विद्या धनं सर्व धन प्रधानम् |

सर्वधनामध्ये विद्याधन हे प्रमुख धन आहे.

Thick Brush Stroke

न चोरहार्यं न च राजहार्यं (विद्या) |

विद्या धनाची चोराला चोरी करता येत नाही आणि राजा विद्या धनावर कर आकारत नाही.

Thick Brush Stroke

न भ्रातृ भाज्यं न च भारकारी (विद्या) |

विद्याधनाची भाऊ वाटणी मागत नाही आणि विद्याधन कितीही असलं तरी त्याचं ओझं होत नाही.

Thick Brush Stroke

व्यये कृते वर्धते येव नित्यम् (विद्या) |

विद्याधन दान दिल्याने वाढत जाते.

Thick Brush Stroke

विद्या सम नास्ति शरीर भुषणम् |

शरीराला विद्येसारखा दुसरा दागिना (भूषण )नाही.

Thick Brush Stroke

स्वदेषे पुज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते |

राजाला आपल्याच राज्यात किंमत असते परंतु विद्वानाला पूर्ण जगामध्ये किंमत असते.

Thick Brush Stroke

विद्या नाम नरस्य रुपमधिकम् |

विद्याने माणसाचे सौंदर्य अधिक वाढते.

Thick Brush Stroke

विद्या प्रच्छन्न गुप्तं धनम् |

विद्या हे माणसाचे गुप्त आणि झाक्रत असे धन आहे.

Thick Brush Stroke

विद्या भोगकरी यश: सुख करी |

विद्येमुळे मानवाला सर्व प्रकारचे भोग, यश आणि सुख मिळते.

Thick Brush Stroke

विद्या गुरु नाम गुरु

विद्या गुरूंची हि गुरु आहे .

Thick Brush Stroke