You are currently viewing दारिद्र्य-दुःखदहन स्तोत्र (daridra dahan shiv stotra) श्री शंकराची कृपा मिळवणारे भक्तिपूर्ण श्लोक.

दारिद्र्य-दुःखदहन स्तोत्र (daridra dahan shiv stotra) श्री शंकराची कृपा मिळवणारे भक्तिपूर्ण श्लोक.

 दारिद्र्य- दुःखदहन शिवस्तोत्रम् || daridra dahan shiv stotra

कलियुगामध्ये अनेक लोकांना दारिद्र्याला सामोरे जावे लागते. ते नेहमी या दारिद्र्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक प्रयत्न करूनही ज्यांना यश मिळत नाही. त्यांनी नित्य, नित्य नाही जमल्यास सोमवारी आणि शिवरात्री दिवशी हे दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र तीन वेळा पठण करावे. असे केल्यास वशिष्ठ ऋषी सांगतात त्यांच्या दारिद्र्याचा तात्काळ नाश होतो. असे स्तोत्र आपल्या सेवेत देत आहे.

दारिद्र्य- दुःखदहन शिवस्तोत्रम् || daridra dahan shiv stotra

विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय | 

कर्पुरकांतिधवलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||१||

महर्षी वशिष्ठ आपल्या या दुःख दारिद्र्य दहन स्तोत्र (daridra dahan shiv stotra) मध्ये भगवान शंकराची यथार्थ स्तुती करतात. ते म्हणतात हे भगवान शंकर आपण विश्वाचे ईश्वर आहात आपण नरक रूपी समुद्रातून मानवाला तारणारे आहात. आपला नामाचा जयघोष अमृताप्रमाणे गोड आहे.आपण आपल्या डोक्यावर चंद्रकोर धारण केलेले आहे. आपल्या शरीराची कांती म्हणजे त्वचा कापराप्रमाणे पांढरे शुभ्र आहे. डोक्यावर जटा धरण केलेल्या आहेत. सर्वांचे दुःख दारिद्र्य दहन करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालांतकाय भुजंगाधिपकंकनाय |

गंगाधराय गजराजविमर्दनाय  दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||२||

आपण गौरीचे प्रिय आहात. आपण डोक्यावरती चंद्राची कोर धारण केलेले आहे. आपण कालाचे हे काल आहात म्हणून आपल्याला महाकाल म्हटले जाते. भुजंगासारख्या पशु प्राण्यांना  आश्रय देणाऱ्या सर्पाचे कंकण परिधान केलेल्या, आपल्या जेटेमध्ये गंगेला धारण केलेल्या, गजराजाचे मर्दन करणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

भक्ती प्रियाय भवरोगभययापहाय उग्राय दुर्गभवसागरतारनाय | 

ज्योतिरमयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||३||

 आपल्याला भक्त आणि त्यांची भक्ती अत्यंत प्रिय आहे. तसेच आपण सर्व भवरोगाचे नाश करणारे आहात. दुष्टांचा संहार करताना आपले अतिशय उग्र रूप धारण करतात आणि दुर्गम असा संसार रुपी समुद्र तारण तारणाऱ्या, आपल्या नावाप्रमाणेच आणि गुणाप्रमाणे सुंदर असं नृत्य करणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

चर्मांबराय भवभस्मविलेपनाय भालेरक्षणाय मणिकुंडलमंडीताय |

मंजीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||४||

वाघाचे कातड्याचे वस्त्र धारण करणाऱ्या, चिता भस्माचे अंगाला विलेपन करणाऱ्या, कपाळावर तिसरा नेत्र असणाऱ्या, गळ्यामध्ये मन्याची माळ आणि कुंडले प्रधान करणाऱ्या, आपल्या पायामध्ये नुपूर घालणाऱ्या , शरीरावर जटाधारण करणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

पंचाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमंडिताय | 

आनंदभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय||५||

हे पाच फणीचा नागाचे भुषण धारण  करणाऱ्या शंकरा,  आपण त्रिभुनामध्ये म्हणजेच स्वर्ग मृत्यू आणि पातळामध्ये ज्यांनी आनंद भूमीला म्हणजेच काशीला वरदान देऊन नंदनवन केलं, सुवर्णाप्रमाणे तेज निर्माण करणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

भानुप्रियाय भवसागरतारणाय कालांतकाय कमलासन पूजिताय |

 नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय||६||

सूर्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या, भवसागरातून तारुण नेणाऱ्या, ज्यांची पूजा ब्रह्मदेव नित्त करतात ,हे त्रिनेत्र धारी,  सर्व प्रकारचे शुभ लक्षण धारण करणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

रामप्रियाय रघुनाथवरप्रधाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय |

पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||७||

प्रभू रामचंद्रांच्या प्रियनाथा आपण प्रभू रामचंद्रांना रावणाबरोबर सुद्धा मध्ये विजय होण्याचा आपण वर देणार्या, आपण सर्व नाग लोकांना प्रिय आहात, आपल्या भक्तांना नरक रूपी सागरातून सहज पार करणाऱ्या,  आपण सर्व पुण्यवंतामध्ये पुण्यवान आहात, म्हणून सर्व देवता, देव आपली मनोभावे पूजा करतात, आशा हे सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीताप्रियाय वृषभेश्वरवाहनाय |

मातंगचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ||८||

हे  भक्तजनांना मुक्ती रुपी फळ देणाऱ्या, गणेशाचे ईश्वर असणाऱ्या, ज्यांना गीत अतिशय प्रिय आहे आणि ज्यांचं वाहन नंदी आहे, गजाचे चर्म परिधान केलेले आहे अशा हे महान ईश्वरा आणि सर्वांचे दुःख दारिद्र्य करणाऱ्या हे शंभू तुम्हाला माझा नमस्कार असो.

वशिष्ठ्येन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम् सर्वसंपत्करम् शीघ्र  |

पुत्रपौत्रादिवर्धनम् त्रिसंध्यं य: पठेन्नित्यं स: ही स्वर्गमवाप्नुयात् ||९||

 वशिष्ठ ऋषींनी रचना केलेल्या या दुःख दारिद्र्य नाश स्तोत्राचे जे पठण करतात. त्यांचे सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतात. त्यांनी मनामध्ये घेतलेले सर्व प्रकारचे संकल्प लवकरात लवकर पूर्ण होतात. मुला बाळांच्या जीवनामध्ये भरभराटी येते. असे भक्त शेवटी स्वर्गला प्राप्त होतात.

इति श्रीवसिष्ठविरचितं (daridra dahan shiv stotra) दारिद्र्यदहन शिव स्तोत्रम संपूर्ण |

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave a Reply