About Us

आमच्याबद्दल

मी बळीराम कवडे संस्कृत श्लोक मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
संस्कृत श्लोकाच्या वाचनाने वक्तृत्व कलेमध्ये वाढ होते. यामध्ये विद्या संस्कृत श्लोक , कर्मपर संस्कृत श्लोक प्रेरणादायी संस्कृत श्लोक,योग पर संस्कृत श्लोक यासारखे अनेक संस्कृत श्लोक आजच्या काळाच्या समजणे कठीण होत चालले आहे. संस्कृत श्लोकांचे सुगम अर्थ आपल्या सर्वांना समजावेत आणि जीवन समृद्ध करण्यासाठी ते उपयोगात आणावेत यासाठी आम्ही हा लिखाणाचा प्रवास सुरू करतो. आमचा ब्लॉग, www.sanskritsholk.info एक डिजिटल महासमुद्र म्हणून काम करतो. ज्या समुद्रामध्ये प्राचीन ज्ञान असलेले संस्कृत श्लोक आधुनिक जगाला मिळतात.

संस्कृत श्लोकामध्ये सखोल ज्ञान आहे. अतिशय कमी शब्दांमध्ये भरपूर ज्ञान हे संस्कृत श्लोकाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये वाचार्थ, सरळ अर्थ, लक्षणार्थ प्रसंगीतपणा,इ.सर्व सखोलपणे उलगडून सांगतो. ज्या व्यक्तींना संस्कृतीची आवड आहे, वक्तृत्व कलेचा छंद आहे, आत्मज्ञानाची आवड आहे, संस्कृती परंपरा जोपासायचे आहे, आनंदी जीवन जगायचे आहे, अशा समविचारी साधकानी या समुदायांमध्ये सामील व्हा. संस्कृत श्लोक देत असलेल्या या सखोल ज्ञानाचा शोध घ्या.

आमचे ध्येय

संस्कृत साहित्य हे समृद्ध साहित्य आहे. हे समृद्ध साहित्य जगाच्या या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांना सहज उपलब्ध व्हावे.आमची संस्कृत संस्कृती जगाच्या कल्याणासाठी उपयोगी यावी. हे आमचे ध्येय आहे.