सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील chanakya niti चाणक्य नीती महत्वाचे संस्कृत श्लोक खालील प्रमाणे आहेत
Table of Contents
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 1
स्त्रीणां द्विगण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा |
साहसं षड्गुणं चैव कामोईस्टगुण उच्चते ||
आचार्य चाणक्याने महिला विषयी अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या समकालीन महिला कशा होत्या त्याचे वर्णन या संस्कृत श्लोकाद्वारे केलेल्या आहे. चाणक्याचे हे निरीक्षण महिलांमध्ये आज हे आपल्याला दिसून येते आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या काकणभर पुढे असलेल्या दिसून येतात. हेच गुण चाणक्याने सदरील संस्कृत लोकात सांगितलेले आहेत आचार्य चाणक्य म्हणतात.
महिलांचा आहार पुरुषापेक्षा दुप्पट असतो. तर त्यांची बुद्धिमत्ता पुरुषापेक्षा चार पटीने जास्त असते. धाडसाचा विचार केल्यास त्या पुरुषापेक्षा सहा पटीने धाडसी असतात. त्यांची कामे इच्छा पुरुषापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते असे आचार्य चाणक्याने आपल्याला या श्लोक आधारे सांगितले आहे. महिलाची कामेच्छा पुरुष्यापेक्षा सोळा पटीने जास्त आहे असे म्हटले जाते.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 2
मनसा चिन्तितं कार्य वाचा नव प्रकाशयेत |
मन्त्रेण रक्षयेद् गुढं कार्ये चापि नियोजत ||
आचार्य चाणक्य आपल्याला या संस्कृत श्लोकाद्वारे कार्य करण्याविषयी माहिती देतात. आपण आपल्या मनात जे कार्य (काम) योजले आहे. ते पूर्ण होईपर्यंत कोठेही वाच्यता करू नये. कार्य पूर्ण झाल्यानंतरच त्याची वाचता करावी. आपल्या कार्याचा जो मंत्र आहे तो पूर्ण होईपर्यंत कुणालाही सांगू नये. कार्य करताना अतिउत्साह, उतावीळपणा, कार्याभिमाण टाळला पाहिजे.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 3
वरयेत कुलजां प्राज्ञो विरूपमपि मन्यकाम |
रूपवतींन निचस्य विवाह सदृश्ये कुले ||
मनुष्याने लग्न करत असताना मुलगी कशी शोधावी याच्याविषयी आचार्य चाणक्य सदरील संस्कृत लोकांमध्ये माहिती देतात. खानदानी कुलातील नवरी मुलगी कुरूप असली तरी तिच्याशी निश्चितपणे विवाह करावा. पण कनिष्ठ कुणातील नवरी मुलगी कितीही सुंदर असली तरी तिच्याशी कोणत्याही परिस्थितीत विवाह करू नये. बऱ्याच वेळेला असे दिसून येते विभिन्न स्वभावाच्या व्यक्ती सोबत विवाह झाल्यास आयुष्यभर दुःख भोगावे लागतात.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 4
भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर्वरंङ्गना|
विभवो दानशक्तिश्च नाल्पस्य तपास:फलं||
आचार्य चाणक्याने विविध विषयातील अनेक संस्कृत श्लोक लिहिलेले आहेत. सदरील संस्कृत श्लोकामध्ये आचार्य चाणक्याने ख-या नशीबवान व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. ते पुढील प्रमाणे
भोजनासाठी सर्वोत्तम रुचकर आरोग्यदायी पदार्थ मिळणारा व्यक्ती व त्याचबरोबर ते पदार्थ खाल्ल्यानंतर पचवण्याची ताकद असणारा व्यक्ती नशीबवान समजावा. त्याचबरोबर इतर लक्षणे सांगताना चाणक्य म्हणतात दिसण्यासाठी सुंदर आणि सर्व प्रकारचे संसारिक सुख देणारी पत्नी लाभणे हे नशीबवानच दुसरं लक्षण आहे. आणि उत्तम धन प्राप्ती असून त्याच्याकडे दान देण्याची वृत्ती आहे अस्या व्यक्ती नशीबवान समजाव्यात. या सर्व गोष्टी कोणालाही सहजासहजी मिळत नाही त्या मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न (तप) करावे लागतात.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 5
ते पुत्रा ये पितृर्भक्ता स पिता यस्तु पोषक:|
तन्मित्रं यस्य विश्वास: सा भार्या यत्र निर्वृति:||
सदरील संस्कृत श्लोकामध्ये आचार्य चाणक्याने सुपुत्र, आदर्श पिता (वडील), सच्चा मित्र, भार्या म्हणजेच पत्नी यांची लक्षणे सांगितली आहेत. जो माता पित्याच्या अज्ञेत राहून त्यांच्या आज्ञेचे पालन करतो तो खरा सुपुत्र होय. आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या पोषणाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतो तो खरा पिता होय. ज्याच्यावर आपण पूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवू शकतो तोच खरा आपला मित्र होय. जी स्त्री आपला पती व त्याचबरोबर कुटुंबातील सर्व प्रकारचे सदस्यांची यथा उचित सेवा करते तीच खरी भार्या होय. अशी पत्नी आपल्या पतीसह मुलाबाळांचीही काळजी घेते.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 6
यस्य पुत्रो वशीभुतो भार्या छन्दानुगामिनी |
विभवे यश्च संन्तुष्टस्तस्य स्वर्ग इहैव हि |
भारतीय संस्कृतीमध्ये स्वर्ग म्हणजेच राहण्याचे आदर्श ठिकाण अशी कल्पना केलेली आहे. पण हा स्वर्ग मेल्यानंतर मिळतो. हा स्वर्ग आपण आपल्या घरातही निर्माण करू शकतो. अपना घर है स्वर्ग से सुंदर असा पण हिंदी मध्ये बऱ्याच वेळेस ऐकतो. ते घर कसे असते हे आचार्यच्या चाणक्यांनी सदरील संश्लोकांमध्ये सांगितलेले आहे.
ज्या घरांमध्ये पुत्र म्हणजे मुलगा आपल्या आई-वडिलांची आज्ञा पाळणारा, त्यांचा मान राखणारा, कर्तृत्ववान, मृदू स्वभावाचा असतो, त्याचबरोबर ज्यांची पत्नी आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारी असते. याचबरोबर जो व्यक्ती, आपल्याकडे आहे त्या संपत्तीमध्ये संतुष्ट राहतो. ते घर म्हणजे मनुष्यासाठी पृथ्वीवरील स्वर्गच असते.
chanakya niti – चाणक्य नीती संस्कृत श्लोक 7
अनृतं सहासं माया मूर्खत्वमतिलुब्धता |
अशौचत्वं निद्रयत्वं स्त्रीणां दोषा स्वभावजा: ||
आचार्य चाणक्यानी संस्कृत मध्ये अनेक श्लोक लिहिलेले आहेत. त्यांचे अनेक संस्कृत श्लोक निती विषयी आहेत. त्यांनी लिहीत असताना स्त्रियांच्या स्वभावा विषयी अनेक संस्कृत श्लोक लिहिले आहेत. वरील संस्कृत श्लोक स्त्रियांचे गुण प्रकट करणार आहे. त्याकाळच्या समकलीन स्त्रिया आणि त्यांचे गुण कसे होते हे सदरील संस्कृत लोकांमध्ये सांगितलेले आहे.
बहुतांशी स्त्रिया ह्या ज्या ठिकाणी आवश्यक नाही अशा ठिकाणी नको ते साहस करणाऱ्या असतात. स्त्रियांमध्ये लोभी स्वरूपाचा गुण मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचबरोबर त्यांच्यात मूर्खताही दिसून येते. आपल्या मूर्खपणामुळे अनेक स्त्रिया अडचणीत येत असलेला आपल्याला दिसून येते. त्याकाळच्या स्त्रियांमध्ये अस्वच्छता ही दिसून येत असे. झोपाळू हा ही गुण स्त्रियांमध्ये आढळून येतो.
काही स्त्रिया अत्यंत निरह्रदयी आणि क्रूर स्वभावाच्या दिसून येतात .इत्यादी सर्व दोष स्त्रियांच्या स्वभावामध्येच दडलेले असतात असे आचार्य चाणक्याने सदरील श्लोकामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे स्त्रिया विषयीच्या सर्व गोष्टी समजावून घेऊन आपण त्यांच्याशी वर्तन केले पाहिजे.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा