सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे Sanskrit Shlok On Life अर्थांसह संग्रहित केले आहेत.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 1
अनुव्रत: पितु: पित्रो ,माता भवत संमना:|
जाया पत्ये मधुवर्ती वायं वदतू शन्तिवाम्||
अथर्ववेद ३/३०/२
आदर्श जीवन कसे जगावे हे या सदरील जीवन पर संस्कृत सांगितलेले आहे. जीवन मार्ग दर्शविणारा हा जीवन पर संस्कृत श्लोक अथर्ववेदातील आहे. आदर्श जीवनात पुत्र आई-वडिलांचा आज्ञाधारी असतो. आणि आई-वडीलही मुलाचे हितचिंतक असतात. अशा आदर्श घरामध्ये पती आणि पत्नीमध्ये संबंध चांगले असतात. ते एकमेकाचा आदर करतात. एकमेकांवर प्रेम करतात. ज्या घरामध्ये या श्लोकातील गुण पाहायला मिळतात ते घर ,घर नसून एक मंदिर बनते. जीवनामध्ये सर्वांनीच परिवार ,प्रेम ,परमात्मा आणि पैसा जपला पाहिजे.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 2
पुनन्तु मा देवजना: पूनन्तु मनसा ध्यिय:|
पुनन्तु विश्वा भूतानि जातवेद: पुनीहि मा ||
यजुर्वेद: १९/३९
सदरील जीवन पर संस्कृत यजुर्वेदातील आहे. या जीवन पर संस्कृत श्लोकामध्ये ऋषींनी सदगृहस्थ कोणाला म्हणायचे हे सांगितले आहे. जो आपल्या मुलाला सदाचार आणि विद्या शिकवतो, त्याला विद्वान ,सुंदर त्याचबरोबर चारित्र्यवान बनविण्याचे पवित्र कार्य करतो, अशा मनुष्याला सदगृहस्थ असे म्हणतात.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 3
मनुष्याला सदगृहस्थ असे म्हणतात.
उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा |
सम्पतौ च विपतौ च महतामेकरुपता||
महान व्यक्तीचे लक्षण सदरील जीवन पर श्लोकामध्ये सांगितलेले आहे. या जीवन पर श्लोकामध्ये सूर्य आणि महान व्यक्ती यांची तुलना केलेली आहे. सूर्य उगवताना तांबूस रंगाचा दिसतो. तसेच मावळता नाही तांबूस रंगाचा दिसतो. ‘जे ना देखे रवी तो देखे कवी’या न्यायाने सदरील कवीने या दोन्ही वेळेच्या सूर्याचे तुलना महान व्यक्तीबरोबर केलेले आहे. उगवता सूर्य म्हणजे महान व्यक्तींचा भरभराटीचा काळ आणि मावळता सूर्या म्हणजे महान व्यक्तीवर आलेल्या संकटाचा काळ. दोन्ही परिस्थितीमध्ये सूर्य जसा सारखाच दिसतो त्याचप्रमाणे महान व्यक्ती देखील आपल्यावर आलेल्या आपत्ती आणि संपत्ती या दोन्ही काळात सारखेच असतात. संपत्ती आली म्हणून ते कधी माजत नाहीत. विपत्ती आली म्हणून ते कधी लाजत नाहीत. त्या विपत्तीला धैर्याने तोंड देऊन तिचा प्रतिकार करतात. सदरील गोष्ट या जीवन पर श्लोकामध्ये कवीने सांगितलेले आहे.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 4
कन्या वरयेते रूपं माता वित्तं पिता श्रतम्|
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे||
जीवनात आपला जोडीदार कसा असावा जीवन पर संस्कृत श्लोकात सांगितले आहे. त्या जोडीदाराकडून इतर नातेवाईकांची अपेक्षा काय हे सदरील जीवन पर संस्कृत लोकांमध्ये सांगितलेले आहे. वधू मुलगी ही वर राजाच्या रूपावर भाळते. म्हणजे मुलीला पती म्हणून मुलगा सुंदर असावा असं वाटतं. मुलीच्या आईची इच्छा असते की आपला जावई धनवान असला पाहिजे. त्याच्याकडे मोटार गाडी ,बंगला ,सोने ,बँक बॅलन्स इ.असले पाहिजे.
मुलींच्या वडिलांची इच्छा असते की जावयाकडे प्रॉपर्टी नसली तरी चालेल , रूपवान नसला तरी चालेल परंतु तो सुश्रुत म्हणजे विद्यावान आणि गुणवान असला पाहिजे. मुलीचा जो बंधू आहे त्याची अपेक्षा काय असते की आपल्या बहिणीचा पती हा खानदानी असला पाहिजे. परंतु वऱ्हाडी मंडळी म्हणजे इतर पाहुणे, मित्रमंडळी यांचे म्हणणे असते की नवरा कसाही असो, नवरी कसाही असो आपल्याला मेजवानी मात्र जबरदस्त पाहिजे. लग्न नवरा नवरीचे असते अपेक्षा मात्र इतर लोकांचे असतात. म्हणून नवरा मुलगा निवडताना त्याचा स्वरूप परिचय, कार्य परिचय आणि स्वभाव परिचय झाला पाहिजे.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 5
अतिपरिचयादवाज्ञा सततगमनादनादरो भवति|
मलये भिल्लपुरन्र्धी चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरते||
या जीवन पर संस्कृत श्लोकांमध्ये जगाशी संबंध कसा ठेवावा हे सांगितले आहे. जीवन जगत असताना अशा जीवन पर संस्कृत श्लोकाच्या आशयाचा आधार घेऊन जगल्यास जीवन सुखी होते. कधीमधी येणारी माणसे आपल्याला नेहमीच स्वागतार्ह वाटतात .एखाद्याच्या घरी आपण सतत गेलो तर त्या घरी आपला आदर होत नाही. अति परिचय झाल्यानंतर त्या व्यक्तीची अवज्ञा होते. हे पटवून देण्यासाठी या जीवन पर श्लोकामध्ये कर्त्याने एक उदाहरण दिले आहे.
चंदनाची लाकूड हे मौल्यवान असते.ते शीतलता प्रधान करणारे करते. म्हणून त्याला जनतेमध्ये भरपूर मागणी आहे. चंदनाच्या लाकडाचा दर हे भरपूर असतो. अशा मौल्यवान चंदनाचे वृक्ष मलय गिरी पर्वतावर भरपूर वृक्ष असतात. चंदन मौल्यवान असले तरी तेथे राहणाऱ्या महिलांना ते अतिपरिचित झाल्यामुळे त्या मलय गिरी पर्वतावर राहणाऱ्या महिला चंदनाचा उपयोग इतर लाकडा प्रमाणे जाळण्यासाठी सरपन म्हणून करतात. यावर एक कबीर जी दोहा सांगतात.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 6
आवत हि हरषयै नहीं नैनंन नाहि सस्नेह
तुलसी तहा न जाइये कंचन बरसे |’
ज्या ठिकाणी आपला आदर केला जात नाही. मान दिला जात नाही. आपण घरी गेल्यानंतर आपल्याविषयी प्रेमाच्या ऐवजी तिरस्कार दिसत असेल, अशा घरी मनुष्याने कधीही जाऊ नये. भले त्या घरी सोन्याचा पाऊस पडत असेल तरी जाऊ नये.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 7
दूरजनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत्|
उष्णो दहति चाङ्गार: शित: कृष्णायते करम्||
सदरील जीवन पर संस्कृत श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे.दुर्जनाची संगत घडल्यावर जीवनात काय बदल होतात हे सदरील जीवन पर संस्कृत श्लोकामध्ये सांगितले आहे.जीवनामध्ये जीवनाची प्रगती त्याच्या संगतीवर अवलंबून असते. हे पटवून सांगण्यासाठी सदरील संस्कृत श्लोक लिहिला गेला आहे. ‘सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो’ असे रामदास स्वामींना म्हटलेले आहे. जीवनात संगती नेहमीच चांगल्या माणसाची झाली पाहिजे.
दूर्जना सोबत कधीही संगती करू नये. कारण त्यांची संगती म्हणजे विस्तवाप्रमाणे असते. विस्तव जोपर्यंत विस्तव आहे त्याला स्पर्श झाला की तो चटका देणारच. आणि विस्तव विजून त्याचा कोळसा झाला. कोळशाला स्पर्श झाला की हात काळे होणार. तसे दुर्जन कसाही असू द्या तो आपल्याला घातक ठरणार म्हणजे ठरणारच. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज .’ तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी,’विंचवाच्या तर फक्त नांगी विष असते. दुर्जनाच्या सर्वांना मध्ये विष असते. म्हणून जीवन जगत असताना दुर्जनाची संगती कधीही करू नये..
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 7
सुखं हि दु:खान्य नुभुय शोभते
घनान्धकारेष्विव दीपदर्शनम् |
सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां
धृत: शरीरेण मृत: स जीवति ||
या जीवन पर संस्कृत लोकांमध्ये जीवन कसे असावे याचे महत्त्व सांगितले आहे.जीवनामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःख नंतर सुख त्याचे जीवन चक्र चालू असते. जीवन चक्र मध्ये याचा योग्य क्रम कसा असावा हे या जीवन पर संस्कृत श्लोकामध्ये सांगितले आहे.घनदाट अंधारामध्ये छोटासा दिवा देखील अत्यंत शोभूनिय दिसतो. त्याप्रमाणे दुखा नंतर येणारे सुख देखील शोभुन दिसते. परंतु जीवनामध्ये आधी सुख असून नंतर त्याच्या जीवनात दुःख आले तर असा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखाच असतो.
एखादी घटना मनाला अनुकूल असेल तर त्या गोष्टीपासून सुख मिळते. तीच घटना मनाला प्रतिकूल असेल तर माणसाला दुःख होते. खूप वेळ उन्हात उभा राहुन सावलीत गेल्यानंतर मनाला सुख होते. परंतु हिवाळ्यामध्ये थंडी असताना उन्हामध्ये सुख होते. मनुष्य गरिबीतून श्रीमंत झाला तर त्याला सुख होते. पण श्रीमंतीतून गरीब झाला. तर त्याच्या मनाला दुःख होते. दुःख नंतरचे सुख मनुष्य बच होऊ शकतो परंतु सुखानंतरचे दुःखी जीवन मात्र मनुष्याला त्रासदायक ठरते हे या श्लोकातून सांगितलेले आहे.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 7
जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं
मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति |
चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तीं
सत्सङ्गति: कथय किं न करोति पुंसाम् ||
सदरील जीवन पर संस्कृत श्लोक नीतिशतकातून घेतलेला आहे. मानवाच्या जीवनातील सज्जन माणसाच्या संगतीचे महत्त्व सदरील जीवन पर संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहे. मानवाची प्रगती किंवा अधोगती त्याच्या संगतीवर अवलंबून असते. तो जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिला तर त्याची प्रगती होते. दुर्जनाच्या संगती मध्ये राहिला तर अधोगती होते. सज्जनाचे संगतीमुळे मानवाच्या जीवनात नेमके कोणते बदल होतात हा संस्कृत श्लोक दर्शवितो.
- 1) सज्जन(संत) माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर कमी बुद्धीचे असलेले लोक बुद्धिमान होतात.
- 2) सज्जन(संत) माणसे नेहमी खरे बोलत असल्यामुळे त्यांच्या संगती मध्ये जे राहतात तेही नेहमी खरेच बोलतात.
- 3) समाजामध्ये त्यांचा मान वाढतो.
- 4) त्यांचे झालेले पाप नाहीसे होते.
- 5) त्याचे मन नेहमी प्रसन्न राहते.
- 6) त्यांची कीर्ती दूरवर पसरते. संत कबीर जी म्हणतात ‘मूरत से तो किरत बडी बिना पंख उड जाये ऐसे लक्ष्मी दाते की तीनो लोगो मे समाये|’
त्यामुळे जीवनामध्ये सतसंगती अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ‘संताचे संगती मनो मार्ग गती |अकळावा श्रीपती येणे पंथे||’एवढे सगळे बदल जीवनात होत असल्यामुळे तुकोबाराय संतांचे उपकार माणतात.
‘काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविति’ म्हणून मानवाने नेहमी सज्जनाच्या संगतीमध्ये राहावे.
Sanskrit Shlok On Life – जीवन पर संस्कृत श्लोक 8
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम् |
विरक्तस्य तृणं भार्या, निस्पृहस्य तृणम जगत ||
सदरील जीवन पर संस्कृत श्लोक नीतिशतकामधील असून यामध्ये जीवनाचे महत्त्व सांगितले आहे. काही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला फार मोठे महत्त्व देतात. तर काही गोष्टीला जीवनामध्ये ते काडीमोल ( तृण )समजतात. वित्त म्हणजे धन बरेचसे लोक जीवनामध्ये पैशाला किंमत देतात. म्हणून ते कधी दानधर्म मध्ये करत नाहीत. परंतु दानशूर लोक आपल्या जीवनात धनाला किंमत देत नाही ते धनाला काडीमोल समजतात. मरणाची भीती सर्वांनाच वाटते. परंतु शूर लोक मरणाला काडीमोल समजतात. प्रत्येकाला आपली पत्नी प्रिय असते. परंतु विरक्त लोक पत्नीला काडीमोल किंमत देतात. ज्या व्यक्तीला समाजाने गटाच्या बाहेर फेकलेले आहेत. अशा निस्प्रह व्यक्तीला पूर्ण जगच काडीमोड वाटते.
इतर अध्यात्मिक संस्कृत श्लोक पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.