परदेशात गेल्यावर विद्या नातेवाईका (भावा) प्रमाणे पाठराखण करते.
विद्या देवांचाही देव आहे.
राज्यामध्ये धनवाना पेक्षा विद्यावानाला किंमत असते.
विद्या शिवाय माणूस म्हणजे साक्षात पशुच असतो.
विद्या हि शस्त्र आणि शास्त्र अशी विद्या दोन प्रकारचे आहे.
वृद्धपणी शस्त्रविद्या कामाला येत नाही परंतु शास्त्र विद्या आयुष्यभर सन्मान देते.
मानवाने धन कणाकणाने आणि विद्या क्षणाक्षणाने मिळवावे
क्षणाचा दुरुपयोग करतो त्याला विद्या कोठून मिळणार आणि कणाच दुरुपयोग करतो त्याला धन कोठून मिळणार.
दुर्जन विद्येचा उपयोग भांडण करण्यासाठी ,धनाचा उपयोग व्यसनासाठी आणि शक्तीचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करतात.
साधू महापुरुष विद्याचा उपयोग ज्ञानदानासाठी. धनाचा उपयोग गरिबाला दान करण्यासाठी आणि शक्तीचा उपयोग दुर्बलाच्या रक्षणासाठी करतात.