सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे Karma Sanskrit Quotes With Meaning अर्थांसह संग्रहित केले आहेत.
Table of Contents
karma Sanskrit quotes with meaning – अध्याय 2
योगस्थ: कुरु कर्मणि संगं त्यक्त्वा धनञ्जय |
सिद्ध्यसिद्धयो समो भुत्वा समत्वं योग उच्चते ||४८|
श्रीमद् भगवद्गीता अध्याय २
योगी होऊन तो कर्म कर. कर्म करत असताना फळाची अपेक्षा सोडून कर्म करावे. कर्म कधीच आपल्या आपेक्षा प्रमाणे फळ देतील असे सांगता येत नाही. मन स्थिर ठेवून निष्काम मनोवृत्तीने कर्म करीत राहावे .कारण मनाची स्थिरता समत्व. कायम राहणे यालाच योग असे म्हणतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ||४७||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय २
कर्तव्य कर्म करण्याचा तुमचा सर्वांचा अधिकार आहे .परंतु त्याच्या फळांमध्ये आपला अधिकार कधीच नसतो. त्यामुळे कर्तव्य कर्म करत असताना फळाचा उद्देश समोर ठेवून कधीही कर्तव्य कर्म करू नयेत.
दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय |
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव:||४९||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय २
बुद्धीच्या समत्वा पेक्षा सकाम कर्म दुरून फार निकृष्ट आहेत. म्हणून हे धनंजया तू बुद्धीच्या समतेचा आश्रय घेऊन कर्मकर. कारण फलाचा उद्देश बनवणारे अत्यंत दीन आहेत.
karma sanskrit quotes with meaning – अध्याय 3
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्मं पुरुषोऽश्नुते |
न च सन्न्यासनादेव सिद्धिं समाधिगच्छति ||४||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
कोणताही मानव कर्माची सुरुवात केल्याशिवाय निष्करमतेचा अनुभव नाही आणि कर्माचा केवळ त्याग केल्याने कोणीही सिद्धीला प्राप्त होत नाही.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् |
कार्यते ह्यवशः कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ||५||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
कोणताही मानव कोणत्याही अवस्थेत एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण प्रकर्तीला परवष झालेल्या सर्व प्राण्याकडून प्रकरतीजन्य गुण कर्मे परमात्मा करवीत असतात.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् |
इंद्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: उच्याते ||६||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
जो मनुष्य कर्म इंद्रियांना रोखून धरतो आणि मनाने मात्र विषयाचे चिंतन करतो. अशा जड बुद्धीच्या माणसाला मिथ्याचारी असे म्हणतात.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन |
कर्मेन्द्रियै : कर्मयोगमसक्त : स विशिष्टते|| ७||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
जो मनुष्य मनाने सर्वे कर्मेंद्रियावर अशक्ति रहित होऊन नियंत्रण करतो. सर्व कर्मंद्रियाद्वारे कर्मयोगाचे आचरण करतो. तोच सर्वश्रेष्ठ पुरुष असतो.
यज्ञशिष्टाशिन: सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै:|
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ||१३||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
जे लोक योगाचा म्हणजेच समत्वाचा अनुभव करतात ते संपूर्ण पापापासून मुक्त होतात ;परंतु जे केवळ फक्त स्वतःसाठीच अन्न शिजवतात म्हणजेच स्वतःसाठीच सगळे कर्म करतात ते लोक पापाचेच भक्षण करतात. जे स्वतःसाठी जगले ते मेले आणि जे इतरांसाठी मेले ते अमर झाले.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तनतीह य: |
आघायुरिद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ||१६||
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३
जो मानव या जगात सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही. सृष्टीचक्राच्या नियमाचे पालन करत नाही. सृष्टीचक्राला अनुसरून आपले कर्म करत नाही. तो मनुष्य म्हणजे इंद्रियाच्या भोगात रमणारा पापी आयुष्य जगत असलेला पुरुष व्यर्थ आहे.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: |
आत्मन्येव च सन्तुष्टतस्य कार्यं न विद्यते ||१७||
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३
जो मनुष्य निसर्गाला अनुसरून कर्तव्य कर्म करतो. आपल्या आत्मानंदात रमतो, आत्म्यातच तृप्त आणि संतुष्ट राहतो. त्या मनुष्यासाठी या जगात कोणतेही कर्तव्य कर्मे राहत नाहीत.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय:|
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ||२०||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
राजा जनकासारखे अनेक महापुरुष लोक समूहासाठी कर्मे करून परमसिद्धीला प्राप्त झाले. म्हणून कर्म करत असताना लोकसंग्रहाचा विचार करून निष्काम भावनेने कर्मे करावेत. अशी कर्मे करण्यास अर्जुन तु योग्य आहेस.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन |
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ||२२||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ! मला स्वर्ग ,मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात काही कर्तव्य कर्म नाही आणि मला कोणतेही गोष्ट प्राप्त नाही असे नाही. असे असताना देखील मी नेहमी कर्तव्य कर्म करत राहतो. म्हणून सर्वांनीच नेहमी कर्तव्य कर्म करत राहिले पाहिजे.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतंन्द्रित: |
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ||२३||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ! मी जर सावध होऊन कर्तव्य कर्म केले नाहीत; तर फार मोठा अनर्थ होईल. कारण सर्व मनुष्य योनी माझ्या कर्तव्यकर्माचे अनुसरण करते. मी जर कर्म केले नाही तर लोकही कर्म करणार नाहीत.
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: |
अहङ्कारविमुढात्मा कर्ताहमिति मन्यते ||२७||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
संपूर्ण कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारे केली जातात ;परंतु अहंकाराने मोहित झालेला मनुष्य ही सर्व कर्मे मीच केली आहेत असे मानतो. जसे बैलगाड्याच्या खाली कुत्रा चालत असतो त्याचा भास झालेला असतो आपणच ही गाडी ओढतो त्याप्रमाणे मनुष्याचा अहंकार झालेला असतो.
मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा |
निराशीर्निर्ममो भुत्वा युध्यस्व विगतज्वर:|| ३०||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
हे अर्जुना विवेक बुद्धीचा वापर करून सर्व कर्तव्य कर्म कर. ते कर्म सर्व मला अर्पण कर. युद्ध रूपी कर्म करत असताना कामना रहित, ममता रहीत आणि संताप रहित होऊन युद्धाचे कर्तव्यरूपी कर्म कर.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: |
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मनण: ||८ ||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
मानवाने शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म करावे. कारण काहीच कर्म न करण्यापेक्षा काहीतरी कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म न करता कोणाच्याही शरीराचा उदारनिर्वाह चालत नाही .
तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचार |
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुष:||१९||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ३
म्हणून मानवाने नेहमी आसक्त न होता आपले कर्तव्य कर्म निसर्गाला अनुसरून करत राहिले पाहिजे. कारण असक्ती सोडून कर्तव्य कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
karma sanskrit quotes with meaning – अध्याय 4
कर्मणोह्यपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मण: |
अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणोगति : ||१७||
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४
कर्म म्हणजे काय?( शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले कार्य म्हणजे कर्म ),विकर्म म्हणजे काय? (शास्त्राच्या विरुद्ध कार्य म्हणजे विकर्म)आणि अकर्म म्हणजे काय ?( कोणतेच कार्य न करणे म्हणजे अकर्म )आपण हे सर्व जाणून घेतले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे फार कठीण आहे
कर्मणि अकर्म य: पश्येत् अकर्मणि च कर्म य: |
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्त: कृत्स्न्न कर्मकृत् ||१८||
श्रीमद् भगवद्गीता अध्याय ४
स्वधर्म नियमित कर्म हेच अकर्म असतात आणि कर्म रहित राहायचे म्हटले तरीही त्यातही कर्म घडतच असते. हे जो जाणतो तोच खराब बुद्धिमान मनुष्य आहे.
karma sanskrit quotes with meaning – अध्याय 9
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् |
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ||२७||
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९
हे ! कुन्ती नंदन तू जे काही कर्म करतोस ते मला अर्पण कर. जे काही भोजन करतोस ते मला अर्पण कर. जे काही यज्ञ करतोस ,दान देतोस, जे तप तप करतोस ,म्हणजेच जीवनातील सगळी कर्म मला अर्पण कर.
karma sanskrit quotes with meaning – अध्याय
पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवा 😐
न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति मानवा :||
मनुष्य पुण्य कर्म करत नाही पण पुण्याच्या फळाची मात्र अपेक्षा ठेवतो. पापाचे फळ त्याला नको असते पण पाप कर्म करण्याचे सोडत नाही.
इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा