You are currently viewing Teacher Day Special: संस्कृत श्लोक  on Guru’s Greatness | Teacher Day Quotes in Sanskrit Shloka

Teacher Day Special: संस्कृत श्लोक on Guru’s Greatness | Teacher Day Quotes in Sanskrit Shloka

Teacher Day Sanskrit Shloka Special शिक्षक दिना संस्कृत श्लोक on Guru’s Greatness | Teacher Day Quotes in Sanskrit निमित्त आपण संस्कृत श्लोकातून गुरूंच्या महानतेचा विचार करूया. या श्लोकात गुरूंचे गुण सांगितले

शिक्षक दिन विशेष – गुरुचे संस्कृत श्लोक व अर्थ Teacher Day Sanskrit Shlok

सदवर्तनं च विद्वत्ता तथाध्यापन कौशल्यम् |
शिष्यप्रियत्वंमेतद्धि गुरोर्गुण चतुष्टयम् ||

    5 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये ‘शिक्षक दिन’ Teacher Day म्हणून साजरा केला जातो.हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनातील 40 वर्ष शिक्षकांचे काम केले.

एक आदर्श शिक्षक, आदर्श नेता, आदर्श विचारक, एक आदर्श राष्ट्रपती, इ. अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. त्यांचे शिक्षणाविषयी असलेले प्रेम, विद्वत्ता आणि देश सेवा याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.

या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जातो. राज्यस्तरावर देखील हा पुरस्कार दिला जातो.

आदर्श शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे वरील संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार द्यावा तसे जीवन घडते.

मानवाच्या जीवनामध्ये आई-वडिलांच्या नंतर जे महत्त्वाचे स्थान आहे ते गुरूंचे आहे. पूर्वी आई वडील आपला मुलगा सुशिक्षित आणि सुसंस्कारित व्हावा याच्यासाठी ते आपल्या मुलाला गुरूच्या घरी पाठवत असत.

गुरूंचे आश्रम वनामध्ये असत. कालांतराने या प्रणालीचे शाळेमध्ये रूपांतर झाले आणि त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांचे नियोजन केले. गुरुला पर्यायी शब्द शिक्षक हा आहे. परंतु तो गुरुला तंतोतंत पर्यायी असा शब्द नाही.

कारण शिक्षक हे आपल्या शाळेतील त्यांना नेमून दिलेला पाठ्यपुस्तकातील विषय शिकवतात. समाजकारण आणि संस्कार यामध्ये मोडत नाहीत. गुरु अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच सामाजिक व संस्काराचे शिक्षण हे गुरु देतात.

शिक्षकांना ते ते पाठ्यपुस्तकासारखे बंधनकारक नाही.या गुरूंच्या म्हणजेच पर्यायी शिक्षकांच्या अंगी वरील चार गुण असणे आवश्यक आहे . त्यातील पहिला गुण म्हणजे सदवर्तन. सद म्हणजे चांगले होय.

वर्तन म्हणजे वागणूक. शिक्षकाकडे पहिला गुण म्हणजे त्यांची वर्तणूक चांगली असली पाहिजे. अलीकडे काही शिक्षकांमध्ये या गुणाची कमतरता दिसून येते. शिक्षकाच्या अंगी आवश्यक असणारा दुसरा गुण म्हणजेच विद्वत्ता होय शिक्षक हा प्रचंड विद्वान असला पाहिजे.

कारण शिष्याच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता त्याच्या अंगे असली पाहिजे. ही क्षमता विद्वत्तेने प्राप्त होते. शिक्षकाच्या अंगी हवा असलेला तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांना अध्यापन कौशल्य चांगले आले पाहिजे.

अध्यापन कौशल्य अंगी नसेल तर ते आपला विषय विद्यार्थ्यांच्या पुढे प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. शिक्षकाच्या अंगी चौथा महत्त्वाचा गुण म्हणजे ते सर्व विद्यार्थ्यांना प्रिय असले पाहिजेत.

दारिद्र्य-दुःखदहन स्तोत्र (daridra dahan shiv stotra) श्री शंकराची कृपा मिळवणारे भक्तिपूर्ण श्लोक.

गुरुणा शोभते शिष्य: शिष्येणापि गुरुस्तथा |
उभाभ्यां शोभते शाला शालया शोभते पुरम् ||

वरील संस्कृत श्लोकामध्ये गुरुजी आणि शिष्याचे महत्त्व सांगितलेले आहे. गुरूमुळे शिष्य पाहिजे ते उद्दिष्ट पूर्ण करू शकतात. चांगले शिष्य लाभणे हे गुरूंसाठी भूषण आहे. त्याचबरोबर चांगल्या शिष्यांना ही योग्य गुरू मिळणे हे त्यांचे भूषण आहे.

गुरुमुळे शिष्याची तर शिष्यामुळे गुरूंचे शोभा वाढते. या दोघांमुळे शाळेचे महत्त्व वाढते. असे आदर्श गुरु, आदर्श शिष्य ज्या शाळेमध्ये आहेत आणि ती शाळा ज्या गावांमध्ये आहे त्या गावाचे देखील महत्त्व वाढते.

सुन्दरोऽपि सुशिलोऽपि कुलीनोऽपि महाधन:|
शोभते न विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम् ||

वरील संस्कृत श्लोकामध्ये भाषेतकार म्हणतात.मनुष्य कितीही सुंदर असला, कितीही सुशील असला, मोठ्या कुळात जन्मलेला असला किंवा अतिशय धनवान असला तरी तो विद्ये शिवाय शोभत नाही.

म्हणून विद्या हे माणसाचे सर्वोच्च भुषण आहे. आणि गुरु शिवाय विद्या मिळत नाही संत ज्ञानेश्वर म्हणतात ‘गुरु तेथ ज्ञान’.पुस्तकात असलेले ज्ञान मस्तकात घालण्याचे कार्य गुरुजीच करू शकतात.
एक आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी गुरुजींचा मोलाचा वाटा असतो. एखादा इंजिनीयर उत्कृष्ट नसेल तर काही बिल्डिंग खराब होतील, एखादा डॉक्टर उत्कृष्ट नसेल तर काही लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, एखादा वकील उत्कृष्ट नसेल तर काही लोकांवर अन्याय होईल पण जेव्हा एकदा शिक्षक उत्कृष्ट नसेल तेव्हा राष्ट्रातील अनेक युवकांचे जीवन बिघडेल.

म्हणून शिक्षकांनी आपल्या जीवनात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श मानून कार्य करावे. संत तुकडोजी महाराज शिक्षकाकडून खालील अपेक्षा व्यक्त करतात.
गुरुजनी ऐसे द्यावेत धडे |आपला आदर्श ठेवोनी पुढे |विद्यार्थी तयार होता चहुकडे | राष्ट्र होईल तेजस्वी|
संत तुकडोजी महाराज
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आरोग्यासाठी Surya Mantra

Leave a Reply