लोकसमूहाला समोर ठेवून त्यांच्यासाठी कर्तव्य कर्म करुन राजा जनकादिनी सिद्धी प्राप्त केली.
फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन अशी भावना माणसाने कधीही ठेवू नये.
धनासाठी निरर्थक धावपळ करू नका कारण फक्त धावपळ केल्याने पैसा मिळत नाही.
कुत्रा सतत धावत राहतो परंतु तो कधीही धनवान होत नाही.
देह धारण करणाऱ्या कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला संपूर्णपणे क्रियाचा ( कर्माचा) त्याग करणे शक्य नाही.
ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या इंद्रियाचे लाड बंद करता; तेव्हा तुम्ही मनाने खूप काही कर्मे करत असतात.
स्वभावाने नियत केलेले कर्म स्वधर्माला अनुसरून केली असता मनुष्य पापाला प्राप्त होत नाही.
प्रेमपूर्वक आपापली कर्मे मनुष्याने केली तर त्याला सिद्धी प्राप्त होते.
कर्माची इष्ट ,अनिष्ट आणि मिश्रित अशी तीन प्रकारचे फले आहेत.
कर्मयोगी कर्माच्या फलाचा त्याग करून नैष्ठिकी शांतीला प्राप्त होतो.
कर्मयोगी कर्माच्या फलाचा त्याग करून नैष्ठिकी शांतीला प्राप्त होतो.