जोपर्यंत कर्मरूपी मूळ आहे तोपर्यंत शरीर रुपी वृक्ष उगवणारच त्याला जात, आयुष्य व भोगरूपी फळे लागणारच.
कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभर ही राहू शकत नाही .
कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभर ही राहू शकत नाही .
कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे परंतु फळांमध्ये नाही. एकदा कर्म केले त्याचे फळ भोगलेच पाहिजे.
आयुष्यामध्ये सर्व कर्मे कुशलतापूर्वक करणे यालाच योग असे म्हणतात.
ज्ञानाग्नि पूर्वकर्माचा समस्त साठा भस्मसात करतो.
ज्याचे अंत:करण अहंकाराने युक्त नसते ,ज्याची बुद्धी फलासक्तीने मलीन झालेली नसते. तो कर्माने बद्ध होत नाही.
मनुष्याला पुण्याचे ( सुखकारक) फळ हवे असते परंतु तो पुण्य करण्यास उत्सुक नसतो.
मनुष्याला पापाचे( दुख:खदायक) फळ हवे नसते परंतु पाप मात्र बिनधास्त करतो.
आपल्या कर्तव्य आचरणाने परमात्म्याची उपासना केली असता मानवाला सिद्धी प्राप्त होते.