You are currently viewing प्रेरणादायक संस्कृत श्लोक

प्रेरणादायक संस्कृत श्लोक

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त  अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हा प्रेरणादायक संस्कृत श्लोक आहे.

विद्या संस्कृत श्लोक पाहण्यासाठी येथे क्लीक करा

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 1

( सदरील प्रेरणादायी श्लोकामध्ये साधूंचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. मनुष्य रस्त्याने चालत असताना चालण्यावर लक्ष नसल्यामुळे केव्हातरी अडखळून पडतोच. तो पडल्यानंतर दुर्जन माणसं त्याला हसतात. त्याचप्रमाणे व्यवहार करत असतानाही नजर चुकीने माणसं कोठे ना कौठे फसतात. अशावेळी त्यांना मदत करायची सोडून दुर्जन व्यक्ती त्याची हेटाळणी करतात. परंतु सज्जन माणसे अशा घसरलेल्या व्यक्तींना त्यामध्ये पुन्हा उभा राहण्याची प्रेरणा देतात)

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 2

(शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा योग्य विकास कशाप्रकारे होतो हे सदरील प्रेरणादायी संस्कृत श्लोकामध्ये कवीने सांगितले आहे. विद्यार्थी ज्या गोष्टीचा अभ्यास करायचे आहे ती गोष्ट वाचतो. तो पाठ पाठ करतो. आणि पाठ झालेलं पुन्हा आठवतो आणि आठवण लिहून काढतो. झालेल्या अभ्यासावर काही शंका असेल म्हणजे प्रश्न असतील तर तो योग्य गुरुजनांना विचारतो. आणि पंडित लोकांच्या म्हणजे ज्ञानी गुरूंच्या आश्रयांना राहतो. अशा विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास आपोआपच होतो ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या प्रेरणादायी श्लोकामध्ये सांगितले आहे. याच्यासाठी कवीने कमळाचे उदाहरण दिलं आहे. रात्र झाली की कमळाच्या पाकळ्या मिटतात परंतु सकाळी सूर्याची किरणे पडली की त्या विकसित होतात. त्याप्रमाणे सज्जनाच्या सहवासामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय राहत नाही)

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 3

(माणसाने शरीरात रोग उत्पन्न झाल्याबरोबर त्याचा नायनाट करावा.त्याचप्रमाणे आपल्या शत्रूचा सुगावा लागताच त्यालाहि नष्ट करावा.असा प्रेरणादायी विचार या संस्कृत श्लोकामध्ये सांगितला आहे. कवी म्हणतो शरीरात रोग उत्पन्न झाल्याबरोबर आणि शत्रू निर्माण झाल्यावर जो त्यांचा नायनाट करत नाही. अशी व्यक्ती कितीही बलवान असले तरी वाढलेल्या रोगाकडून किंवा शत्रू कडून ठार मारली जाते.)

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 4

(एखाद्या कार्याची सिद्धता ही कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. हि सिद्धता त्याने वापरलेल्या  उपकरणावर अवलंबून नसते. बऱ्याच व्यक्ती कार्यामध्ये अपयश आल्यानंतर ते त्यांनी वापरलेल्या साधनाला, उपकरणाला ,परिस्थितीला इत्यादीला दोष देतात. मराठीमध्ये दोन म्हणी आहेत ‘नाचता येईना अंगण वाकडे’ज्याला नाचता येत नाही तो व्यक्ती अंगणाला दोष देतो. आणि दुसरी एक म्हण आहे ‘सुगरणीचे मीठ आळणि ‘स्वयंपाक करता येत नसणारी स्त्री मिठाला म्हणजे साधनाला दोष देते. असे आपल्या नाकर्तेपणाचा दोष बरेच जण साधनावर देतात अशा व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी सदरील प्रेरणादायक संस्कृत श्लोक कवीने लिहिला आहे.

याच लोकांसाठी कवीने सूर्याच्या उदाहरणाद्वारे लोकांना पटवून सांगितले आहे .सूर्याच्या जीवनात अनंत अडचणी आहेत पण त्याची गराणी न करता तो आपले काम चोख करतो.

      रथ चालण्यासाठी किमान दोन चाकाची आवश्यकता असते. पण सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. त्याच्या रथाला सात घोडे असून त्यांना नियंत्रित करण्यासाठी जो लगाम आहे तो सापाचा आहे. रथ चालण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते पण सूर्याचा रथ जमिनीवर चालत नसून त्याचा मार्ग अधांतरीचा म्हणजेच आकाशातील आहे .आणि घोड्याला हाकणारा सारथी पांगळा आहे. अशा सर्व प्रतिकूल परिस्थिती सूर्याच्या जीवनात आहेत .तरीही सूर्य कुठलंही अडचण न सांगता आपले काम नियमित वेळेवर आणि अशक्यप्राय असे अंतर पार करतो.

     कार्य करत असताना मानवाच्या जीवनात अडचणी येतच असतात. त्या अडचणीवर मात करणारी माणसं इतिहास निर्माण करत असतात. इतिहास निर्माण करणारे कधी अडचणी सांगत नाहीत आणि अडचणी सांगणारे कधीही इतिहास निर्माण करू शकत नाहीत . असा महत्वपूर्ण संदेश संपूर्ण मानव जातीला सदरील प्रेरणादायक संस्कृत श्लोकामध्ये कवीने दिला आहे)

प्रेरणादायक संस्कृत श्लोक 5

(जीवन जगत असताना आपल्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहिजे तेव्हा मिळतात. परंतु जीवनात पाच गोष्टी अशा आहेत की त्या कधीच एकदम प्राप्त होत नाहीत. तर त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होतात ही गोष्ट संस्कृत प्रेरणादायी सुभाषित काराणे या श्लोकांमधून सांगितलेले आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे पंथा .पंथा याचा अर्थ वाट. आपणाला इच्छित स्थळे जाण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाने मार्गक्रमण करीत जावे लागते. असे होत नाही की आपल्या मनात आले आणि आपण इच्छित स्थळे पोहोचलो. भारताने चंद्रावर यान पाठवले त्या यानाचा वेग हजारो किलोमीटर प्रति तास असा होता तरीही ते चंद्रावर टप्प्याटप्प्याने गेले. याचा अर्थ मार्गक्रमण करताना क्षणाक्षणाला होते एकदम होत नाही.

        दुसरी गोष्ट म्हणजे कंथा. कंथा याचा अर्थ घोंगडी आहे घोंगडी किंवा वस्त्र विनत असताना ते धाग्या धाग्याने विणले जाते .म्हणजेच प्रत्येक क्षणाला एक धागा असे अनेक धागे मिळून घोंगडी तयार होते.

        संस्कृत सुभाषितकार आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे पर्वताच्या शिखरावर एखाद्या व्यक्तीला पर्वताच्या शिखरावर जायचं असेल तर तो टप्प्याटप्प्याने जातो एकदम पर्वत शिखरावर जाऊ शकत नाही.

         चौथी गोष्ट म्हणजे विद्या. विद्या मिळवताना आपल्याला एका दिवसात प्राप्त होत नाही .ती मिळवण्यासाठी अनेक वर्ष आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतात .आणि त्या कालावधीमध्ये योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्यावे लागते. आता आधुनिक जमाना आहे काम्प्युटरचा जमाना आहे. एका काम्प्युटर मधील स्टोरीज आपणाला पेनड्राईवच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या काम्प्यूटर मध्ये टाकता येते. तसे एका गुरूच्या डोक्यातील ज्ञान शिष्याच्या डोक्यामध्ये एकदम जाण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. विद्या मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट उपलब्ध नाही .म्हणून विद्या एकदम कोणालाही प्राप्त होत नाही तर ती क्षणक्षणाने होते.

          आणि शेवटची पाचवी गोष्ट म्हणजे धन. एकदम धन कोणालाही प्राप्त होत नाही .ते क्रमाप्रमाणे आपल्या केलेल्या कार्यावर धनप्राप्ती अवलंबून असते. पंथा, कंथा, पर्वत शिखरावर, विद्या आणि धन या पाच गोष्टी जीवनामध्ये मानवाला टप्प्याटप्प्यानेच प्राप्त होतात असा प्रेरणादायी विचार सुभाषितकाराने या श्लोकातून दिला आहे.)

Leave a Reply