उद्योगामुळे मनुष्य सफल होतो केवळ कार्य करण्याचा विचार मनात विचार असून नाही.
झोपलेल्या सिंहाच्या मुखामध्ये हरिण स्वतः जाऊन पडत नाही. सिंह राजा असला तरी त्याला कार्य करावेच लागते.
कुदळीने एकाच ठिकाणी सतत खणत राहिल्यास पाणी मिळतेच. (एकाच उद्योगात सतत प्रयत्न केल्याने यश मिळते)
उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करण्याचे काम सकाळीच करावे.
संकटे येण्यापूर्वीच ते दूर करण्याच्या उपयोजना कराव्यात.
श्रेष्ठ पुरुषाकडे शारीरिक व मानसिक आघात सहन करण्याचे सामर्थ्य असते.
फुल दिसायला कितीही सुंदर असले तरी सुवासाशिवाय शोभत नाही.
पाटीभर आश्वासनापेक्षा वाटीभर कार्य महत्त्वाचे असते.
जीभ ताब्यात ठेवली तर अनेक सुखे(लक्ष्मी) व लाभ (मित्र)प्राप्त होतात.
जीभ सैल सोडली तर अनेक संकटे (बन्धने) व भयंकर दु:खे(मरणासारखी) भोगावी लागतात.
खूप वैभव असले तरी सत्पुरुष कधीही गर्विष्ठ होत नाहीत.