती आहे. यावरून गाय हेच आपल्या पूर्वजांचे जीवन होते असे लक्षात येते.
भगवान श्रीकृष्णाने गाईचे महत्व खूप वाढवले आहे. स्वतः भगवान असताना सुद्धा गोकुळामध्ये गायी राखण्याचे काम केले आहे. भगवान श्रीकृष्णाने गाईला इतके प्रेम दिले की भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीची ध्वनी ऐकताच गाई येड्या होऊन भगवान श्रीकृष्णाकडे धावत जात असत. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल असे नाव ठेवून घेतले आहे. गोपाल याचा अर्थ गाई पाळणारा असा होतो. त्याकाळची श्रीमंती ही ज्याच्याकडे जास्त गाई आहेत तो सर्वात श्रीमंत समजला जाई. भगवान श्रीकृष्णाने जनतेला ‘गो’वर्धनाचा उपदेश केला गोवर्धन म्हणजे गाईचे संगोपन असा अर्थ होतो. सर्वांनी गाई पाळाव्यात असा उपदेश केला. म्हणून भारतीय संस्कृती ही गोहत्या करणाऱ्याच्या विरोधात आहे. गो हत्या करणे म्हणजेच उपकार करणारा वरती अपकार करणे अशाच अर्थ होतो.
vasubaras – गोरस या शब्दाचे संस्कृत श्लोकामध्ये अनेक अर्थ आहेत
विना गोरसं को रसो भोजनेषु?
याचा अर्थ भोजनामध्ये गोरस नसेल तर ते जेवण व्यर्थ आहे गोरस याचा अर्थ दही दूध तूप इत्यादी होतो.
विना गोरसं को रसो भुपतिषु?
या संस्कृत लोकामध्ये गोरस याचा अर्थ बाहुबल होतो. राजाकडे भाहुबल नसेल तर त्या राजाला काय महत्त्व?
विना गोरसं को रसो कामिनीषु?
स्त्रीचे डोळे जर चांगले नसतील तर तिचे सौंदर्य कसले ? गोरस याचा अर्थ डोळे आहे?
विना गोरसं को रसो द्विजेषु?
या वाक्यामध्ये याचा अर्थ वाणी असा आहे . द्विज्याची (ब्राम्हणाची) वाणी जर चांगली नसेल तर त्याच्या ब्रह्मत्वाला काय अर्थ.
vasubaras -भगवान श्रीकृष्णाच्या गीता उपदेशावर संताने लिहिलेला एक संस्कृत श्लोक
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:|
पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीताऽमृतं महत् ||
या संस्कृत श्लोकाचा अर्थ सर्व उपनिषदे म्हणजेच गाय आहेत. त्या गाईच्या दूध काढणारा गोपाल श्रीकृष्ण आहे. अशा उपनिषद रुपी गाईचा बचडा म्हणजेच वासरू हा अर्जुन आहे. या उपनिषद रुपी गाईच्या स्तनातून श्रीमद्भागवतगीता अमृत बाहेर पडले. हे गीता रुपी अमृत प्राशन करून जगतातील अनेक लोक तृप्त झाले आहेत. आज होत आहेत आणि पुढेही होणार आहेत. म्हणून अशा मानवावर अनंत उपकार करण्याच्या गाईची सेवा म्हणून आपण सर्वजण गोबारस हा दिवस साजरा करतो. हा दिवस जरी एक दिवस साजरा करीत असलो तरी वर्षभरातील सर्वच दिवस आपण गायीची कृतज्ञता व्यक्त करत असतो.