सफलता पर संस्कृत श्लोक !! संस्कृत श्लोक !! Sanskrit Shlok !! sanskrit shlok with meaning !! safalta par sanskrit shlok
सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे सफलता पर संस्कृत श्लोक आहे.
Table of Contents
सफलता पर संस्कृत श्लोक 1 safalta par sanskrit shlok 1
न हि जन्मानी जेष्ठत्वं ज्येष्ठत्वं गुण उच्यते|
गुणाद्गुरुत्वमायादि दधि दुग्धं घृतं यथा ||
जीवनामध्ये ज्या व्यक्ती सफल झालेल्याआहेत त्या लोकांची प्रमुख लक्षणे सदरील संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. सफल व्यक्ती आणि असफल व्यक्ती या दोघांचा विचार केला तर दोघांच्या दिसण्यामध्ये कोणताही फरक आढळून येत नाही. सफल व्यक्तीला डोके, हात, पाय, इ.अवयव असतात जे की आपण असफल व्यक्तीकडे असतात.
दोघांच्या जन्मामध्ये फारसा फरक नसतो. या संस्कृत श्लोकामध्ये संस्कृत सुभाषितकार सांगतो की जन्माने कोणीही मोठे होत नाही. मनुष्य मोठा होतो तो त्याच्या विचारामुळे आणि कर्तव्यामुळे. काही व्यक्ती सफल होण्याचा विचार करतात परंतु तो विचार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काही काही व्यक्ती कार्य मोठ्या प्रमाणात करतात पण ते कार्य विचार करून करत नाहीत म्हणून अशा दोन्हीही प्रकारच्या व्यक्ती जीवनात अपयशी होतात.उदा. तीन मुले उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी इतर मुले विहिरीमध्ये पोहतात त्या ठिकाणी गेली.
त्या तिघांनी पाहिले इतर मुले विहिरीमध्ये उड्या टाकतात पोहतात वर येतात. या तिघांनाही पोहता येत नव्हते. त्यातील एकाने विचार केला आपणही या मुलाप्रमाणे करूया म्हणून त्याने विहिरीत उडी टाकली. यांने कृती केली पण विचार केला नाही आणि त्यामुळे तो पोहण्यामध्ये असफल झाला. त्याच्या बाजूला असलेल्या मुलाने विचार केला आपल्याला पोहायला आले पाहिजे. परंतु तो फक्त विचारच करत राहिला कृती अजिबात केले नाही.
त्यामुळे तोही पोहायला शिकला नाही. तिसऱ्या मुलाने बारकाईने निरीक्षण केले इतर मुले पोहतात म्हणजे आपल्यालाही पोहायला येईल आणि त्यासाठी पोहणाऱ्या मुलांना त्याने विचारून त्यांच्याकडून पोहण्याची शिक्षण घेतले आणि तो पोहण्यामध्ये यशस्वी झाला तिसऱ्या मुलाने फक्त विचार केला नाही तर त्यासोबत कृतीही केली त्यामुळे तो पोहण्यात सफल झाला.ज्याला सफल व्हायचंय त्याने विचार करा योग्य दृष्टीने कृती करा आणि जीवनामध्ये सफल व्हा असा सुंदर संदेश या सुभाषितांमध्ये दिलेला आहे. काही व्यक्ती मोठ्या सफल घराण्यात जन्मूनही सफल होत नाहीत.
याउलट काही व्यक्ती सामान्य कुटुंबात जन्मूनही जीवनामध्ये यशस्वी होतात.उदा: छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धीरूभाई अंबानी, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, सुशील कुमार शिंदे इ. आपणाला असंख्य उदाहरणे सांगता येतील. हे सर्वजण सामान्य कुटुंबात जन्मले असले तरी जागतिक कीर्तीचे व्यक्ति आहेत. सुभाषितकार सांगतो ज्याला सफल व्हायचा आहे त्याच्या अंगी उच्च प्रतीचे गुण असावे लागतात.
जीवनात व्यक्ती सफल कसे होतात हे पटवून देण्यासाठी कवीने एक उदाहरण या संस्कृत श्लोकांमध्ये दिले आहे. उदाहरणांमध्ये दूध, दही, लोणी, तूप, ताक हे पदार्थ सांगितले आहेत. हे सर्व पदार्थ दुधापासून तयार झालेले आहेत. जरी हे सर्व पदार्थ एकाच पदार्थापासून म्हणजे दुधापासून तयार झाले असले तरी प्रत्येकाच्या भावामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. दुधापेक्षा दही दुपटीने माहाग असते. दह्यापासून ताक आणि लोणी हे दोन पदार्थ तयार होतात.
या दोन्ही पदार्थाच्या किंमतीमध्ये फार मोठी तफावत असते. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात.’दह्याची हे अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये’ लोण्यापासून तूप तयार होते. तुपाची किंमत या सर्व पेक्षा जास्त असते. या सर्व पदार्थाच्या तुलनेत ताक सर्वात स्वस्त असते. तर तूप सर्वात महाग असते. त्याचे कारण ताकापेक्षा दुधामध्ये पोषण तत्वे जास्त असतात. दुधापेक्षा दह्यामध्ये पोषण तत्वे जास्त असतात. दह्यापेक्षा लोण्यामध्ये आणि लोण्यापेक्षा तुपामध्ये ही पोषण तत्वे जास्त असतात. म्हणून प्रत्येक पदार्थाचा भाव हा त्यामध्ये असलेल्या पोषण तत्वावर अवलंबून असतो.
त्याप्रमाणे माणसाचा लहान मोठेपणा हा त्याच्या अंगी असलेल्या सदगुणावर अवलंबून असतो. कोणताही मनुष्य दिसण्यावर सफल होत नाही तर त्याच्या अंगी असलेल्या सदगुणावर तो सफल होतो. हे या संस्कृत श्लोकांमध्ये सुभाषितकाराणे सांगितले आहे.
सफलता पर संस्कृत श्लोक 2 safalta par sanskrit shlok 2
जलबिन्दूनिपातेन क्रमशः पूर्यते घट:|
स हेतु: सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च||
जीवनामध्ये सफलता कशी मिळवायची हे या संस्कृत श्लोक मध्ये सांगितलेले आहे. सफलता चमत्कार होऊन मिळत नाही. किंवा अपघाताने ही सफलता मिळत नाही. सफलता मिळवण्यासाठी अथांग योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात. जीवनात सफल होण्यासाठी अगोदर ध्येय ठरवावे लागते.
त्या घ्येयाची छोट्या छोट्या विभागामध्ये विभागणी करावी. ही छोटी छोटी ध्येय ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करणे म्हणजे सफल होणे होय. ज्याप्रमाणे पावसाचा एक एक थेंब एकत्र येऊन मोठा तलाव भरतो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’. संस्कृत कवी म्हणतो पाण्याचा एक एक थेंब जर घागरीमध्ये पडत असेल तर ती घागर निश्चितच भरते.
याचप्रमाणे प्रयत्नाचे एक एक पाऊल यशाच्या दिशेने पडत असेल तर यश निश्चितच मिळते. हे पटवून देण्यासाठी कवीने विद्या, धन आणि धर्म हे तीन उदाहरणे दिले आहेत.
जीवनामध्ये कोणीही एका दिवसात विद्यावान होत नाही. करण विद्या ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. एका कम्प्युटर मधील डेटा दुसऱ्या कम्प्युटरमध्ये टाकायचं असेल आपण पेन ड्राईव्ह कनेक्ट करून किंवा वायर कनेक्ट करून हे कार्य करू शकतो. तसे गुरुजी कडील विद्या विद्यार्थ्याकडे घेताना अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही.
विद्यार्थ्याला विद्या मिळवताना प्रत्येक क्षणाला गुरुजी काय शिकवतात याकडे लक्ष देऊन त्याचे मनन करावे लागते. म्हणजे विद्या क्षणाला क्षणाला वाढते. हाच न्याय धर्माच्या आणि धनाच्या बाबतीत असतो.जो प्रत्येक क्षणाला आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करतो तो जीवनामध्ये सफल झालेला असतो.
छोटे संस्कृत श्लोक one line पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सफलता पर संस्कृत श्लोक 3 safalta par sanskrit shlok 3
अनारम्भो ही कार्याणां प्रथमं बुद्धीलक्षणम्|
आरब्धस्यान्तगमनं द्वितीयं बुद्धीलक्षणम् ||
जीवनामध्ये ध्येय मोठे असेल तेव्हा ते ध्येय सफल करण्यासाठी बुद्धी सुरुवातीला कार्याला सुरुवात करत नाही. हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे. परंतु बुद्धीने एकदा मनावर घेतले की ते कार्य सफल केल्याशिवाय बुद्धी तंबू देत नाही.
अगर बुद्धीने मान लिया तो हार है| लेकिन बुद्धीने ठाण लिया तो सफलता है| मनावर घेतलेलं कार्य सफल झाल्याशिवाय सोडायचं नाही हे बुद्धीचे दुसरे लक्षण आहे.