You are currently viewing Sanskrit Varnamala – संस्कृत वर्णमाला

Sanskrit Varnamala – संस्कृत वर्णमाला

Sanskrit Varnamala || संस्कृत वर्णमाला || Sanskrit Alphabet Chart || PDF Sanskrit Varnamala || Sanskrit Shlok

   दोन किंवा अनेक व्यक्तींमधील संवाद साधण्यासाठी भाषेची गरज असते. भाषेला व्यक्तीमधील संवाद साधण्याचा पूल असे म्हणतात. संस्कृत भाषा ही अतिशय पुरातन भाषा असून सर्व भाषेमध्ये समृद्ध अशी भाषा आहे. आज पर्यंत संस्कृत भाषेमध्ये इतर भाषेचा प्रभाव पडलेला नाही. भाषा म्हटले की व्याकरण आलेच. कोणत्याही भाषेच्या छोट्यात छोट्या भागाला ‘वर्ण ‘ असे म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाची रचना कशी असावी हे वर्णमालेत दिले आहे.

Sanskrit Varnamala – संस्कृत वर्णमाला कशी तयार झाली, संस्कृत श्लोक

नृत्यावसाने नटराजराजो ननाद ढक्का नवपञ्चवारम् |

उध्दर्त्तुकामो सनकादिसिध्दानेतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ||

   हा संस्कृत श्लोक पाणिनी ऋषीने लिहिलेले आहे. या संस्कृत श्लोक मध्ये भगवान शंकराच्या तांडव नृत्याचे वर्णन केलेले आहे. भगवान शंकराने तांडव नृत्य संपवत असताना सनकादी ऋषींच्या सिद्धी आणि कामनापूर्तीसाठी आपले डमरू नऊ आणि पाच असे एकूण 14 वेळा वाजवला. डमरूच्या ध्वनी मधून माहेश्वर सूत्र प्रगट झाले .त्या माहेश्वर सूत्रालाच वर्णमाला असे म्हणतात. ते माहेश्वर सूत्र पुढीलप्रमाणे

माहेश्वर सूत्र

‘अइउण् ,ऋलृक्,एओङ्,ऐऔच्,हयवरट्,लण्,ञमङणनम्,

झभञ्,घढधष्,जबगडदश्,खफछठथचटतव्,कपय्,शषसर् ,हल्|’

अत्र सर्वत्र सूत्रेषु अन्त्यवर्णचतुर्दशम् |

धात्वार्थं समुपादिष्ट पाणिन्यादीष्टसिद्धये ||

 हा संस्कृत श्लोक महर्षी पाणिनीनी संस्कृत व्याकरणाचा संबंध दिला आहे. या संस्कृत श्लोकामध्ये ते असे म्हणतात. वरील सर्व  १४ महेश्वर सूत्राच्या शेवटी हलन्त वर्णाचा उपयोग  फक्त प्रत्याहार बनवण्यासाठी केला जातो. व्याकरणाचे रचेता महर्षी पाणिनीनी तो वर्ण वर्णमालेत घेतलेला नाहीये.

Sanskrit Varnamala – संस्कृत वर्णमाला तीन विभागात विभाजन केले आहे.

1) स्वर (अच्) एकूण (13)

जे वर्ण उच्चारासाठी इतर वर्णावर अवलंबून राहत नाहीत त्यांना ‘स्वर’ (अच्) असे म्हणतात. संस्कृत भाषेत स्वरांची संख्या १३ आहे.वर्णाचा उच्चार करण्यास लागणारा कालावधी मात्रा या एककात मोजतात. उच्चाराच्या कालावधी वरून स्वरांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे.

1) -हस्व स्वर ,एकूण  (5)

ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा कालावधी लागतो त्यास ‘-हस्व स्वर’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :-

  1. लृ

2) दिर्घ स्वर एकूण (4)

ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी दोन मात्रा कालावधी लागतो त्यास ‘दिर्घ स्वर’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :-

3) संयुक्त दीर्घस्वर एकूण (4)

दोन किंवा अधिक स्वरां पासून तयार होणाऱ्या स्वराला ‘संयुक्त दिर्घस्वर’ असे म्हणतात. संयुक्त स्वर दिर्घ स्वरात मोडतात. 

उदाहरणार्थ :-

  1. ए = अ/आ +  इ/ई
  2. ऐ =अ/आ + ए
  3. ओ=अ/आ + उ/ऊ
  4. औ=अ/आ + ओ

2) स्वराश्रीतौ( स्वरादी)

ज्या वर्णाचा उच्चार करताना आदि स्वर येतो त्याला ‘स्वरादी( स्वराश्रीतौ)’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :-

  1. अनुस्वार (‘)
  2. विसर्ग (:)

 3) व्यञ्जनानि (हल-33)

व्यज्यते वर्णान्तर- संयोगेन् द्योत्यते ध्वनिविशेशो येन तद् व्यञ्जनम् |

  ज्या वर्णांना उच्चारांसाठी स्वरांवर अवलंबून राहावे लागते त्या वर्णांना ‘व्यंजने’ असे म्हणतात. व्यंजनाचे चार प्रकार आहेत.

 1) वर्गीयव्यञ्जनानि ( स्पर्श वर्ण ) (25)

ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील एका अवयवांचा स्पर्श दुसऱ्या अवयवाला होते त्याला ‘स्पर्श वर्ण’ असे म्हणतात. यांचे पाच वर्गात विभाजन केल्याने त्यालाच वर्गियव्यञ्जनानि असे देखिल म्हणतात.

उदाहरणार्थ :-

  1. कु (क-वर्ग:)  क्   ख्   ग्   घ्   ङ्
  2. चु (च-वर्ग:)  च्   छ्    ज्   झ्  ञ्
  3. टु (ट-वर्ग:)  ट्   ठ्     ड्   ढ्    ण्
  4. तु (त-वर्ग)  त्  थ्     द्   ध्    न्
  5. पु ( प-  वर्ग)  प्    फ्   ब्    भ्    म्

2)अन्त:स्थव्यञ्जनानि

ज्या व्यंजनाचा उच्चार ( इ,ऋ,लृ, उ) या स्वरा सारखा होतो त्यांना ‘अन्त:थव्यञ्जनानि’  (अर्धस्वर) असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :-

  1. य्    
  2. र्    
  3. ल्    
  4. व्

३) उष्मव्यञ्जनानि

ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातून हवा घासत बाहेर येते त्यास ‘उष्मव्यञ्जनानि ( उष्मे) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

  1. श्  
  2. ष्  
  3. स्   
  4. ह्

4) संयुक्त – व्यञ्जनानि

ज्या व्यंजना मध्ये दोन किंवा अधिक व्यंजने असतात. त्याला ‘संयुक्त व्यञ्जनानि’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

श्र = श् + र् + अ

  1.  त्र =  त् + र् + अ
  2. क्ष=  क् + ष् + अ
  3. ज्ञ = ज् + ञ्+ अ

अभिजातसंस्कृते ‘ळ’ नास्ति केवलं वैदिक सूक्तेषु आस्ति|

अभिजात संस्कृत मध्ये ‘ळ’ चा वापर केला जात नाही ‘ळ’ चा वापर फक्त वैदिक सूत्रामध्ये केला जातो.

सर्व प्रकारची व्यंजने एकाच संस्कृत श्लोकात आणि तिही क्रमाणे

क:खगीघाङ्च्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:| 

तथोदधीन पफर्बाभीर्मयोऽरिल्वाशिषा सह ||

पक्षांचे प्रेम, शुद्ध बुद्धीचे, दुसऱ्या चे बळ अपहरण करण्यात पारंगत, शत्रूला ठार मारण्यात सर्वात पुढे, मनाने निश्चल त्याच प्रमाणे निडर व्यक्तीला शत्रूचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो.

PDF संस्कृत वर्णमाला डाऊन्लोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

इतर संस्कृत श्लोक पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

  1. कर्म संस्कृत कोट्स मराठी अर्थासह 
  2. भगवद्गीता संस्कृत कोट्स

Leave a Reply