You are currently viewing लक्ष्मीपूजन Lakshmi Puja : धन, संस्कृती आणि अध्यात्म यांचा दिव्य संगम.

लक्ष्मीपूजन Lakshmi Puja : धन, संस्कृती आणि अध्यात्म यांचा दिव्य संगम.

दीपावली मध्ये Lakshmi Puja लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या दुकानांमध्ये लक्ष्मीची पूजन करतात. आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीला (धनाला) अनन्य साधारण महत्व आहे. ‘ज्याच्याकडे आहे धन त्याला जगामध्ये मान’ अशा अर्थाचा राजा भर्तृहरी ने संस्कृत श्लोक आपल्या नीती शतकामध्ये लिहिला आहे.

दीपावली म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण. या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी संपूर्ण भारतभर घराघरांत महालक्ष्मी देवीचे पूजन करून धन, आरोग्य आणि सुखसमृद्धीची कामना केली जाते.
भारतीय संस्कृतीत लक्ष्मी ही केवळ धनदेवता नसून शुद्ध विचारांची आणि शुभ कृतींची अधिष्ठात्री देवी मानली जाते. म्हणूनच व्यापारी वर्ग, गृहस्थ आणि सर्वसामान्य लोकही या दिवशी आपल्या कार्यातील वस्तू, तिजोरी, रजिस्टर, तराजू आणि घरातील पूजास्थान यांचे विधिवत पूजन करतात.
संस्कृत श्लोकांमध्ये महालक्ष्मीच्या दिव्य रूपाचे आणि तिच्या आशीर्वादाने येणाऱ्या मंगलतेचे वर्णन अत्यंत भावपूर्ण रीतीने केले गेले आहे.

Lakshmi Puja लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि संस्कृत श्लोकातील अध्यात्मिक संदेश

यस्यास्ति वित्तं स नर:  कुलीन:|

स: पंडित: स: श्रुत्वान्  गुणज्ञ:|

स एव वक्ता स च दर्शनीय:|

सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ति:||

या संस्कृत श्लोकाचा अर्थ ज्याच्याकडे धन आहे त्या व्यक्तीला समाज कुलीन समजतो.  धनवान व्यक्तीला समाजातील लोक पंडित म्हणतात. धनवान व्यक्तीला ज्ञानी पण मानतात. धनवान व्यक्तीची कुणीजनामध्ये गणना केली जाते.

तसेच तो जो सांगेल तसे समाजातील जन ऐकत राहते. त्याच्यासारखा वक्ता नाही असे म्हणतात आणि धनवान व्यक्तीच्या दर्शनासाठी लोक आतुर झालेले असतात.

वास्तविक पाहता त्याच्याकडे वरीलपैकी एकही गुण नसला तरी धन असल्यामुळे सर्व गुण त्या धनाच्या आश्रयाने त्या व्यक्तीकडे चिटकून राहतात. 

      यामुळे मनुष्य धन कमावण्याच्या पाठीमागे लागला आहे. धन कमवत असताना ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी’ अशी शिकवण संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगाद्वारे समाजाला देतात म्हणून सर्वच जण धनलक्ष्मीचे उपासक आहेत.

भारतीय संस्कृतीने धनाला लक्ष्मीची उपमा दिलेली आहे. त्यामुळे लक्ष्मी माता पूजनीय आहे. लक्ष्मी मातेला आई समजून या दिवशी सर्व व्यापारी वर्गातील लोक आपल्या दुकानांमध्ये व घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेची महती वैदिक ऋषींनी पुढील संस्कृत श्लोकामध्ये गायलेली आहे.

ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही |

 तन्नो लक्ष्मी प्रचोदयात||

या संस्कृत श्लोकाचा अर्थ, हे लक्ष्मी माते मी आपल्याला जाणतो. आपण विष्णुपत्नी असल्यामुळे आपले मी सतत ध्यान करतो. हे लक्ष्मी माते आपण आमच्या मन व बुद्धीला सतत प्रेरणा द्यावी . 

 Lakshmi Puja लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे. पाटा समोर रांगोळी काढून त्यावर तांदूळ ठेवून तांदळावर वाटे  तबक ठेवावे. त्या तबकात सोने, चांदी, मोती व रुपया ठेवावा. पाटावरती लक्ष्मीचा फोटो ठेवावा.

महालक्ष्मी नमस्तभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरि |

हरिप्रिये  नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ||

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|

शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ||

नमस्तेऽतु महामाये श्रीपीठ सुरपूजते |

शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते||

वरील संस्कृत श्लोक (मंत्र) म्हणून श्रीलक्ष्मी मातेची पूजा करावी. आपल्या स्वव्यवसायातील वस्तू जसे की तराजू, तिजोरी, दुकानातील गल्ला, वजन काटा, कम्प्युटर, रजिस्टर इत्यादीची पूजा करावी.व्यवसायातील व्यवसायातील वस्तूची पूजा करताना, 

नमस्ते सर्व देवानां शक्तित्वे सत्यमाश्वता | 

साक्षिभूता जगद्धात्री निर्मिता विघयोन्ना ||

 हा  संस्कृत श्लोक म्हणून पूजन करावे. व्यवसायातील नोंदी ठेवण्यासाठी नवीन रजिस्टर किंवा वही पूजन करावे. या वहीवर कुंकवाने पहिल्या पानावर स्वस्तिक चे चिन्ह काढावे. नंतर त्या वहीचे लक्ष्मी सोबत पूजन Lakshmi Puja करावे. 

 या दिवशी प्रसाद म्हणून खोबरे, साळीच्या लाह्या, बत्ताशे, साखर, फुटाणे  मिठाई, पूर्ण जेवण प्रसाद, धने, केळी गोड अशी फळे असावीत.

Leave a Reply