You are currently viewing श्री रामाचे नामस्मरण – सुख शांतीचा मार्ग – Shri Ram Stuti

श्री रामाचे नामस्मरण – सुख शांतीचा मार्ग – Shri Ram Stuti

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील श्री  राम स्तुती – shri ram stuti महत्वाचे संस्कृत श्लोक खालील प्रमाणे आहेत 

shri ram stuti – श्री राम स्तुती संस्कृत श्लोक 1

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् |

एकैमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ||

प्रभू रामचंद्राची स्तुती अनेक संस्कृत श्लोकांमधून साधुसंतांनी गायलेले आहे. त्याचबरोबर प्रभरामचंद्राची स्तुती अनेक संस्कृत श्लोक असलेल्या ग्रंथांमध्येही वर्णन केलेले आहे. प्रभू रामचंद्राचे चरित्र जीवाचं कल्याण करणारे आहे.

प्रभुरामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, कुशल नेतृत्व करणारे, कुशल प्रशासक, कुशल युद्धनीती करणारे, असे त्यांचे चरित्र त्यामुळे प्रभुराम चंद्राची स्तुती सर्वांनीच गायलेली आहे,  महर्षी वाल्मिकी ने प्रभुराम चंद्राचे जीवन चरित्र रामायण या ग्रंथात लिहिलेले आहे.

त्याचबरोबर  तुलसीदास यांनी रामचरण मानस या ग्रंथांमध्ये प्रभुराम चंद्राची स्तुती गायलेली आहे. ज्याला आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायचे आहे. त्यांनी प्रभुराम चंद्राच्या चरित्राचा अभ्यास करावा.

प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे (जीवन चरित्राचे) शंभर कोटी संस्कृत श्लोक लिहिले जाऊ शकतात आणि त्या श्लोकांच्या एका अक्षरांमध्ये मोठे मोठे पाप नाश करण्याचे शक्ती आहे. असे प्रभुराम चंद्राच्या नामाची महिमा रामना आहे.

shri ram stuti – तुलसीदासांनी भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती (1)

श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् |

नवकंज – लोचनं कंजमुख कर -कंज पद कंजारूणम् ||

संतश्रेष्ठ गोस्वामी तुलसीदास यांनी प्रभू रामचंद्रांची ही राम स्तुती लिहलेली आहे. स्तुती म्हटलं की त्या देवतेची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये येते. माणसाचे मन अतिशय चंचल आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय मना विषयी म्हणतात ‘बहुत चंचल आणि चपळ कोठे जाता येता न लागे वेळ’. मन अतिशय चंचल असुन त्याला कोठे ये- जा करण्यासाठी वेळ लागत नाही.   

  गोस्वामी तुलसीदास आपल्या चंचल मनाला उपदेश करतात. हे अस्थिर मना तू सर्वांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या त्या कृपाळू स्वभावाच्या प्रभू रामचंद्राचे भक्ती भावनेने गुणगान गा. प्रभू रामचंद्र जन्म मरणाच्या दुःखदायक चक्रातून सोडवणारे आहेत.

प्रभू रामचंद्राचे नेत्र हे आता नवीन उमलेल्या कमळाच्या पाकळ्यासारखे अतिशय कोमल आहेत. प्रभू रामचंद्राचे मुख, हात आणि पाय हे सुद्धा लाल कमळाच्या फुलाप्रमाणे आहेत. हे म्हणा तू अशा प्रभू रामचंद्राची स्तुती गा. 

shri ram stuti – तुलसीदासांनी भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती (2)

कंदर्प अगणित अमित छवी नव नील निरज सुन्दरम् |

पट्पीत मानहु तडीत रुचि सुचि नौमी जनक सुतावरम् ||

प्रभु रामचंद्र दिसायला अतिशय सुंदर आहेत. त्यांचा देह अतिशय सुंदर असल्यामुळे सर्वांचेच मने आकर्षित करून घेतो. प्रभू रामचंद्राचे स्वरूप कामदेवापेक्षाही जास्त आकर्षक आहे.

त्यांचा वर्ण आकाशाप्रमाणे नील वर्ण आहे. निळ्या कमळाच्या सरोवरामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसावं तसे प्रभू रामचंद्र  सुंदर दिसतात.

आकाशामध्ये तुरळक ढग असावेत सूर्याची किरणे त्याच्यावर पडून त्या ढगाची किनार अतिशय तेजस्वी चमकावी तसे प्रभुरामचंद्र सर्व मध्ये चमकत राहतात. पवित्र जानकीच्या (सिता) पतीला माझा नमस्कार असो.

shri ram stuti – तुलसीदासांनी भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती (3)

भजु दीन बन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनम् |

रघुनंद आनंद कंद कौशल चन्द दशरथ नन्दनम् ||

हे माझ्या सतत भटकणाऱ्या मना जे दीनदुबळ्याचे कैवारी आहेत असे प्रभू रामचंद्र यांचे भजन कर. जे प्रभू रामचंद्र सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी आहेत, ज्या प्रभुरामचंद्रांणि दुष्ट राक्षस कुळींचा संपूर्ण नाश केलेला आहे. जे आनंदाचा कंद आहेत. अशा दशरथ पुत्र श्रीरामाचे हे मना तु भजन कर.

shri ram stuti – तुलसीदासांनी भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती (4)

सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारु अंग विभुषणम् |

आजानु भुज शर चाप धर सग्रांम जित खर- धूषणम् ||

 जे प्रभू रामचंद्र विविध प्रकारच्या रत्नाने जडवलेला रत्नजडित मुकुट आपल्या मस्तकावर परिधान करतात, ज्यांच्या कानामध्ये कुंडल शोभायमान आहेत,  ज्यानी सुंदर असा तिलक कपाळावरती लावलेला आहे आणि शरीराच्या सर्वांगावर ते आभूषण चढवलेले आहेत

 प्रभु रामचंद्र चे जे स्वरूप मनाला अतिशय आकर्षण करून घेते. प्रभू रामचंद्राचे बाहू (हात) लांब असून ते गुडघ्यापर्यंत पोहोचतात. हातामध्ये धनुष्य धारण केलेले आहे. ज्या प्रभू रामचंद्रांनी खर,दूषण, रावण, कुंभकर्ण इत्यादी राक्षसांना मारून विजयश्री प्राप्त केली. अशा प्रभू रामचंद्रांना मी वंदन करतो. 

shri ram stuti – तुलसीदासांनी भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती (5)

इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम् |

मम हृदय कुंज निवास कुरु कामादी खल दल गंजनम् ||

जे रामचंद्र ऋषी, मुनी, शेष आणि भगवान शंकर यांच्या मनाला अत्यानंद देतात , काम, क्रोध, लोभ,इत्यादी षड्रीपु शत्रूंचा नायनाट करून मानवामध्ये भाव करण्यासाठीजागृती करतात अशा प्रभू रामचंद्राला तुलसीदासजी आपल्या हृदय कमळामध्ये निरंतर निवास करण्यासाठी विनंती करतात

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave a Reply