सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हा कर्म पर संस्कृत श्लोकआहे.
Table of Contents
कर्म पर संस्कृत श्लोक 1
(श्रीमद्भगवद्गीता -३-५) मराठी अर्थ
(प्रकृतीच्या अधिन असलेले सर्व प्राणी , सजीव हे सतत काही ना काही कर्म करत असतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांचे कर्म चालूच असते. कार्य म्हणजेच कर्म. कोणत्याही अवस्थेमध्ये मानवाचे ,प्राण्याचे, सजीवाचे काही ना काही कार्य चालूच असते ते एक क्षणभरही कर्म केल्याशिवाय थांबू शकत नाहीत. असा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मपर उपदेश केला आहे. मनुष्य झोपलेला असेल तरी त्याचा स्वसन चालूच असतो. हृदयाची स्पंदने चालू असतात .शरीरामध्ये चयापचयाच्या क्रिया चालू असतात. सजीव सुसुप्ती अवस्थेत गेला तरी या सर्व क्रिया चालूच असतात आणि स्वप्नामध्ये ही क्रिया चालू असतात. याचा अर्थ मनुष्य कोणत्याही अवस्थेत असला तरी तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही असा कर्म सिद्धांत भगवान श्रीकृष्णाने या श्लोकात सांगितला आहे.)
कर्म पर संस्कृत श्लोक 2
(श्रीमद्भगवद्गीता-२-४७) मराठी अर्थ
(भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम करून संपूर्ण जगाला भगवद्गीते मार्फत कर्म करण्याचा उपदेश केला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्म करण्याचा तुमचा अधिकार आहे पण त्याचे फळ कोणाला ,केव्हा आणि किती मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून हे अर्जुन कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून कर्मावर निष्ठा ठेवून कर्म कर. त्याचबरोबर कर्म न करण्यातही आसक्त होऊ नकोस. पृथ्वीही कर्मभूमी आहे. या भूमीवर कर्म केल्यानंतर. काही कर्माची फळे ही मानवाला तात्काळ मिळतात. काही कर्म फळे मिळण्यासाठी कालावधी जावा लागतो. तर काही कर्माची फळे हे पुढील जन्मामध्ये भोगावि लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे. फळ मिळवण्याचा नाही. म्हणून कर्माच्या फळाची अपेक्षा न करता युद्ध कर.)
कर्म पर संस्कृत श्लोक 3
|श्रीमद्भगवद्गीता-२-५० मराठी अर्थ
(कर्म करण्यात कौशल्य याचा अर्थ योग असा होतो. हे कर्म करत असताना माणसाची बुद्धी समान झाली पाहिजे. म्हणजे त्याने पाप आणि पुण्या दोन्हीचा त्या केला पाहिजे. योग म्हणजे समानता होय. जास्त खाणारा योगी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कमी खाणारा ही योगी होऊ शकत नाही. जास्त झोपणारा योगी होऊ शकत नाही. तसेच काहीच न झोपणारही योगी होऊ शकत नाही. याचा अर्थ योगामध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वर्ज आहे . त्याचबरोबर न्यूनताही वर्ज आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. हे अर्जुना तू कर्म करण्याचं कौशल्य शिकून योगी हो आणि योग करण्यास परावर्त हो.)
कर्म पर संस्कृत श्लोक 4
श्रीमद्भगवद्गीता-३-८ मराठी अर्थ
(माणसाच्या जीवनातील सर्व व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी त्याला काही ना काही कर्म करावेच लागते. आपण जन्माला आल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये, देशांमध्ये, जातीमध्ये, समाजामध्ये, नियतीने आपल्याला काही ना काही कर्तव्य कर्म आलेले असते. त्यालाच शास्त्र विहित कर्म असे म्हणतात .भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात. हे अर्जुना तुझ्या वाट्याला जे शास्त्र विहित कर्म आले आहे. ते युद्धाचे कर्तव्य कर्म कर कारण काहीच कर्म न करण्यापेक्षा आपल्या वाटेला आलेले कर्तव्य कर्म कर. तू जर तुझे कर्तव्य कर्म केले नाही तर तुझा शरीराचा व्यवहार हे चालणार नाही. विद्यार्थी दशांमध्ये विद्यार्थ्याने विद्या ग्रहण करण्याचे कर्म करावे. शेतकरी असतील तर शेती करण्याचे कर्म करावे. नोकरदार असतील तर त्यांनी नियतीने नोकरी करावी. असा महत्वपूर्ण संदेश भगवान श्रीकृष्णाने या कर्मपर श्लोकांमध्ये अर्जुनाला माध्यम ठेवून समाजाला दिला आहे)
प्रेरणादायक संस्कृत श्लोक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कर्म पर संस्कृत श्लोक 5
श्रीमद्भगवद्गीता-३-६ मराठी अर्थ
(सदरील कर्मपर संस्कृत श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने मिथाचारी मनुष्य कोणाला म्हणतात हे सविस्तरपणे सांगितले आहे. मनुष्याला वाक ,हस्त, पाद, उपस्त आणि गुदा हे पाच कर्मेंद्रिय आहेत .तर श्रोत्र ,त्वचा नेत्र ,रसना आणि घ्रान हे पाच ज्ञानेन्द्रिय आहेत . ज्याने ही सर्व इंद्रिय जिंकली आहेत त्याला जितेंद्र असे म्हणतात. परंतु या इंद्रयावर विजय मिळवण्यात तेवढं सोपं नाही. समाजामध्ये बरीचशी माणसं इंद्रिय आपल्या ताब्यात असल्याचा खोटा आव आनतात परंतु मनामध्ये मात्र विषयाचे चिंतन करतात अशा लोकांना मीथ्याचारी मनुष्य म्हणतात.परमार्थातील फळ हे कृतीवर म्हणजेच कर्मावर त्याचबरोबर वृत्तीवर म्हणजेच मनावर अवलंबून असते. बरेचसे लोक इंद्रिय आसक्तिचा त्याग केलेला दाखवतात पण मनाने त्यांचा झालेला नसतो.)
कर्म पर संस्कृत श्लोक 6
(श्रीमद्भगवद्गीता-१२-१२) मराठी अर्थ
(भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्राप्तीची अनेक साधने सांगितले आहेत .परंतु ती साधणे करण्यामध्ये जे असमर्थ आहेत त्यांना सर्व कर्मफलत्याग हे साधन सांगितले आहे . बऱ्याच लोकांना हे साधन कनिष्ठ आहे असे वाटण्याची शक्यता आहे. या शंकेचे निवारण करण्यासाठी भगवंताने सर्व ‘कर्मफलत्याग’ हे साधन कसे श्रेष्ठ आहे हे या कर्मपर श्लोकांमध्ये सांगितले आहे ते म्हणतात अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे. कर्मफलत्याग याचा अर्थ कर्माच्या फलळाच्या इच्छेचा त्याग असा होतो.ज्याने कर्म फलत्याग केला आहे त्याला तात्काळ परम शांती मिळते. म्हणून हे अर्जुना तू कर्मफलत्यागी हो असा संदेश सदरील श्लोकामध्ये दिलेला आहे.)
कर्म पर संस्कृत श्लोक 7
(श्रीमद्भगवद्गीता -१८-१२) मराठी अर्थ
( मनुष्याने केलेल्या कर्माची इष्ट अनिष्ट आणि मिश्र या तीन प्रकारची फळे असतात.’ इष्ट’ म्हणजे मनुष्य ते कर्म करण्यासाठी उत्सुक असणे .उत्सुकतेने केलेल्या कर्माचे फळ इष्ट फळ असते. परंतु काही वेळेला परिस्थितीला हतबल होऊन काही इच्छेविरुद्ध कर्म माणसाला करावी लागतात. त्याने कर्म जरी इच्छेविरुद्ध केले तरी त्याकर्माचे जे फळ भोगावे लागते त्याला ‘अनिष्ट’ फळ असे म्हणतात. जे कर्म करण्या
मध्ये काही इच्छा असते आणि काही परिस्थितीनुसार निर्णय घेऊन कर्म करावी लागतात अशा कर्माचे फळ मिश्र स्वरूपाचे असते. या तिन्ही प्रकारच्या कर्माची फळे माणसाला भोगावीच लागतात. त्याला या जन्मात नाही भोगावे लागले तरी पुढच्या जन्मात, प्रेत योनीमध्ये कर्माची फळे भोगावेच लागतात. परंतु ज्या मानवाने मत्पारायण होऊन म्हणजेच सर्व कर्मफलाचा त्याग करून जर कर्म केले असतील तर त्याला या तिन्ही प्रकारची कर्माचि फळे भोगावी लागत नाहीत. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात’ केले कर्म झाले त तेची भोगा आले’. म्हणजे प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते. परंतु दुस-या एक अभंगांमध्ये तुकोबाराय म्हणतात. ‘तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागू नेदी पाप पुण्य अंगा’याचा अर्थ आम्ही सर्व कर्मफलत्याग केला असल्यामुळे आम्हाला त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. कर्मफलत्याग करणाऱ्याला कोणत्याच प्रकारचे कर्माचे फळ भोगावे लागत नाही हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या श्लोकाद्वारे सांगितले आहे)
कर्म पर संस्कृत श्लोक 8
( श्रीमद् भगवद्गीता- १८-४२) मराठी अर्थ
(भगवान श्रीकृष्णाने या सृष्टीतील मानवाचे कर्मानुसार वर्गीकरण करत असताना चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र असे ते चार प्रकार आहेत. मनुष्य या चार पैकी कोणत्यातरी एका प्रकारामध्ये आपल्या कर्मानुसार मोडत असतो. हे चार प्रकार तो कोणत्या कुळात जन्माला यावर पाडलेले नसून तो काय कर्म करतो यावर भगवान श्रीकृष्णाने पाडलेले आहेत. सदरील श्लोकामध्ये ब्राह्मण या वर्गाचे कर्तव्य कर्म सांगितलेले आहेत. जो ब्रम्ह जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. शम,दम, शौच,क्षातीं, ज्ञान, विज्ञान ,इत्यादी त्याची कर्मे आहेत.
शम:- आपल्याला आवडेल त्या ठिकाणी पाहिजे तेव्हा मन लावता येणे आणि आपल्याला वाटेल तेव्हा त्या ठिकाणावरून मन काढता येणे मनाच्या या मनोनिग्रह वृत्तीस ‘शम’असे म्हणतात.
दम:-आपली ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेंद्रिये एखाद्या कामामध्ये आपल्याला पाहिजे त्यावेळी लावता येणे आणि पाहिजे त्यावेळी तेथून काढता येणे म्हणजेच सर्व इंद्रिय आपल्या इच्छेनुसार चालणे यालाच ‘दम’असे म्हणतात.
तप:- आपल्या स्वधर्माचे पालन करीत असताना आपल्याला काही वेळा कष्ट/दुःख सहन करावे लागतात. असे जीवनात येणारे कष्ट किंवा दुःख यांचा हसत हसत स्वीकार करून वागणे याचे नाव ‘तप ‘आहे .
शौचम्:-जीवनामध्ये सदाचारी वागणे यालाच ‘शौचम्’ असे म्हणतात. यामध्ये शरीर स्वच्छ ठेवणे.मन स्वच्छ ठेवणे. इंद्रियांना वासनाविरहित ठेवणे इत्यादी क्रिया येतात.
क्षान्ति:- एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला किंवा त्रास दिला तरी शिक्षा करण्याची पात्रता असताना ही त्याला क्षमा करणे याचे नाव ‘क्षान्ति’आहे.
आर्जवम्:- मनाचे, शरीराचे,इंद्रियाचे, वाणीचे,इ. व्यवहार विहित असणे . यालाच आर्जवम्असे म्हणतात.
ज्ञान:- वेद,शास्त्र, पुराने ,धार्मिक ग्रंथ ,इतिहास इत्यादीचे अध्ययन करून योग्य प्रकारे माहिती मिळवणे आणि त्यानुसार आचरण करणे. यालाच ‘ज्ञान ‘असे म्हणतात.
विज्ञान:- शास्त्रयुक्त पद्धतीने कोणत्या वेळेला कोणते कर्म केले पाहिजे याची पुर्ण माहिती असणे याला ‘विज्ञान’ असे म्हणतात.
आस्तिक्यम्:- परमात्मा विषयी श्रद्धा असणे. परमात्म्याच्या अस्तित्वाविषयी मनात कोणत्याही प्रकारची शंका नसणे. आणि आपले प्रत्येक कर्म त्याच्या प्राप्तीसाठी करणे याचं नाव ‘आस्तिक्यम् ‘आहे.
योग्य प्रकारे वरील कर्माचे शास्त्रयुक्त पद्धतीने जो आचरण करतो त्याला ब्राह्मण असे संबोधावे. यामध्ये सत्वगुणाची प्रबलता दिसून येते. वरी सांगितलेली सर्व कर्म करणारा कर्माने ब्राह्मण आहे असा महत्त्वाचा संदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून सर्व मानव जातीला दिला आहे.)