You are currently viewing गणेश मंत्र

गणेश मंत्र

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे गणेश मंत्र संकटनाशनगणेशस्तोत्र श्लोक आहे.

गणेश मंत्र 1

(सदरील संस्कृत श्लोक /मंत्र महर्षी नारदांनी रचलेल्या संकटनाशन स्तोत्र मधील आहे. या संस्कृत श्लोकांमधून महर्षी नारद गणपतीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात. कारण गणपती हा दुःख नाश करणारा देव आहे. समर्थ रामदास स्वामींनी त्यांना सुखाचा करता आणि दुःखाचा हरता असे संबोधले आहे. गणपती म्हणजे गणाचा पती. पती या शब्दाचा अर्थ मालक असा होतो आणि गण या शब्दाचा अर्थ योनी असा होतो. त्यामध्ये मनुष्यगण देवगण आसुरगण इ. गणाचा मालक असा होतो. त्याच बरोबर गणेश या शब्दाचा अर्थ गणाचा इश म्हणजे देव असा होतो. आणि म्हणून महर्षी नारद या संस्कृत श्लोकाद्वारे देव गणपतीला नमस्कार करतात. नारद गणेशाला गौरी पुत्र असे संबोधतात. गणपती हा गौरीचा म्हणजे पार्वतीचा पुत्र आहे. त्याचबरोबर हा विनायक आहे.

नायक म्हणजे नेता. गणपती हा सर्व देवतांचा नेता आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी पूजा असो सर्वात प्रथम गणपतीला मान दिला जातो. जे भक्त भक्ती भावनेने भगवान गणेशाची मनोभावे पूजा करतात. त्यांचे आयुष्य वाढते. त्याचबरोबर आयुष्यात येणारे संकटे विघ्ने दूर होतात. अशा भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. भगवान गणेशाची पूजा केल्यानंतर जीवनात कसे लाभ होतात हे सदरील  संस्कृत श्लोकामध्ये महर्षी नारदाने सांगितलेले आहे. पूजा करत असताना जो जप करायचा आहे तो गणपतीच्या बारा नावाचा जप करायचा आहे. ते बारा नावे कोणती ते सदरील संस्कृत लोकांमध्ये महर्षी नारादाने सांगितलेली आहेत गणपतीला खालील बारा नावाने संबोधले जाते.)

गणेश मंत्र 2

(गणपतीचे पहिले नाव वक्रतुंड असे आहे. वक्र म्हणजे वाकडे आणि तुण्ड म्हणजे तोंड. गणपतीची सोंड वाकडी आहे. म्हणून त्यांना वक्रतुंड असे म्हणतात. गणपतीच्या दोन सुळ्या दाता पैकी एक दात तुटलेला आहे. म्हणून त्यांना दुसरे नाव एकदंत असेही नाव पडलेले आहे. गणपतीचे डोळे काळे व तपकिरी असल्यामुळे त्यांचे तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष असे पडले आहे. अक्ष म्हणजे डोळा. आणि त्यांचे चेहरा म्हणजेच तोंड हत्तीचे असल्यामुळे त्यांना चौथे नाव गजवक्त्रम असे आहे. गणपतीला असणारी  चार नावे नारदाने या संस्कृत लोकांमध्ये सांगितलेले आहेत.)

गणेश मंत्र 3

(गणपतीला असलेले इतर चार नावे या सदरील संस्कृत श्लोकामध्ये नारदाने सांगितले आहेत. गणपतीचे पोट मोठ्या असल्या कारणाने त्यांना लंबोदर म्हणतात. लंबोदर याचा अर्थ लांब आहे उदर ज्याचे असा तो असा होतो. लंबोदर हे गणपतीचे पाचवे नाव आहे. विकटमेव हे गणपतीचे सहावे नाव आहे. लोकांचे विघ्नहरण करण्यामध्ये गणपतीचा कोणी हात धरू शकत नाही म्हणून त्यांना विघ्न राजेंद्र हे गणपतीचे सातवे नाव आहे. धुम्र वर्ण या नावाने गणपतीने अवतार घेतलेला आहे म्हणून त्यांचे आठवे नाव  धुम्रवर्ण आहे)

गणेश मंत्र 4

( गणपतीच्या कपाळावर चंद्र आहे. म्हणून त्यांचे नववे नाव भालचंद्र असे पडले. भालचंद्र म्हणजे भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो. सर्व गणाचे नायक असल्यामुळे त्यांना दहावे नाव विनायक असे पडले. सर्व गणाचे अधिपती असल्यामुळे त्यांना अकरावे नाव गणपती असे पडले. आणि त्यांचे बारावे नाव गजानन असे आहे. गजानन म्हणजे गजाचे आहे आनंद म्हणजे तोंड असतो म्हणजे गणपती होय.)

गणेश मंत्र 5

(देवर्षी नारद भगवान गणेश कडे मागणी करतात की हे गणेशा तुझे हे बारा नावे जे भक्त दिवसातून तीन वेळा म्हणजेच त्रिसंध्याच्या वेळेला पठण करतील त्यांच्या जीवनात कोणतेही विघ्न भीती येऊ देऊ नकोस आणि हे प्रभू अशा भक्ताच्या जीवनात सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात. अशी मागणी केलेली आहे.)

गणेश मंत्र 6

( या संकटनाशन संस्कृत श्लोक/ स्तोत्राचे जो व्यक्ती मनःपूर्वक पठण करतो त्याला पुढील लाभ होतात. असे महर्षी नारदांनी सांगितले आहे. ज्याला विद्या मिळवण्याची अपेक्षा आहे त्याला विद्या मिळते, धनाची अपेक्षा असणाऱ्यांना धनाची प्राप्ती होते ,संततीची अपेक्षा असणाराला सद्गुनी संतती प्राप्त होते आणि मोक्षाची अपेक्षा असणाराला मोक्षाची प्राप्ती होते.)

गणेश मंत्र 7

( हे संकटनाशन गणेश स्तोत्र/संस्कृत श्लोक जो पूर्ण श्रद्धेन जप करतो त्याला जप सुरू केल्यापासून पहिल्या सहा महिन्यातच फळ मिळते. आणि वर्षभर सतत जप केल्यास अशा व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते याच्यावर कोणीही संशय धरू नये. असे नारजीने अभिर वचन सदरील संस्कृत श्लोकात दिले आहे)

गणेश मंत्र 8

(हे संकटनाशन स्तोत्र/संस्कृत श्लोक आपण जर आठ ब्रह्मणाला लिहून पाठवले तर असा व्यक्ती विद्यावान होतो. त्याचबरोबर गणेश जी त्याच्यावर कृपादृष्टी करतात. अशा व्यक्तीच्या जीवनात आनंदी आनंद होतो. वरील सर्व गोष्टी प्रसाद स्वरूपाने हे संकटनाशक गणेश स्तोत्र नियमित पठण करणाराला मिळतात असे महर्षी नारदाने ठासून सांगितले आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपणही सदरील गणपतीची बारा नावे असलेले स्तोत्र नित्य नियमाने पठण करावे.)

शिव संस्कृत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply