दैवच सगळं करेल म्हणून माणसाने स्वतःचा चालू असलेला उद्योग सोडू नये.
काहीच प्रयत्न न करता तिळापासून तेल निघणे शक्य नाही.
सज्जन माणूस कितीही दूर असला तरी त्याचे सद्गुण त्याच्या दुताचे काम करतात.
उत्तम प्रतीची माणसे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय कधीही सोडत नाहीत.
ज्ञानमार्गावरून चालणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे अत्यंत कौशल्याचे व धोक्याचे काम आहे.
शेतकरी शेतीमध्ये ज्या प्रकारचे बीज फिरतो त्या प्रकारची त्याला फळ मिळते. ( शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी)
माणसाने चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळते.
उत्तम प्रतीचे लोक कार्य जास्त करतात आणि कमी बोलतात पण हलक्या प्रतीची लोक कार्य कमी करतात आणि जास्त बोलतात.
जीवनात समस्या (संकट ) येण्यापूर्वीच त्यांच्या प्रतिकारासाठी योग्य तो उपाय करावा.
माणसाची परीक्षा शिक्षण, च्यारित्र्य, सदगुण आणि कार्य या चार गोष्टीने केली जाते.
ज्या ठिकाणी बुद्धिमान लोक नसतात त्या ठिकाणी कमी बुद्धीच्या माणसाची देखील प्रशंसा होते.