You are currently viewing विद्या संस्कृत श्लोक

विद्या संस्कृत श्लोक

सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त  अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हा विद्या संस्कृत श्लोक आहे.

विद्या संस्कृत श्लोक 1

(सरळ अर्थ:-विद्येमुळे माणसाचे सौंदर्य अधिक खुलते किंवा वाढते. विद्या आहे माणसाचे गुप्त आणि जागृत धन आहे. विद्यावान माणसाला यश कीर्ती आणि सर्व प्रकारचे भोग मिळतात. विद्या ही सर्व गुरूंची ही गुरु आहे. विद्या आहे परदेशामध्ये नातेवाईकाप्रमाणे सतत पाठीशी राहते. विद्याही देवांची ही देवता आहे. राजाच्या दरबारामध्ये धनवनाला किंमत नसून विद्यावानाला किंमत असते आणि वृद्धेश्वर मनुष्य म्हणजे तो साक्षात पशुच असतो. या रीतीने विद्येचे महत्त्व सदरील सश्लोकामध्ये सांगितलेले आहे.

विद्या संस्कृत श्लोक 2

अध्याय चौथा श्लोक चौथीसावा) सरळ अर्थ ज्याला ज्ञान मिळवायचे आहे, त्याने ज्ञानी माणसाकडे जाऊन, त्यांना साष्टांग दंडवत करून, सेवा करून ,प्रश्न विचारावा .प्रश्न विचारल्यानंतर ती ज्ञानी पुरुष तुम्हाला उपदेश करतील.) भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माध्यम करून पूर्ण जगाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात. उपदेश करत असताना श्रीकृष्णाने अभ्यास करून ज्ञान कसे प्राप्त करता येईल सदरील श्लोकामध्ये सांगितले आहे. मनुष्याला दैनंदिन जीवनापासून ते अगदी मोक्षापर्यंत ज्ञानाची आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये तसेच संत परंपरेमध्ये मोक्षाला फार महत्त्व आहे आणि हा मोक्ष फक्त ज्ञानानेच मिळू शकतो.ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत या न्यायाने मोक्ष मिळवायचा असेल तरी ज्ञान लागतेच. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात ज्ञाने विनमोक्ष नाही हा शिधांत म्हणजे माणसाला मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि दैनंदिन जीवनात जगत असताना व्यवहार करण्यासाठी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता आहे.

विद्यार्थी दशेमध्ये तर या गोष्टीची फार आवश्यकता आहे. ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायऱ्या म्हणजे स्टेप भगवान श्रीकृष्णाने विद्यार्थी दशेतील पूर्ण जगाला उपदेश केला आहे. आपण जे शिकतो त्याला माहिती मिळवणे असे म्हणता येईल परंतु ही घेतलेली माहिती जेव्हा आपण व्यवहारांमध्ये उपयोग आला आणतो तेव्हा ते ज्ञान होईल.

उदा:-पाचचा पाढा पाठ केला म्हणजे आपण पाच या अंकाच्या पटीची माहिती मिळवली आणि त्याचा उपयोग व्यवहारात केला तर ते आपलं ज्ञान झालं. ज्ञान मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पुढील पायऱ्या सांगितल्या आहेत. एक गत्वा ,दोन नत्वा आणि तीन दत्वा.

गत्वा: गत्वा म्हणजे जाणे. आपल्याला ज्या गोष्टी बद्दल माहिती किंवा ज्ञान घ्यायचेआहे. त्या गोष्टीबद्दल ज्याला माहिती आहे. त्यानां गुरु माणून आपण त्यांच्याकडे जावे. त्यांना आपल्याकडे बोलाऊ नये. ग्रंथात पाहिलं तर भगवान श्रीकृष्णसुद्धा सांदीपानी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेण्यासाठी गेले होते. आणि भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा विश्व मित्राकडे विद्या शिकण्यासाठी गेले होते.

प्रभुराम चंद्राचे वडील राजा दशरथ आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेही गुरु घरी आणू शकत होते. परंतु तसे शास्त्र नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाच गुरुकडे पाठवले. या न्यायाने आपल्याला जे ज्ञान घ्यायचे आहे त्या गुरु कडे आपणाला ही जावे लागते. ज्ञान घेण्यातली ही पहिली पायरी आहे.

नत्वा: नत्वा म्हणजे लऊन नमस्कार करणे होय. नमस्कार केल्याने माणसाचा अहंकार निघून जातो. आणि त्या व्यक्तीमध्ये विनय येतो. विनय आल्याशिवाय विद्या शोभत नाही. शास्त्रकार म्हणतात विद्या विनय न शोभते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ‘गुरुतेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्षण’ या न्यायाने गुरुकडील ज्ञान आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला नम्र व्हावे लागते म्हणून पहीली पायरी नत्वा हीच गोष्ट भगवान श्रीकृष्ण आपल्याला याच लोकाद्वारे सांगतात. ते म्हणतात तत विधी म्हणजे तो जाणारा व्यक्ती म्हणजेच गुरु त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे म्हणजे दंडवत करणे होय. या दोन पायऱ्या भगवान श्रीकृष्ण याच श्लोकाद्वारे सांगतात.

नमस्कार किंवा दंडवत केल्यानंतर त्यांना आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारल्यानंतर आपण जे प्रश्न विचारू त्या गोष्टीचे ते निश्चितच निराकरण करतात. त्यांनी केलेल्या निराकरण म्हणजेच त्यांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये उतरावा. या रीतीने आपण आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. असा अनमोल असा संदेश भगवान श्रीकृष्ण आपल्याला या श्लोकाद्वारे देतात.

दत्वा:-दत्वा म्हणजे देऊन याचा अर्थ असा कीआपण ज्या गुरूकडून ज्ञान घेतले त्यांना गुरुदक्षिण म्हणून योग्य तो मोबदला द्यावा.

विद्या संस्कृत श्लोक 3

(जीवन जगत असताना अतिशय अनमोल असा संदेश सदरील विद्या संस्कृत श्लोकामध्ये सुभाषितकाराने दिला आहे. विद्या मिळवणे ही अखंड सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे .या प्रक्रियेमध्ये शॉर्टकट म्हणजे जवळचा मार्ग नसतो.

विद्या घेण्यासाठी प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो तेव्हाच विद्या मिळते. मिळालेल्या वेळेचा दुरुपयोग केला तर त्या माणसाला विद्या मिळत नाही. त्याचप्रमाणे धनाच्या बाबतीतही हा नियम लागू होतो .ज्यांना धन मिळवायचेआहे. त्यांनी कणाकणाने म्हणजे पैशाला पैसा जोडून धन जमा करावे. जो व्यक्ती व्यर्थ पैसे खर्च करतो किंवा धन खर्च करतो त्याच्याकडे धन जमा होत नाही.)

विद्या संस्कृत श्लोक 4

(दुर्जन माणसे आणि सज्जन माणसे कशी ओळखावेत ते सदरील विद्या संस्कृत श्लोकामध्ये सुभाषितकाराने सांगितले आहे. आपल्या जीवनात सज्जन लोकही विद्या घेतात आणि दुर्जनही विद्या घेतात पण दोघे त्या विद्येचा उपयोग वेगवेगळे प्रकारे करतात.दुर्जन लोक आपल्या विद्येचा उपयोग समाजातील इतर लोकांशी वितांड भांडण करण्यासाठी करतात. धनाचा उपयोग इतरांना श्रीमंतीचा गर्व दाखवण्यासाठी आणि शक्तीचा उपयोग दिन व दुर्बळ यांना छळण्यासाठी करतात.

याउलट सज्जन माणसे आपल्या विद्येचा उपयोग दुसऱ्यांना शिकवण्यासाठी आपण मिळवलेल्या पैशाचा उपयोग दानधर्मासाठी आणि मिळालेल्या शक्तीचा उपयोग दुर्बोळांचं रक्षण करण्यासाठी करतात. जे लोक आपल्या विद्येचा उपयोग चांगल्या सम कामासाठी करतात त्यांना सज्जन म्हणावे आणि ते जर विद्येचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी उपयोग करत असतील त्यांना दुर्जन संबोधावे.)

विद्या संस्कृत श्लोक 5

(आपण कधीही मरणार नाहीत म्हणजेच आपण अजरामर आहोत असे मानून माणसाने विद्या आणि धन म्हणजेच अर्थ मिळवावा आणि आपण लगेच म्हणजे आता काही क्षणात मरणार आहोत असे समजून धर्माचरण करावे. विद्या आणि धन कमवताना माणसाने जीव तोडून कमवावे .आणि खर्च करताना मग ते विद्या असो अथवा धन असो ते चांगल्या कामांमध्ये तात्काळ खर्च करावे. असा अनमोल असा संदेश या विद्या संस्कृत श्लोकामध्ये सुभाषित कारणे आपल्याला दिला आहे)

विद्या संस्कृत श्लोक 6

( माणसाने जीवनात कोणत्या वयामध्ये काय करावे हे प्रस्तुत विद्या संस्कृत श्लोकामध्ये सुभाषितकाराणे सांगितले आहे. एखादा मनुष्य शंभर वर्षे जगत असेल तर त्याच्या जीवनाचे 25 25 वर्षाचे चार विभाग असतात. प्रत्येकाने आपल्या वयाच्या प्रथम विभाग म्हणजेच पंचवीस वर्षापर्यंत विद्यासंपादन करावी .दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 ते 50 या वयोगटामध्ये विद्येच्या बळावर धनसंचय करावा आणि 51 ते 75 या वयोगटामध्ये त्याने आलेल्या धनाचा उपयोग करून पुण्य कमवावे. जीवनातील या गोष्टी जर वेळच्यावेळी नाही केल्या तर चौथ्या टप्प्यात म्हणजे 76 ते 100 या वयामध्ये सदरील व्यक्ती काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे योग्य वयामध्ये आपण विद्या, धन आणि पुण्य कमवावे या टप्प्यालाच साधुसंत आश्रम असे म्हणतात.)

विद्या संस्कृत श्लोक 7

(आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणा-याला आपण मित्र म्हणतो. आपल्या जीवनात आपल्याला अनेक मित्र मिळतात/असतात. त्यापैकी आपल्याला कोणता मित्र कोठे कामाला येतो हे विद्या संस्कृत लोकांमध्ये सदरील सुभाषितकारणे  सांगितले आहे. माणसाचा प्रवासामध्ये विद्या ही मित्र किंवा मैत्रीण असते. घरामध्ये त्याचा /तिचा मित्र किंवा मैत्रीण ही पत्नी /पती असते /असतो. आजारी माणसासाठी औषध हेच त्याचा मित्र किंवा सखा असते. मेलेल्या माणसासाठी धर्म हा त्याचा मित्र असतो.)

विद्या संस्कृत श्लोक 8

(मानवाच्या जीवनामध्ये विद्या कशी मिळवली जाते याचं संपूर्ण विश्लेषण सदरील  विद्या संस्कृत श्लोकामध्ये केलेले आहे. विद्या मिळवण्याचा पहिला मार्ग म्हणजे गुरुच्या मुखातून ऐकणे. विद्या मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ज्याच्याकडे विद्या आहे त्याला भरपूर धन देऊन त्याला आपल्याला विद्या द्यायला परवर्त करणे. विद्या मिळवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे विद्यावान माणसाबरोबर आपण चर्चा करून मिळवणे. हे तीन मार्ग सोडून इतर चौथा कुठलाही मार्ग विद्या मिळवण्यासाठी उपलब्ध नाही असे सुभाषितकार सांगतात.)

 विद्या संस्कृत श्लोक 9

(विद्या हेच मानवाचे सर्वात मोठे अभूषण म्हणजेच दागिनाआहे. हे पटवून देण्यासाठी विद्या संस्कृत सुभाषितकाराणे वरील श्लोक लिहिला आहे. ते म्हणतात आईसारखं या शरीराचं भरण पोषण करणारा या जगतामध्ये दुसरं कोणी नाही. चिंते सारखं या शरीराला शोषण करणारे दुसरे कोणी नाही. माणसाला चिता ही जीवनात एकदाच जळते पण चिंता त्याला रोज जाळत असते. पत्नी सारखं या शरीराचे लाड करणारा दुसरा कोणी नाही. आणि मानवी शरीराला विद्येने जेवढं सौंदर्य प्राप्त होते तेवढे कशानच होत नाही . असे सांगून विद्येचे महत्त्व सुभाषितकाराने वाढवले आहे.)

विद्या संस्कृत श्लोक 10

( विद्यावान मनुष्य जर दुर्जन असेल तर त्याचा सर्वांनी त्या करावा. मग तो कितीही विद्वान असो. कर एखादा नागमणी धारी साप सर असेल तर तो साप विषारी नाही असे होत नाही. विषारी साप मानवाला कधी ना कधी डसल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे विद्यावान माणूस असेल आणि दुर्जन असेल तर तो त्रास दिल्याशिवाय नक्कीच राहत नाही. संतश्रेष्ठ तुकोबाराय याविषयी सांगत असताना सांगतात. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. मधमाशीच्या प्रच्छे म्हणजे शेवटी मध्ये विष असते, सापाच्या दातांमध्ये विष असते परंतु दूरजनाचे सर्वांग हे विषारी असते. हे आपणाला सदरील विद्या श्लोकामध्ये श्लोककर्त्याने पटवून दिले आहे.)

विद्या संस्कृत श्लोक 11

(विद्येचे महत्त्व सांगणारा हा संस्कृत श्लोक आहे. याचा अर्थ सुखाची अपेक्षा असणाराणे विद्येचा त्याग करावा. कारण विद्या घेण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते . रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. असे केले तरच विद्या प्राप्त होते.आणि त्यामध्ये वेळही भरपूर जातो. एका दिवसात मनुष्य धनवान होऊ शकतो परंतु विद्यावान होऊ शकत नाही . त्यामुळे विद्येची अपेक्षा असणाराने सुखाचा त्याग करावा. सुखी माणसाला विद्या कुठून मिळणार म्हणजे मिळत नाही आणि विद्या घेणाऱ्याला सुख कुठून मिळणार म्हणजे परिश्रमामुळे सुख मिळत नाही.)

विद्या संस्कृत श्लोक 12

(सरळ अर्थ विद्येची चोरी चोरीला करता येत नाही. इतर धन तुम्ही कोठेही ठेवा , त्याची चोरी होण्याची शक्यता असते . घरात ठेवलं तर घरातून सुद्धा चोरी होते .बँकेत ठेवलं तर बँकेवर सुद्धा दरोडा पडतो. अलीकडील काळात तर सायबर दरोडे सुद्धा पडू लागले आहेत. परंतु विद्या धनाची चोरी करता येत नाही. जर चोरी झाली असती तर त्याचा सर्वात जास्त फटका कीर्तनकार आणि शिक्षक यांना बसला असता.

कीर्तनकार म्हटले असते माझे कालपर्यंत भरपूर अभंग पाठ होते पण रात्री माझ्या बुद्धीवर दरोडा पडला त्यामुळे आज माझ्याकडे काही विद्या शिल्लक नाही. आणि शिक्षकांचे हे अशीच अवस्था झाली असती असती.तशेच राजाही हीराहून घेऊ शकत नाही किंवा त्यावर कर म्हणजे टॅक्स लावत नाही. विद्येची भाऊ देखील वाटणी मागत नाही. जर विद्या धनाची वाटणी करता आली असती तर एखादा भाऊ म्हटलं असता तुझ्याकडे आतापर्यंत जेवढी विद्या आहे त्यातली अर्धी माझी पण त्याला तशी वाटणी मागता येत नाही.

इतर धन तुम्ही कसेही कमवा त्याची भाऊ वाटणे मागू शकतो .विद्या ज्याच्याकडे आहे त्याला त्या विद्येची ओझे होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर दान दिल्याने कमी होत जाते .परंतु विद्या दान दिल्याने ते देणाऱ्याचे वाढते आणि घेणाऱ्याला मिळते असे महत्व या विद्या संस्कृत श्लोकाद्वारे आपणा सर्वांना लेखकाने सांगितले आहे)

विद्या संस्कृत श्लोक 13

(या संस्कृत विद्या श्लोकामध्ये विद्येचं अनन्यसाधारण महत्त्व कवीने पटवून सांगितले आहे. ज्या मानवाकडे विद्या नाही असा माणूस साक्षात पशुच असतो .म्हणजे विद्या असेल तरच तो माणसात गणला जातो नाहीतर विद्या नसलेल्या व्यक्तीची गणना पशु मध्ये प्राण्यांमध्ये केली जाते .फक्त पशुला चार पाय असतात आणि शेपटी असते . विद्या विहीन माणसाला शेपटी नसते.

विद्येसोबतच इतर काही गुणाची आवश्यकता मानवाला असते. ते सदरील विद्या श्लोका मध्ये सांगितले आहेत. जो काही तप करत नाही,  कोणाला दानही देत नाही जो चारित्र्यहीन आहे . ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा चांगला गुण नाही. कुठलाही धार्मिक गुण नसेल तर असा विद्या विहीण मनुष्य म्हणजे साक्षात पशुचा असतो असे लेखकाने या सदरील श्लोकाद्वारे सांगितले आहे.)

विद्या संस्कृत श्लोक 14

(मानवाला जीवन जगत असताना जीवनामध्ये दोन विद्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या दोन विद्या सदरील संस्कृत विद्याश्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली विद्या म्हणजे शस्त्रविद्या. उपजीविकेसाठी आपल्याला एखादे शस्त्र किंवा एखाद्या यंत्र शारीरिक काम करण्याची कला या सर्व गोष्टी शस्त्रविद्यांमध्ये येतात. हे शस्त्र ,यंत्र किंवा एखादे शारीरिक काम करण्यासाठी शरीरामध्ये शक्ती असावी लागते. उदाहरणार्थ एखाद्याला तलवार हे शस्त्र कसे चालवावे याची विद्या अवगत आहे .परंतु अंगामध्ये शक्ती नसेल तर तो तलवार चालू शकत नाही आणि व्यक्ती जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या अंगामध्ये शक्ती राहत नाही . सबब तो तलवार चालू शकत म्हणून ही शस्त्रविद्या जीवनभर पुरत नाही.   

  या  विद्या संस्कृत श्लोकांमध्ये दुसरी विद्या सांगितलेले आहे ते म्हणजे शास्त्रविद्या. कोणत्याही प्रसंगी आपल्याला त्या परिस्थितीनुसार बोलण्याची जी कला आहे त्याला शास्त्रविद्या असं म्हणतात. ही शास्त्र विद्या वापरण्यासाठी शक्तीची गरज नसते . म्हणून ती अजन्म आपल्याबरोबर राहते. मानवाला बोलायला येण्यासाठी वयाची सुमारेअडीच वर्षे लागतात. पण केव्हा कोठे आणि कसे बोलावे हे एखाद्या व्यक्तीला पूर्ण आयुष्य गेले तरी कळत नाही.

आपण कितीही म्हातारे झालो तरी शास्त्र विद्या आपली साथ सोडत नाही. म्हणून संस्कृत विद्या कवी म्हणतो जी पहिली शस्त्रविद्या आहे ते म्हातारपणी हास्यदाईअसते. आणि शास्त्रविद्याही जसे वय वाढल त्यामध्ये भरभराट होते. अर्जुनाला गुरु द्रोणाचार्य ने शस्त्रविद्या दिली तर भगवान श्रीकृष्णाने त्यांना शास्त्र विद्या दिली. म्हणून या दोन्ही विद्येच्या जोरावर अर्जुन महाभारताचे युद्ध जिंकू शकला. आपणाला जर येऊन जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपणही शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या दोन्ही अवगत कराव्यात.)

विद्या संस्कृत श्लोक 15

(विद्यावान माणसाच्या अंगी विनय म्हणजेच नम्रता असायला हवि . कारण एक विद्या संस्कृत श्लोककार म्हणतात ‘विद्या विनय न शोभते’ . विद्या बरोबरच त्याचा स्वभाव जर विनयशील असेल तर अशी व्यक्ती समाजातील अनेक लोकांचे मन आकर्षण करून घेते. याच्यासाठी संस्कृत श्लोककाराणे एक उदाहरण दिलेला आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे सोने हे बहुमोल आहे आणि त्यामध्ये जर एखादा हिरा, रत्न इत्यादी टाकले तर त्या सोन्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. आणि तो दागिनाआपल्या डोळ्याला मोहन टाकतो त्याचप्रमाणे विद्यावान माणूस जर विनयशील असेल तर सर्वांना तो मोहन टाकतो. म्हणून सर्वांनी विद्येबरोबरच आपण विनयशील राहावे असा संदेश या संस्कृत श्लोक आधारे दिला आहे.)

विद्या संस्कृत श्लोक 16

( माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्याने विद्या घ्यावी. विद्या घेत असताना कठोर परिश्रम करावे लागतात. जो परिश्रम करत नाही त्याच्या जीवनात विद्या येत नाही.परिश्रम न करणाऱ्याला आळशी माणूस म्हणतात. अशा आळशी लोकांसाठी विद्या संस्कृत सुभाषितकार म्हणतात. आळशी माणसाच्या जीवनात विद्या कुठून येणार आणि विद्यानसेल तर त्या माणसाला धन कुटून मिळणार आणि धन नसेल तर त्याला मित्र जुळत नाहीत.

कारण मराठीमध्ये म्हटलं जातं ,’असतील शिते तर जमतील भुते ‘या न्यायाने मित्र येत नाहीत .जीवनात मित्र म्हणजेच सुख असतं ज्याला मित्र नसतात. त्याच्या जीवनात सुख कुठून येणार असा संदेश या विद्या श्लोकाद्वारे दिला आहे. म्हणजे जीवनात जर सुख मिळवायचे असेल तर आपण आळस न करता विद्या घ्यावी.)

विद्या संस्कृत श्लोक 17

(घेतलेली विद्या आणि कमावलेले धन यांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये योग्य वेळी  करता आला पाहिजे. ही माहिती विद्या संस्कृत सुभाषितकाराणे वरील श्लोकांमध्ये दिलेली आहे. ते म्हणतात विद्या घेतलेली आहे पण ते पुस्तकात असेल तर ती काय कामाची. 

आणि धन कमावलेलेआहे परंतु ते दुसऱ्याला दिलेले आहे.तेही आपल्या योग्य वेळी उपयोगाला येत नाही. म्हणून माणसाने घेतलेली विद्या आपल्या जीवनात अमलात आणली पाहिजे.  माणसाने पुस्तकी किडा न होता ते विद्या आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावी. आणि दुसऱ्याला दिलेले धन हे आपल्याला परत वेळेवर येत नाही हेही लक्षात ठेवावे.)

विद्या संस्कृत श्लोक 18

( ज्याप्रमाणे एखादा मनुष्य कुदळीने सतत विहीर खणत राहिला. तर त्याला एक दिवस पाणी निश्चितच लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने गुरुजी सेवा निष्ठेने आणि सातत्याने करणाऱ्याला विद्या मिळतेच. असा अनमोल संदेश सुभाषितकाराने या विद्याश्लोकामध्ये सर्व मानव जातीला दिला आहे विद्या घ्यायची असेल तर गुरूंची सेवा निष्ठेने आणि सातत्याने केली पाहिजे.)

विद्या संस्कृत श्लोक 19

(परदेशात गेल्यावर आपल्याला मदतीला विद्या हे एकमेव धन येते. संकट आल्यावर आपली बुद्धी आपल्या कामाला येते आणि आपण आपल्या धर्मामध्ये कसं वागलो होतो हे परलोकात म्हणजेच स्वर्ग ,वैकुठ, कैलास इ.लोकात गेल्यावर आपल्याला धर्म कामी येतो. परंतु परदेशात ,व्यसनामध्ये आणि पर लोकांमध्ये या सर्वच ठिकाणी चारित्र्य म्हणजेच सील आपल्या मदतीला येते. हा अनमोल संदेश आपल्याला विद्या संस्कृत सुभाषितकाराने या श्लोकाद्वारे दिलेला आहे)

विद्या संस्कृत श्लोक 20

( मनुष्य कितीही सुंदर असू द्या, कितीही सुशील असू द्या,, फार मोठ्या उच्च कुळात जन्मु द्या, एखादा गडगंज श्रीमंत असू द्या पण तो जर विद्या विन असेल तर तो शोभत नाही. बाकीच्या इतर सर्व गोष्टी पेक्षा विद्या हाच खरा माणसाच्या दागिना आहे .हे या श्लोकाद्वारे आपणाला सांगितले आहे)

Leave a Reply