विजयादशमी !! दसरा !! नवरात्री !! संस्कृत श्लोक !!
Table of Contents
विजयादशमी संस्कृत श्लोक
सर्व मंगल मागंले शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रंब्यकंगौरि नारायणीं नमस्तुते ||
हा संस्कृत श्लोक भवानी मातेचे वर्णन करणारा आहे. या संस्कृत श्लोकाचा जो जप करतो त्याला भवानी माता सर्व प्रकारच्या शक्ती प्रदान करते. याचा अर्थ असा कि, मंगळाला आणि अमंगळालाहि मंगळ करणारि आणि सर्व भक्तांना शक्ती प्रदान करणा-या त्रिनेत्रधारी गौरि माते तुला या भक्ताचा नमस्कार असो. देवीने महिषासुर नावाचा राक्षस मारण्यासाठी नऊ दिवस युद्ध केले.
ते नऊ दिवस देवीचे भक्त तीची उपासना करतात. यालाच नवरात्र महोत्सव असे म्हणतात. त्यानंतर देवी कडुन महिषासुर मारला गेला. म्हणूनच देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाते. दहावा विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. विजया दशमी साजरी करण्याची इतर कारणे खाली दिली आहेत. युद्धात विजय कोणाचा होतो हे सांगताना संजय म्हणतो,
‘यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम ||’
सदरील संस्कृत श्लोक हा श्रीमद्भागवत गीता अध्याय १८/७८आहे. या संस्कृत श्लोका मध्ये धृतराष्ट संजयला प्रश्न करितो कि, महाभारतील युद्धात कोणाला विजय प्राप्त होईल. तेव्हा संजय धृतराष्ट्राला उत्तर देतो, ज्या बाजुने योगाचे महान इश्वर भगवान श्रीकृष्ण, तसेच ज्या बाजुने गाण्डिव धनुर्धारी अर्जुन आहे. त्याच बाजुने श्री (लक्ष्मी), विजय, विभुती, आणि अचल निती आहे. विजय ही त्यांच बाजुने होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे.
मानव हा उत्सव प्रिय प्राणी आहे. उत्सवा मध्ये दसरा(विजया दशमी) या सणाला विशेष महत्त्व आहे. कारण दसरा म्हणजे भक्ति आणि शक्ती यांचा समन्वय साधणारा उत्सव आहे. मणुष्य नवरात्रात नउ दिवस आई जगदबें कडुन
शक्ति मिळवण्यासाठी तिची उपासना करतो. शक्ति मिळवलेला मनुष्य शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आतुर झालेला असतो.
भारतीय संस्कृती विरतेची पुजक आहे. व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात विरता प्रकट व्हावी यासाठी दसरा सण साजरा केला जातो. या परंपरेचा फायदा (Chatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्यात भरपूर करून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बहुतेक शेतकरी असत. ते दसरा ते अक्षय तृतीया पर्यंत स्वराज्य विस्तारासाठी लढत असत. अक्षय तृतीया ते दसर्या पर्यंत शेतीची कामे पूर्ण करून परत स्वराज्य विस्तारसाठी तयार होत असत.
या दस-याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सर्व मावळ्यांना मेळावा घेऊन स्वराज्य विस्ताराची सिमा उल्लंघनाच्या संदर्भात संबोधन करत. या दिवसापासून आपल्या राज्याची सिमा उल्लंघन करुन शत्रूच्या ताब्यातील प्रदेश स्वराज्या जोडायला सुरूवात करत. या सणाला शिमोलंघन असे देखील म्हणतात .
दस-या विषयीची कथा आपणास ॠगवेदात पहायला मिळते. वरतंतू नावाचे वनात राहत होते. शिक्षण देण्यात अतिशय कुशल होते. त्याच्या कडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते. त्या शिष्यांमध्ये कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या गुरूला गुरुदक्षिणा मागण्यासाठी आग्रह केला. परंतु गुरुंनी त्यास नकार दिला. कौत्साने गुरु वरतंतूना दक्षिणा घेण्यासाठी वारंवार विनंती केली तेव्हा वरतंतू गुरुंनी त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागीतल्या.
कौत्साने विचार केला कि एवढ्या मोठ्या प्रमाणात सुवर्ण मूद्रा रघु राजा शिवाय मीळणे अश्यक्य म्हणून तो रघुराजा कडे गेला. रघुराज्याला गुरूला दक्षणा देण्यासाठी
चौदा कोटी सवर्ण मुद्रा मागितल्या. रघुराजा म्हणाला की, मी नुकताच विश्वजित नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञात संपत्ती दान केल्याने माझ्याकडेहि एवढी मोठी संपत्ती नाही. तरिही कौत्सा तुझा उद्देश शुद्ध असल्याने मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. तु आजचा दिवस मुक्काम करावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी रघुराजाने सुवर्ण मुद्रा मिळवण्यासाठी कुबेरावर आक्रमण करायचे ठरवले. त्यासाठी तयारी चालू केली. हे कुबेराला समजताच त्याने अवकाशातुन सुवर्ण मुद्राचा शमीच्या वृक्षावर पाऊस पाडला.
रघुराजाने कौत्सास बोलावून सर्व सुवर्ण मुद्रा घेऊन जाण्यास सांगितले. त्यावर कौत्स म्हणाला की, मला फक्त चौदा कोटीच पाहिजेत असे म्हणत त्याने फक्त चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन निघून गेला. राहिलेल्या सुवर्ण मुद्रा राज्याने जनतेला लुटून नेहन्यास सांगितले.
लोकांनी ही तसेच केले. तो दिवस दशमीचा होता. तेव्हा पासून आजवर लोक शमीच्या वृक्षाची पाने सोने म्हणून लुटतात.शमीच्या वृक्षाचे महत्व पुढील संस्कृत श्लोकात केले आहे.
शमी शमयते पापं शमी शत्रू विनाशनि |
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ||
शमी वृक्षाच्या दर्शनाने पापाचा नायनाट होतो. शमी वृक्षामुळे शत्रूचाहि विनाश होतो. धनुर्धारी अर्जुनाला शक्ती शमी वृक्षानेच मिळाली. आणि श्रीरामाला शमी अतिशय प्रिय आहे.
त्वत्पियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै |
शमी दलानि हेरम्ब गृहान गणनायक ||
गणपती बाप्पाला शमीची पाने आणि फुले प्रिय आहेत. म्हणून गणपती बाप्पाची पुजा करताना शमीच्या पानाचा आणि फुलांचा वापर करतात.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा