navratri 2025 शारदीय नवरात्र हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि भक्तिमय उत्सव मानला जातो. या काळात देवी दुर्गेची उपासना, स्तोत्रपठण आणि जागरण केले जाते. “सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके” हा श्लोक दुर्गा सप्तशतीत आढळतो आणि देवीची महिमा व तिची सर्वशक्तिमान रूपे यांचे वर्णन करतो. हा श्लोक अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्राच्या जपाने शांती, यश आणि भक्ताचे सर्व मंगल कार्य सिद्ध होतात अशी श्रद्धा आहे. नवरात्राच्या काळात या श्लोकाचे पठण केल्याने साधकाला देवीची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
Table of Contents
(navratri 2025) विशेष देवी स्तुती
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
सदरील संस्कृत श्लोक हा श्री दुर्गा सप्तशती यातील असून या संस्कृत श्लोकांमध्ये देवीचे वर्णन केलेले आहे. हा श्लोक देवीचा मंत्र म्हणून वापरला जातो . हा संस्कृत श्लोक दुर्गादेवीला समर्पित असून तो अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचे पठण अनेक शुभकार्याच्या वेळी केले जाते. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास शांती यश आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.या संस्कृत श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे करता येईल.
सर्व मांगल्याच्या प्रतीकांना शुभ करणाऱ्या हे आई तू सर्व भक्ताचे कल्याण करणारी आहेस. हे गौरी माता तू आपल्या नेत्राने सर्वावर कृपेचा वर्षाव करणारी असल्याने मी आपणाला शरण आलो आहे. हे नारायणी माते आपल्या चरणी माझा नमस्कार असो.
दिनांक 22/ 9/ 2025 (navratri 2025) पासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते. हा उत्सव माता दुर्गेच्या सन्मानासाठी केला जाणारा उत्सव आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रीचा समूह होय.शरद ऋतू मध्ये येणाऱ्या आश्विन महिन्यात प्रतिपदेला या उत्सवाची सुरुवात होते.
या उत्सवाबाबत पुराणांमध्ये एक प्रसिद्ध कथा सांगितलेले आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस तपश्चर्या करून देवाकडून वर घेऊ अत्यंत प्रभावशाली बनला होता. तो या वराच्या बळावर अनेक देवतांना तसेच मनुष्यांना अत्यंत त्रास देत होता. त्याच्या या त्रासातून मुक्त होण्यासाठी देवतांनी देवीची आराधना केली. तेव्हा देवी प्रगट झाली. सर्व देवतांनी देवीचा जयजयकार केला. पूजन केले आणि सर्वानीं स्वतःची दिव्य शस्त्रे दिली.
या देवीने नऊ दिवस अविरत महिषासुराबरोबर युद्ध केले आणि महिषासुरांना समाप्त केले. तेव्हापासून असुरी वृत्तीवर मिळवण्यासाठी जगदंबा देवीची भक्तगण प्रार्थना करतात.असुर या शब्दाचा अर्थ ‘असुषु रमन्ते इति असुर: ‘असा घेतला जातो. जो स्वतःच्याच भोगात रममान होतो त्याला असुर असे म्हणतात.
महिष या शब्दाचा अर्थ रेडा असा होतो. रेडा नेहमी आपले स्वतःचे हित पाहतो. समाजामध्ये असे अनेक महिषासुर आहेत जे दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःचे हित पाहतात. अशा वृत्तीच्या लोकांचा नायनाट करण्यासाठी माता जगदंबा सज्जनांना शक्ती प्रधान करते. ती शक्ती या नवरात्र काळामध्ये भक्ती करतात त्या भक्तांना प्रधान करते.
या विषयी माहिती आपल्याला अनेक संतांच्या अभंगामधून पाहायला मिळते. संत एकनाथ महाराज म्हणतात.
अनादि निर्गुण प्रकटली भवानी |
मोहमहिषासुर मर्दना लागुनी| त्रिविधतापाची कराया झाडणी |
भक्तालागोनी पावशी निर्वाणी||
विष्णूच्या भक्ताला वैष्णव, महादेवाच्या भक्ताला शैव आणि देवीच्या भक्ताला शाप्त असे म्हणतात.वैष्णवांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. शैवाच्या गळ्यामध्ये शिवलिंग(रुद्राक्ष) असते तसे शाप्तांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जिजाऊंनी कवडीची माळ घातली होती.छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंना देवी समजून त्यांची उपासना करीत होते. त्यामुळे जिजाऊने त्यांना सर्व प्रकारचे शक्ती प्रधान केले होते. तसेच ते मा जगदंबेचेही उपासक होते. नवरात्रीच्या काळामध्ये देवीसमोर नंदादीप लावतात. घट बसवतात. आराधी गाणी, गोंधळ, जोगवा,इ. उपासनेचे उपक्रम राबवले जातात.
संत एकनाथ महाराज म्हणतात.
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा |
भक्ति करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा |
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा |
दंभ सासरा सांडिन कुपात्रा ||
संत एकनाथ
गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी |
आमचा घालावा गोंधळ वासुदेव नाव संभळ|
काम क्रोध बकरा मारा पूजा रुक्माईच्या वरा|
जेथे विठोचे राऊळ तेथे तुकयाचा गोंधळ||संत तुकोबाराय
ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिण्याची शक्ती संत ज्ञानेश्वर महाराज अंबिका माते कडे मागतात. ते म्हणतात.
म्हणून आंबे श्रीमंते | निजाजनकल्पाते |
आज्ञापि माते |ग्रंथ निरुपणे |संत ज्ञानेश्वर महाराज
जगदंब देवीची पूजा या नवरात्रीमध्ये विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने केली जाते. त्यामध्ये जगदंबा, तुळजाभवानी, रेणुका, सप्तशृंगी, येडेश्वरी, सटवाई देवी, महालक्ष्मी, शैलपुत्री, ब्रह्मचारीणी ,चंद्रघण्टा,चंडिका कूष्माण्डा कात्यायनी,कालरात्री,गौरी, नावाने जयजयकार केला जातो.
नवरात्रीमध्ये (navratri 2025) वरील मंत्रासोबतच या मंत्राचा आहे उच्चार केला जातो.
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विचै |